तिची आठवण भाग २

Love is a part of life not body

तिची आठवण भाग २

मागच्या भागात आपण पाहिले की राहुल हा विनय ची बहिण गौरी हिच्या प्रेमात पडला,आता बघुयात पुढील भाग....

अतिशय साधे राहणीमान असलेली गौरी मला खूप आवडली होती,तीच ते साधपन मला खूप भाळल होत,...मला तिच्या व्यतिरिक्त काहीच सुचत नव्हत,आईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत मी सतत तिचाच विचार करत होतो,माझ्या खोली च्या बाल्कनीत उभा राहून फक्त तिच्याकडे बघत होतो,ती दिसली की मला खूप बरे वाटायचे,आणि नाही दिसली की मनात नाना विचार यायचे...

या सर्व प्रकरणाची तिला थोडी देखील कल्पना नव्हती,तिला यातले काहीच माहीत नव्हते,,माझ्या मनात आता विचार येत होते की तिला आपण सांगावं की तू मला खूप आवडतेस,...मग मलाच राहून राहून विचार यायचे की खरच आपले तिच्यावर प्रेम आहे का,,की हे फक्त एक वेळेची करमणूक आहे,,आणि मी ठरविलं की आपण च आपल्या प्रेमाची परीक्षा घेतली पाहिजे,आणि म्हणूनच मी तिच्याकडे दुर्लक्ष केले पण माझं मन तिच्यात पूर्णतः गुंतल होत,,तिला न बघता मला राहणे अशक्य झाले होते....

आणि एक दिवस ती चक्क माझ्या घरी माझ्या आईला भेटायला आली ,समोर मी च उभा....मनात आनंदाची लहर उमलत होती,तोच तिने विचारले की काकू आहेत का घरात.....तिचा आवाज ऐकला अन् मन जणू घायाळ झाले,,किती मधुर तिचा आवाज....मी थोडे लाजत च हो म्हटलं....अन् तिला आईकडे घेऊन गेलो....

ती: काकू तुमच्यासाठी आईने अळूवडी दिल्यात...

आई: अगबई,,हो का.....अग मी सहज च म्हटले         तुझ्या आईला की मला अळुवडी आवडते म्हणून....

ती: असू द्यात काकू ...आणि आणखी खाव्याष्या वाटल्या की सांगा...

आई: बर बर.....अग येणं गौरी बस ना...काही काम आहे का तुला घरी..अग मला बोलायला कुणी असलं की बरे वाटते...

ती: येते काकू मी आता,मला कॉलेज ला जायचे आहे....

आणि ती लगेच निघून गेली,..मला तिच्याशी बोलायचे होते,पण ती लगेच निघून गेली....तिला जवळून बघितले तर ती सुंदर दिसत होती,,तिचे डोळे अगदीच पानेदार होते,नकळत च डोळ्यातून आपुलकीची भावना झडकत होती.....ती माझ्याकडेच बघत आहे जणू असा भास मला झाला....

आता मी मनात कायम ठरवले की तिला सांगून द्यायचे माझं तुझ्यावर प्रेम आहे....पण एक भीती मनात घर करत होती,,तिने जर माझ्या प्रेमाला नकार दिला तर......आणि मग माझं मी च स्वताच्या मनाला समजून सांगितलं की मला नकार  का देईल ती....एका मुलीला जसा मुलगा हवा असतो ते सर्व गुण माझ्यात आहे...मग का म्हणून ती मला नकार देईल.....

मला तिला आता भेटायचे होते पण कसे आणि कुठे?  हा विचार सारखा माझ्या डोक्यात येत होता,मला तिच्या कॉलेज ची वेळ माहीत होती,,,आणि मी मनात ठरविलं की ती कॉलेज मध्ये जायला निघाली की मी रस्ता गाठून मध्येच प्रपोज करायचंय....आता फक्त वाट होती ती फक्त घरातून बाहेर पडायची,...मी छान तयार होऊन तिच्या घराकडे टक लावुन बघत होतो....आता येईल,मग येईल....पण ती काही घरा बाहेर आली नाही....

पुन्हा मनात भीती वाटली काय झाले असावे ,का नसेल गेली कॉलेजला....मग विनय ला चौकशी करण्याचे मनात आले तर विनय देखील त्या दिवशी कामाला आला नव्हता....आई कडे विचारले ...आज विनय दिसत नाही आई कुठे बाहेर पाठविले का तू काम निमित्त....तर आईने मला उत्तर दिले अरे नाही ....त्याच्या वडिलांची तब्येत बरी नाही तर त्यांना घेऊन ते सर्व शहरात गेले....

ओ अच्छा....असे म्हणत मी थोडा दुखी झालो...मला तिला बघावसे वाटत होते,त्यानंतर ती मला तब्बल दोन दिवसा नंतर दिसली,ते दोन दिवस मला असहणिय झाले होते, तिला न बघून दोन दिवस मला अजिबात राहवत नव्हते....अन् ती दिसली,व विनय देखील कामावर आला,मी विनय ला वडीलांविष्यी चौकशी केली व काही गरज पडल्यास निसंकोच पने सांग....असे म्हणत त्याला धीर दिला,,तो माझ्याकडे एकसारखा बघत होता,त्याच्या डोळ्यात पाणी आले,...अन् तो निघून गेला....कदाचित त्याला गहिवरून आले असावे...मी मात्र विनय हा तिचा भाऊ आहे म्हणून तर मी त्याला आपुलकीच्या भावनेने बोललो का?असा विचार करत होतो....पण जाऊ देत काही का असो ना आपुलकीची भावना महत्वाची.....

तिच्या वडिलांची तब्येत आता बरी होती,...अन् ती देखील कॉलेज ला जायला लागली होती...एक दिवस मी तिच्या पाठोपाठ बाईक घेऊन गेलो,,तिच्या समोर बाईक थांबवली व तिला विचारले,....गौरी तुला सोडू का कॉलेजला...
तर तिने अगदी दबक्या आवाजात नाही नको कशाला....जाते मी....असे उत्तर दिले....अन् लागलीच निघून गेली....

तिला प्रपोज करणे सोपे नाही हे माझ्या चांगलेच लक्षात आले होते, पण मी देखील फार जिद्दी ...प्रपोज तर करणारच....

माझ्या मनात विचार आला विनय लाच सांगावे की माझे तुझ्या बहिणीवर प्रेम आहे..पण नंतर वाटले विनय च्या नजरेत माझी श्रीमंती आडवी आली तर...नाही नको मी च तिला प्रपोज करणार..अशी मी माझ्या मनाची समजूत काढली...अन् लागलो काळवेळ शोधायला तिला प्रपोज करण्यासाठी...

बापरे किती कठीण असतं प्रपोज करणे,अन् किती भीतीदायक ...समोरून नाही उत्तर आले तर....पण प्रेम आहे हे तर तिला कळायला च हवे ना....मी पूर्णतः एकतर्फी प्रेमातून जात होतो...आणि या एकतर्फी प्रेमाचं वास्तव मला तिला सांगायचं होतं...

दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बाईक घेऊन तिच्या मागे गेलो,,मध्येच बाईक थांबवली अन् तिला बोललो...मला तुला काही विचाराचे आहे....थांबशिल का थोडी....हो,तिने उत्तर दिले...

मी: खूप दिवसापासून तुला सांगायचे होते..

ती: काय....

मी:. अग,,मला तू फार आवडतेस,अन् माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर....

ती:कोण मी.....माझ्यात काय असे आवडण्यासारखे....

अन् लगेच खालच्या मानेने ती निघून गेली,..तिने काहीही उत्तर दिले नव्हते...तिच्या मनात काय असेल हे बघुया पुढील भागात

क्रमशः


Ashwini Galwe Pund...

🎭 Series Post

View all