तिचे जग भाग 7

Tiche Jag Bhag 7


तिचे जग भाग 7


रेणुका ऑफिस मधून घरी यायला थोडा उशीर झाला तरी मीरा आणि मुकुंदच्या काळजाचा ठोका चुकायचा. रेणू आरतीला सोडून उशीर झाला मीरा खुपच रागवली रेणूला. आईच्या रागातली काळजी आजकालच्या मुलींना कळत नाही. मीराने रेणूला निक्षून सांगितले सातच्या आत घरात पाहिजे. मीराने रेणूला प्रश्न विचारले का उशीर झाला? कुठे गेली होती? रेणू म्हणाली चिल मार आई.. मीरा म्हणाली हि काय भाषा तुझी. मीराला तिच्या संस्कारांवर विश्वास होता पण जगाची नजर तरण्या मुली कडे पहायची चांगली राहिली नाही हे जीव तोडून मीरा रेणूला सांगायची. रेणूला वाटायचे मी ब्लॅक बेल्ट जिंकले मीराचे आईचे मन रेणूला कसे कळणार? मीरा रेणुकाला म्हणायची जेव्हा तू आई होशील तेव्हा कळेल तुला. जाई त्याच्या वंशा तेव्हा कळे.. आजकाल बातम्या मध्ये आपण काय काय वाचतो. रेणू तू येते तो मधला 1 रस्ता निर्मनुष्य असतो. मीरा म्हणे मी रामाचा धावा करत असते रेणू तू घरी येईपर्यंत तिला/ रेणूला जरा अतिशयोक्ती वाटली. पण मीरा खरचं सांगत होती. मीरा म्हणाली जेव्हा रेणूला सुखरूप घरी आलेली पहाते तेव्हा माझा जीव भांड्यात पडतो. मुकूंदाने ही मीराला खरे आहे असे बोलुन दुजोरा दिला. मीराने रेणू घरी यायच्या आधी जाब विचारण्यासाठी मुकूंदाला सांगितले होते. रेणुकाला रागवा असे मीराने मुकूंदाला सांगितले. मुकूंदाने यापैकी काही नाही केले. पण मीराला दुजोरा दिला. रेणुकाला वाटले तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. सातच्या आत घरात पाहिजे म्हणजे.... म्हणून रेणुकाने तक्रारीचा सूर मुकूंदा कडे लावला. मुकूंदाचे मीरा आणि रेणुका मध्ये सँडविच झाले होते.



दुसऱ्या दिवशी रेणूला असाच उशिर झाला. त्याच निर्जन ठिकाणी गाडी पंक्चर झाली होती. रस्त्यावरचा एक लाईट सुध्दा बंद झाला होता. रेणुकाने गाडी ढकलत बरीच पुढे आणली. आरतीला घाम फुटला होता. आरती रामाचा धावा करत होती. दोघींनी गाडी सोबत चालत, ढकलत बरेच आंतर कापले. रातकिड्यांचा आवाज, अधेमधे अंधार, दोघीच, फोन केला आई चिडेल असे रेणूला वाटले. आरती ला बोलणे बसणार असे वाटले. मुकूंदा चा फोन आला रेणूने पुर्ण परिस्थिती सांगितली. पुढच्या 5 मिनीटात मुकूंदा, कार, ड्राईव्हला घेऊन आला. आणि गाडी कोपर्‍यात लावून कारने आरतीला सोडून मुकूंदा आणि रेणू घरी निघाले घरी मीरा रामाचा धावा करत होती. बाहेर गेलेली व्यक्ती घरी लवकर परतून यावी म्हणून दारात पेला पालथा मीराने घातला होता. आईचे मन ते....


मीराने रेणूला स्पष्ट सांगितले उद्या पासून कार आणि ड्राईव्हला न्यायचे. स्कूटी बंद करून टाकायची. मीरा म्हणाली फोन केला नाही तू तुझा फोन काढून घेऊ का? रेणुकाला राग येत होता. मीरा काळजी पोटी करते हे मुकूंदा रेणूला समजावत होता. दुसऱ्या दिवशी स्कूटी बंद. कार ड्रायव्हर यात रेणूला बंधने वाटायला लागली. मुलीवर अनेक बंधने असतात, मुलीला पाळावी लागतात. किती काळ बदलला आहे आपण म्हणतो पण काळ स्त्रीयांसाठी नाही बदलला हेच खरे आहे..


रेणुका ला मीराचा रागही येत होता. पण रेणूंच्या मनात ती आई आहे आपली म्हणून भूमिका अशी घेत आहे हे मुकूंदाने समजावलेले डोक्यात होते. रेणुका हळूहळू ऑफिस मधल्या, दिवसभराच्या घडामोडी फक्त मुकूंदा कडेच सांगू लागली, मीराला जाणवले.


मीराने दोघीतले सगळे छान व्हावे म्हणून एक ड्रेस रेणूला गिफ्ट दिला. रेणुकाला जरा बरे वाटले. रेणूला सुट्टी च्या दिवशी खास मीराने डोसा, बटाट्याची भाजी, चटणी, सांबार, इडली, उत्तप्पा मेनू स्वतः घरी बनवला. रेणू खुश झाली.


मुकूंदाला कामाच्या ठिकाणी चहा आणि सिगारेट जास्त होत चालली होती. मुकूंदाला एक दिवस अस्वस्थ झाले, मुकुंदने दवाखान्यात धाव घेतली. तिथे बऱ्याच टेस्ट करून घेतल्या. मीरा आणि रेणुका दोघी खुपच काळजी मुकूंदाची घेत होत्या. मुकूंदाची मात्र या आजारपणात चिडचिड चालू होती. मुकूंदाला राग काढण्यासाठी एक हक्काची जागा म्हणजे मीरा. मुकूंदा वाटेल तसे मीराला बोलत होता. मीराला सोडून देणे याशिवाय पर्याय नव्हता. स्त्रीला सासरच्या मंडळींनी कडुन तिरके बोलणे, अपमान, टोमणे सहन करणे आणि सोडून देणे कधी मूलांच्या भविष्यासाठी, कधी आई आणि वडीलांचे नाव खराब होऊ नये म्हणून सासरी नांदणच असते. लगेच घटस्फोट हा पर्याय नसतो. भारतीय संस्कृतीत तर नाहीच. वर स्त्रीलाच सहनशीलता, समजूतदारपणा दाखवावा लागतोच.


रेणुकाने मुकूंदाच्या आजारपणात काळजी घेत सांगायचा प्रयत्न केला. बाबा आईला, मला तुमचे छत्र कायम हवे आहे. तुम्ही चहा आणि सिगारेट सोडून द्या. प्लीज. तुम्ही घरातील मेन कर्ते पुरूष आहात. मुकूंदाच्या डोळ्यासमोर त्याच्या आई अहिल्याबाईचा एकटीचा पुर्ण जीवनातला संघर्ष आला. कसे मुकूंदाचे वडील टिबी ने व्यसनामुळे गेले. मुकूंदा लहान होता. अहिल्याबाईनी कसे शेती, व्यवसाय करत मुकूंदाला लहानाचे मोठे केले, मुकुंदचे शिक्षण, लग्न केले मुकूंदाचा यशस्वी व्यवसाय व्हावा म्हणून प्रयत्न केले. मुकूंदाला अपराधी वाटले. आईला व्यसन केले कधीच आवडले नसते. मग मुकूंदाने रेणूला व्यसन सोडेन शब्द दिला. सिगारेटच्या पाकीटावर लिहिले असते आरोग्यास हानिकारक तरी का घेतात. पुरूष व्यसन करतात यात स्वतःचा विचार आणि काळजी तर घेतच नाही वर परीवाराचे भविष्य उध्वस्त करतात. त्यांच्या मागे परीवाराचे काय? पुरूषांचा हा बेजबाबदारपणा आहे. स्त्रीयांचे चांगले मैत्रीणीला भडाभडा सगळे सांगून रडून मोकळ्या होतात. पुरूष मात्र कामाच्या टेन्शन साठी सोल्युशन व्यसनात शोधतात. पुरूषांना मात्र रडता येत नाही. स्त्रीयां मात्र व्यसनाधीन होत नाही. संसार आणि नवऱ्याच्या आधीन असतात. नवरा म्हणेल तसे.... कित्येक स्त्रीयांना अर्थिक स्वातंत्र्य नसतेच गृहिणी असलेल्या.. किंवा कमवत असल्या तरी खर्च घरासाठी करायचे असतात. हातात काही रहात नाही. मर्जीने किंवा हौशी मोजी साठी किती पैसे खर्च करायचे, कुठे खर्च करायचे याकरता सासरच्या मंडळींची रितसर परवानगी घ्यावी लागते. मनाने मोठा व्यवहार नाही करू शकत. अर्थिक नसलेले इतर मोठे निर्णय एकटीने स्त्रीयांना घेण्याचे स्वातंत्र्य नसतेच. स्त्री जन्म मुळीच सोपा नाही. असा विचार मीरा करत होती. रेणूचे कसे होईल पुढे असा विचार मीराच्या मनात आला.

रेणुकाला ऑफिस मध्ये काम असल्याने जावे लागत होते. मीरा एकटी दवाखान्यात मुकूंदाची काळजी घेत होती. रेणूंच्या वकील सरांकडे अशी केस आली की एका माणसाला पहिली बायको तिच्यापासून एक मुलगी इतक्या वर्षानंतर पहिल्या बायकोला कळले दुसरी बायको आहे तिला एक मुलगा आहे. फसवणुक आणि घटस्फोट अशी केस होती. पहिल्या बायकोला एकच मुलगी म्हणून मुलासाठी दुसरे लग्न केले होते त्याने. रेणुकाने केस स्टडी करून पॉईंट्स काढले. अशा एक एक केस मध्ये स्त्री वरील अन्याय त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न रेणू करत होती. सरांकडून शिकत होती. मीराला घरी येऊन केस सांगितली. मीराला ऐकून धक्का बसला.


मुकूंदाला डिस्चार्ज मिळाला. पथ्य पाणी, वेळेवर जेवण, प्राणायाम, औषध, आणि मीरा आणि रेणुकाने घेतलेली काळजी. चहा, सिगरेट पुर्ण बंद यामुळे मुकूंदा बरा झाला होता. रेणुकाने बाबा साठी वेलकम करून घर सजवले. मीराने तूकडा पाणी ओवाळून टाकले.

हरतालिका आणि गणपती सण तोंडावर आले. रेणुकाने सूट्टी घेतली. इको फ्रेंडली पर्यावरणाला हानीकारक नसलेले डेकोरेशन रेणुकाने तयार केले. शाडूच्या मातीचा सूबक गणपती बाप्पा ची मूर्ती रेणुकाने साकारली. मुर्तीला रंग दिला. जणू मुर्तीत प्राण घातले बाल गणेश गोड रूप रेणुकाने साकारले.. मीराने बाप्पा साठी उकडीचे मोदक करायला घेतले. मोदकाच्या सुवासात घर नाहून निघाले. गणपतीची स्थापना, आरती, पूजा, धूप, दिप, फुले, दुर्वा यात वातावरण घरातील सुंदर झाले. मुकूंदाला हि बरे वाटत होते. मोदकाचा नैवेद्य बाप्पा ला दाखवला. उकडीचे मोदक सगळी पुजा होताच लगेच रेणूने मोदक फोडला त्यत साजूक तुपाची धार सोडली आणि अख्खा मोदक तोंडात टाकला. आणि टाकताच विरघळून गेले मोदक तोंडात आणि रेणू मोदकात विरघळून गेले.


क्रमशः


सौ भाग्यश्री चाटी सांबरे
©®


हि एक काल्पनिक कथा आहे. कथा आवडली तर शेअर करा. वाचकांना विनंती कृपया आपला अभिप्राय द्या.







🎭 Series Post

View all