Dec 06, 2021
कथामालिका

तिची आठवण भाग १

Read Later
तिची आठवण भाग १

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

तिची आठवण

समोरून एक पंचविशी गाठलेली सावळी शी मुलगी जात होती,तोच राहुलला तिला बघून तिची आठवण झाली...तिची म्हणजेच त्याला आवडणारी ती..त्याची भूतकाळातील प्रेयसी...तिच्या सारख्या मुलीला बघून भूतकाळातील आठवणींना पुन्हा चालना मिळाली व तो त्या आठवणीत हरवून गेला....

त्यावेळेला माझं वय किमान २२असेल तर तिचे वय २०,,ती दिसायला फार सुंदर नव्हती,अगदी साधीसुधी राहणी,सावळा रंग,गालावर एक खडी,...आणि लांब केस....त्या लांब केशाची एक साधीशी गुंफलेली वेणी....पण का कुणास ठाऊक,,तिच्या कडे एकदा बघितले की दुसऱ्या कोणत्याच मुलीकडे बघावेसे वाटत नव्हते...

माझं घराणं श्रीमंत मी आईवडिलांना एकुलता एक त्यामुळे माझे सारेच हट्ट पूर्ण व्हायचे,आईवडिलांनी मला कशासाठी च दुखावले नव्हते,...आणि दुःख कशाला म्हणतात हे मला काही माहित नव्हते,प्रत्येक गोष्ट अगदी सहज मला मिळत असे त्यामुळे गरिबी काय असते हे देखील मला माहीत नव्हते....

माझे वडील राजकारणी माणूस त्यामुळे पैसा नेहमी घरात खेळत असायचा...आणि मी घरात एकुलता एक वंश त्यामुळे सर्व पैसा जणू माझाच...मला पैसा खर्च करण्यासाठी कधीही कुणी टोकत नसे,,शिवाय काही हवे असल्यास नोकर गडी एका आवाजात सर्व हजर...

आमचं वास्तव्य मोठ्या शहरात होते,पण माझ्या आईच्या आजारामुळे आम्ही एका छोट्याश्या गावात येऊन रहात होतो,म्हणजेच मी ,माझी आई, अन् आमच्या मदतीला काही नोकर ...पप्पा शहरात च राहत होते कारण त्यांना भरपूर कामे असायचे,अधूनमधून आमच्या भेटीला ते यायचे...

आईच्या आजारामुळे आम्ही ज्या गावात येऊन राहत होतो तिथे वातावरण अगदीच निरोगी होते अन् शुद्ध हवा होती,,शिवाय सडा शेणाचा वापर केला जात होता...आणि आईला तशाच वातावरणात राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता...त्यामुळे आईला देखील तिथे छान वाटत होते,,आजूबाजूचे लोक अगदीच मनमिळाऊ स्वभावाचे होते,थोडी काही गरज पडली की लगेच धाऊन यायचे,अन् पप्पा चा तसा रुबाब ही होता...

मला मात्र तिथे अजिबातच करमत नव्हते पण आई मुळे मी तिथे राहत होतो,..तशी पप्पांनी आमची सर्व सोय केली होती,घरात सर्व मनोरंजनाच्या वस्तू व घर ही खूप चांगले होते,...आईच्या प्रकृतीत सुधारणा होत होती,,तरी देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्हाला किमान दोन वर्षे त्या गावात राहायचे होते....

जिथे आमचं घर होते अगदी समोर च एक कुटुंब नव्याने तिथे राहायला आले होते,..त्या कुटुंबात एक मध्यम वयाचे जोडपे एक मुलगा अन् एक मुलगी येवढे सदस्य होते,मी सारखं त्यांच्याकडेच बघत होतो तर माझी नजर फक्त त्या मुलीकडे गेली  ती अगदीच साधीशी मुलगी,पण तिच्या आईवडिलांना सामान काढण्यात भराभर मदत करत होती,..का कुणास ठाऊक पण माझे सर्व लक्ष तिच्याकडे अचानक वेधले होते,..तर अचानक आईचा आवाज कानावर पडला अन् मी लगेच आईकडे गेलो...

आई मला आवाज देत होती,मी थोडासा आईवर ओरडलो देखील माझं मन तिथून यायला तयार च होत नव्हत,मला त्या मुलींविषयी आतुरता लागली होती...तर आई मला म्हणते,,,अरे तो आपला नोकर नाही का विनय...हो विनय म्हणे त्याच्या आई वडिलांची तब्येत फारशी बरी राहत नाही,आणि विनय आपल्यासोबत असतो तर मी त्याला म्हटले की तू तुझ्या आईवडिलांना इथेच बोलावून घे....कदाचित त्याचे आईवडील आले असावे आणि तो सांगत होता त्याला लहान एक बहीण अन् भाऊ पण आहेत...ते सर्वच येणार होते,,आले का ते बघ बर तेवढे.....आई हे मला सांगून मोकळी झाली....

माझ्या मनात विचार आला अन् आनंद ही झाला की विनय ची बहिण का...म्हणजे ती तर इथे येणारच.....आणि लगेच मी तिला बघायला धावत बाल्कनीत गेलो तर ती आत गेली होती...माझे डोळे फक्त तिला शोधत होते,..काहीही झाले तरी मला तिला बघायचे होते,...म्हणतात ना पहिल्या प्रेमाची चाहूल ही खूप वेगळी असते अगदी माझे देखील तसेच झाले होते....

मला तिचे नाव जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती,काय असेल बरे तिचे नाव....आणि सोबतच एक प्रश्न पडला होता की माझ्या मागे येवढ्या मुली लागतात पण मला याच मुली ची इतकी कशिकाय आवड? प्रश्न तर मनात खूप होते पण म्हणतात ना एकदा का जर माणूस प्रेमात पडला तर सर्व विसरून जातो ,माझेही काहीसे तसेच झाले होते...

माझे डोळे रात्रंदिवस फक्त तिला शोधत होते,ती काय करते,किती वाजता उठते,कुठे जाते,कुठून येते,,...माझं सर्व लक्ष तिच्यात गुंतल होत...मी आईजवळ विषय काढायचो की आई तुला करमतं नसेल तर विनय च्या आईला व बहिणीला बोलावं...पण आई काही मनावर घेत नव्हती,,शेवटी एक दिवस मीच विनय ला म्हटले की आईच्या सोबतीला तुझ्या आईला बोलावं ..म्हणजेच त्या निमित्ताने ती ही येईल...विनय ने देखील होकारार्थी उत्तर दिले...

एक दिवस विनय ची आई माझ्या आईच्या भेटीला आली पण ती सोबत नव्हती,,आईने विनय च्या आईला खुशाली विचारली तेव्हा त्यांनी सांगितले की सर्व आनंदात आहे बाई,,तुम्ही आहात म्हणून आम्ही आनंदात आहोत माझी मुलगी गौरी खूप हुशार आहे ती आता कॉलेजात जाईल अन् मुलगा विजय तो शाळेत जात असतो,,अन् विनय चे तर तुम्हाला ठाऊक च आहे...


क्रमशः

Ashwini Galwe Pund

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ashwini Galwe Pund

Teacher

I am simple living women