तिची आठवण भाग अंतिम

Love is very special thing in our life

तिची आठवण भाग अंतिम

(मागील भागात आपण बघितले की राहुल ने गौरी ला प्रपोज केले पण ती काहीच उत्तर न देता निघून जाते....आता बघुया पुढे काय होते.....)

मी गौरीला प्रपोज करतो पण ती खाली मान घालून निघून जाते,...काहीही उत्तर न देता ती गेल्यामुळे मी फार अस्वस्थ झालो होतो,मला काहीच कळत नव्हते व मनात भीती देखील होती ती मला नाही म्हणणार नाही ना....बऱ्याच विचारांनी माझ्या मनात घर केले होते,,,काहीही कळायला मार्ग नव्हता,...तिला भेटून सगळे सरळ सरळ विचारायचे होते,पण नंतर मनात विचार आला...तिला जेव्हा उत्तर द्यायचे तेव्हा ती देईल...

मी फक्त तिच्या उत्तराची वाट पाहत होतो,आणि स्वतःच स्वतःची समजूत काढत होतो...मला ती नाही म्हणुच शकत नाही,,तिच्या पेक्षा सर्व गोष्टी ने मी पूर्ण होतो....दिसायला देखणा,श्रीमंत घराणे,लाखो करोडो ची प्रॉपर्टी....आणखी काय हवे असेल तिला....ती कदाचित आज नाही तर उद्या मला नक्की हो म्हणेल....

मी याच विचारात जगत होतो,पण तीच उत्तर ही आले नाही,,अन् ती देखील दिसत नव्हती...नेमके काय झाले असेल....याची शहानिशा करण्यासाठी मी थेट विनय कडे गेलो.....विनय ला सरळ विचारले की तुझी बहिण गौरी हल्ली कॉलेजला जात नाही का.....तर विनय ने समोरून उत्तर दिले,...माझी बहिण अभ्यासात खूप हुशार आहे,तिला शिकण्याची आवड देखील आहे,...ती खूप मन लाऊन अभ्यास करत होती....आम्ही तिच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले होते....पण संजय ने तिला पूर्ण साथ दिली,,अन् तिचे शिक्षण चालू राहावे याकरिता आम्हाला समजून सांगितले तेव्हा कुठे मी तिच्या शिक्षणासाठी तयार झालो.... खरंच संजय खूप समजूतदार आहे,असे म्हणून विनय तिथून निघून गेला.....म्हणजे आईने त्याला हाक मारली....

मी मात्र थोडा विचारात पडलो,अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा विनय ला विचारलं ....अरे विनय काल तू संजय विषयी सांगितलं पण हा संजय आहे तरी कोण,आणि कुठे असतो??....माझ्या मनात थोडी भीती होतीच,मी जो विचार करत आहे तस काही नसावं बस.....

विनय:. संजय....काय सांगावे राहुल बाबा तुम्हाला संजय विषयी, म्हणायला तो माझा आते भाऊ आहे...पण आमच्या गरिबी मध्ये त्याने अगदी सख्या भावसारखी माझी मदत केली...खूप उपकार आहे संजय चे आमच्यावर....

मी:.   अच्छा आतेभाऊ का....

विनय:.  हम्म्म.....पण फक्त आतेभाऊ नाही...तर ते आता माझे जावई देखील होणार आहे ..

मी::. म्हणजे...मला कळले नाही,काय म्हणत आहेस तू...(खरं तर मला कळलं होत,पण तरी देखील स्वताच्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होतो)

विनय:: म्हणजे गौरी आणि संजय चे दोन वर्षापूर्वी लग्न जमले ,पण संजय च्या म्हणण्याप्रमाणे गौरी च शिक्षण पूर्ण झाल्यावर च लग्न करायचे,म्हणून लग्न समोर ढकलले....पण आता माहीत नाही तिला काय झाले ....ती पुढे न शिकता लग्न करायचे म्हणते....संजय देखील तयार आहे लग्नाला...


हे सर्व ऐकतच माझ्या पायाखालची जमीन जणू सरकली,आणि कोणीतरी मला धक्का देऊन फेकून दिल्यासारखे झाले होते ....मला चक्कर आली अन् मी खाली पडलो,....जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पप्पा होते,त्यांच्या डोळ्यात पाणी होते...पप्पा माझ्यासाठी रडतंय हे मला कळले होते...पण पप्पा सोबत बोलण्याचे त्राण माझ्यात उरले नव्हते...काहीही न बोलता मी मान वळवली तर आई चा रडण्याचा आवाज कानावर पडला...मी हळूच पप्पांना विचारले...आई कुठे आहे....माझा आवाज ऐकताच आई धावत आली...

माझ्यासाठी ती फार मह्त्वाची होती परंतु मी माझ्या आई पप्पांन साठी महत्वाचा होतो,हे त्या दिवशी माझ्या चांगलेच लक्षात आले होते,...आजारी आई,अन् खूप काळजी घेणारे पप्पा यांना तरी माझ्या शिवाय कोण होते....मी गौरीसाठी सर्व विसरून गेलो होतो....

गौरी ने मला होकार दिला असता तर कदाचित आई पप्पांनी देखील तीला सून म्हणून स्वीकारले असते,...कारण आई पप्पांचा तसा विरोध च नव्हता....पण म्हणतात ना ज्यांना प्रेम मिळत ते खूप भाग्यवान असतात कदाचित मी नसेल...मी अगदीच हतबल झालेलो होतो....

तिचा विचार मनातून काढायचे मी ठरविले....माझ्या आयुष्यात असेही फार क्षण आले होते की समोरून मुली मला प्रपोज करत होत्या,पण मला आवडली ती फक्त गौरी...तिने मला उत्तर दिले होते...."माझ्यात आवडण्यासरखे काय"...याचे उत्तर माझ्या मनात दडले होते...मला ती खूप आवडायची आणि माझे तिच्यावर खरोखर खूप प्रेम होते.....

असो,,..शेवटी काय प्रेम सर्वांना मिळतच असे नव्हे...मी तिला विसरण्याचा प्रयत्न करत होतो,पण विसरणे येवढे सोपे नव्हते,..मी फक्त तिच्या विचारातून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतो....

आई पप्पा माझ्या ओठावरचे हसू शोधत होते...माझ्या ओथावरचे हसू जणू कुणीतरी चोरून नेले होते...काही केल्या हसू काही ओठावर येई ना...आणि अशातच एके दिवशी विनय गौरीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला,त्याने ती पत्रिका आई च्या हातात दिली आणि म्हणाला बाईसाहेब ही माझ्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका...तुम्ही सर्वजण याल ना लग्नाला....लगेच आईने हो म्हणजे काय नक्की येऊ आम्ही सर्व असे म्हणून उत्तर दिले...

आईने पप्पांना देखील लग्नात येण्याचे सांगितले मला ही आई ने लग्नात जायचे म्हणून सांगितले,,पण मन काही लग्नात जायला तयार नव्हते पण चला तिला तिच्या भावी आयुष्याच्या शुभेच्या देऊया म्हणून मी देखील होकार दिला...

आम्ही तिघेजण लग्नाच्या दिवशी तयारीला लागलो,पप्पांनी तिला देण्याकरिता छान गिफ्ट देखील आणले आईने पण तिला तिच्या आईला साडी घेतली...विनय,विजय व त्यांच्या बाबांना देखील कपडे घेतले...आणि आम्ही लग्नात गेलो ..लग्न अगदीच साध्या पद्धतीने होते,मोजकेच लोक,सारेकाही मोजकेच....पण सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद खूप मोठा होता...मी तिच्याकडे बघितलं ,,,खूप सुंदर दिसत होती,अगदीच साजरी गोड नवरी ...गालावरची खळी त्या दिवशी खूपच खुलून दिसत होती...

तिच्या चेहऱ्यावर आनंद झाडकत होता,खूप खुश ती होती जणू तिच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या होत्या,..मी मात्र मनातून खूप दुखी झालेलो होतो,..
पण दुःख सावरून तिच्या आनंदात सहभागी झालो होतो, तिचं मला खूप कौतुक ही वाटत होते की तिला पैसा महत्वाचा नव्हता,तिच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर तिने माझा पैसा पाहून लगेच हो म्हटले असते...पण गौरी त्यातली नव्हती तिने पैसा सोडून संजय ला स्वीकारले होते,..लग्नात संजय अन् गौरी खूप आनंदी होते...

मी मात्र एका कोपऱ्यात जाऊन फक्त तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत होतो,बघता बघता तिचे लक्ष माझ्याकडे गेले तर ती आणि संजय दोघे माझ्या दिशेने येत होते,,माझ्या जवळ येताच तिने संजय ला माझा परिचय करून दिला,,आणि मला म्हणाली ...फार बरे वाटले तुम्ही माझ्या लग्नात आले हे बघून....बस येवढे बोलून ते दोघे तिथून गेले....

तिच्या मनात माझ्याविषयी कुठलाही राग नव्हता,अन् नाही मला तिचा राग येत होता,...अतिशय उत्तम रित्या लग्न पार पडलं...आम्ही सर्वजण घरी आलो...घरी आल्यावर आई पप्पा आणि मी सहज गप्पा मारत बसलो होतो...तर आईने माझ्या लग्नाचा विषय केला,त्यावर पप्पा म्हणाले अग त्याला स्वतःच्या पायावर उभा तर होऊ देत ...मग करूया की लग्न...असे म्हणून पप्पांनी विषय टाळला...

माझं मन आतून खूप उदास होत,,आई देखील सतत म्हणायची....राहुल;तू हल्ली पहिल्या सारखा आनंदी दिसत नाहीस बाळा काही अडचण आहे का कुठे,,मला किव्हा पप्पांना सांगत का नाही??...छे ग आई...उगीच नको तू काळजी करू,,मी एकदम ठणठणीत बरा आहे...असे उत्तर देऊन मी तिथून पळ काढला....

आई पासून मुलाचे दुःख लपंन म्हणजे फारच कठीण गोष्ट....हळू हळू मी नॉर्मल होत होतो,,आणि मी माझं पूर्ण लक्ष शिक्षणाकडे दिलं..शिक्षण पूर्ण करताच मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला,,देवाच्या आणि पप्पाच्या कृपेने मला यश देखील मिळत होते...आता मात्र आई हात धुवून माझ्या लग्नाच्या मागे लागली...अन् मी ही होकार दिला...एका मागून एक खूप स्थळ येत होती,,आई पाप्पाच्या आवडीने मुलीची पसंती झाली...व लगेच लग्न ही पार पडले....

लग्नाच्या आधीच आम्ही शहरात राहायला आलो होतो,,सुचिता म्हणजेच माझी पत्नी सर्वगुण संपन्न होती,...बरेचदा मला गौरीची आठवण यायची पण मी आता सुचिता म्हणजेच गौरी अशी संकल्पना केली,,आमचा संसार फुलत चालला होता त्यात एक अंकुर देखील फुललं म्हणजेच आम्हाला एक गोड मुलगा झाला....आता मुलाच्या सहवासात मी पूर्णपणे रमून गेलो होतो....

पण तरीदेखील ती काही मनातून जात नाही,,ती ची आठवण अधून मधून येत असते शेवटी पहिलं प्रेम माणूस विसरू शकत नाही....माझ्या संसारा प्रमाणे तिचा देखील सुखाचा संसार चालू होता,,विनय कडून तिला मुलगा झाल्याची बातमी देखील कळली होती....अशाप्रकारे आम्ही दोघे मी आणि ती आपापल्या संसारात आनंदी होतो...पण तरी देखील एखाद्या वेळेला तिच्या सारखी मुलगी दिसली की पूर्ण भूतकाळ आठवितो आणि अर्थातच तिची आठवण येते....

                           * समाप्त*

Ashwini Galwe Pund