तिचे नातेवाईक ( भाग दुसरा )

एखादी व्यक्ती झाडां सोबत भावनिक दृष्ट्या किती जोडली गेलेली असते याची एक विलक्षण कथा


तिचे नातेवाईक ( भाग दुसरा )

विषय: नातीगोती

कोड सकाळ अत्यंत  गंभीर काळ होता मृत्यूच सावट प्रत्येकाच्या डोक्यावर होत. केंव्हातरी आरोग्य सेतू ॲप मध्ये कोणीतरी कोविड पॉझिटिव्हेशन पेशंट येऊन गेल्याचा अचानक सिग्नल येत असे त्यावेळी सगळ्यांनाच खूप भीती वाटायची. खरं म्हणजे कशाचीच काही शाश्वती नव्हती. त्यामुळे होतं ते वातावरण अजून गंभीर करण्यापेक्षा आम्ही हसून खेळून ते हलकफुलकं करण्याचा प्रयत्न करत असू.
अर्थात हा सगळा केविल म्हणा प्रयत्न होता हे आम्हाला माहिती होतं कारण कोविड विषयी कोणताच ठाम अभ्यास , किंवा उपचार कोणालाच माहीत नव्हता. फक्त पेशंटला ऑक्सिजन देऊन वाचवायचं एवढेच आम्हाला माहीत होतं . त्यात पीपीई किट मध्ये आठ आठ तास गर्मीच्या काळात काम करणं खूप असह्य व्हायचं . पण केवळ माणुसकीच्या नात्यातून आम्ही हसत खेळत हे काम पार पडायचो. खरं म्हणजे आम्हालाच आमच्या जीवाची शाश्वती नव्हती. कारण आम्ही काही अमर पट्टा घेऊन आलो नव्हतो.

जेव्हा आम्ही रिकामे असायचो, त्यावेळी कोणी गाणे म्हणायचे. कोणी लिखाण करायचं .कोणी त्याचा छंद पुरा करायचा. कोणी व्यायाम करायचं. कोणी उन्हात बसायचं. या गोंधळात निरळी मात्र  झाडाजवळ बसलेली असायची.

काही दिवसांनी एक जूनला तिचा वाढदिवस होता. मी ठरवलं तिला वाढदिवसाला एक छान फुलझाडं भेट द्यायचं.पण तिला अजिबात कल्पना येवू दयायची नाही.

एकमेकांचे संबंध दृढ व्हावे म्हणून आम्ही आमच्या युनिटमध्ये एकमेकांचा वाढदिवस साजरा करायची प्रथा सुरू केली निदान त्या निमित्ताने थोडाफार आनंदी वातावरण निर्माण व्हायचं. कसेही करून मृत्यूच्या या सावटाखाली आम्हाला पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं होतं अन्यथा पूर्ण जाऊ अशी भयंकर परिस्थिती आसपास होती.

तशात मला समजलं की निरालीचा वाढदिवस एक जूनला आहे. मग या वेळी तिला सस्पेन्स मध्ये ठेऊन आश्चर्याचा धक्का द्यायचं आम्ही ठरवलं. कोरोना मुळे सगळ्या गोष्टींवर बंधन आली होती. तरी आम्ही ठरवलं होतं सगळे नियम पाळून तिचा वाढदिवस साजरा करायचा. शक्य तितकं पॉझिटिव्ह राहायचं. वातावरण हेल्दी ठेवायचं.

ती सोडून सगळा स्टाफ यांना मी विश्वासात घेतलं.  काय करायचं ते नीट समजावून सांगितलं.  सोशल डिस्टन्स पळून आम्ही तिचा वाढदिवस साजरा करणार होतो याची तिला अजिबात कल्पना नव्हती.

वेळेच्या बाबतीत ती अतिशय काटेकोर होती. सकाळी ती ऑफिसात आली. तिने मला गुड मॉर्निंग केलं आणि सही केली. सही करून ती जायला निघाली. तेव्हढ्यात मी म्हटलं,

" निराली थांब जरा.दोन मिनिटं. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे" आणि मी बेल दाबली.

ठरल्या प्रमाणे सगळा स्टाफ माझ्या रूम मध्ये जमला. प्युन झाडाचं रोप आणि चॉकलेट घेऊन आला.

तिच्या हातात झाडाचे रोपटे देऊन  सगळा स्टाफ एका सुरात म्हणाला,

"हॅपी बर्थडे निराली.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे निराली. "

शुभेच्छा देऊन आम्ही तिला ते रोप भेट दिलं. क्षणभर तिला काय होतं आहे ते काही समजलंच नाही. ते रोप हातात घेतल्या बरोबर तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. ती खुर्ची वर बसून रडायला लागली.

इतरांनाही काय झालं समजेना. मी इशारा करून सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं.

" निराली, अग , असं काय करतेस. वाढदिवसाच्या दिवशी कोणी रडत का कधी. आधी ते रडणं थांबव आणि छान पैकी हास बरं."

तिला मी पाणी प्यायला दिलं. थोड्या वेळाने ती शांत झाली. मला म्हणाली," सॉरी सर , मी थोडी डिस्टर्ब् झाले होते."

" नो प्रॉब्लेम. हे बघ निराली. आपण सोबत काम करतो. शेवटी आपण आयुष्याचा बराच मोठा काळ एकमेकांच्या सहवासात घालवत असतो. तेंव्हा एकदम अपरिचित असल्या सारखं राहण्यापेक्षा थोडं एकमेकांना समजावून घेणं चांगलं नाही का. मला एक सांग, तुझा वाढदिवस आम्ही साजरा केलेला तुला आवडला नाही का. ?"

" तसं नाही सर. पण, काय सांगू आणि कसं सांगू. मलाच समजत नाही."

" तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. पण आजचा दिवस छान आनंदात राहा. आज तुझा वाढदिवस आहे."

पुन्हा तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. आणि ती बोलू लागली.


( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all