तिचे जग भाग 6

Tiche Jag Bhag 6


तिचे जग भाग 6


रेणुकाचा अभ्यास तिने काढलेले मुद्दे, तिच्या सरांचे मुद्दे, एक - दोन शेजारी यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिले त्यांची प्रत्यक्ष साक्ष या सगळ्या गोष्टी मुळे त्या मुलीला न्याय दिला.... तिचे सासू, नवरा यात दोषी होते त्यांना शिक्षा झाली. जन्मठेप. जी जाळून गेली हे सिद्ध झाले. तिची दोन लहान मुले तिच्या आई, वडीलाकडे गेली. सत्याचा विजय होतो. सत्याला खुपच गोष्टीना सामोरे जावे लागते. त्या मुलीला न्याय मिळाला या गोष्टी मुळे आनंद स्पष्ट रेणूंच्या चेहर्‍यावर दिसत होता.


रेणुका आणि सर यांच्या प्रयत्नाने केस जिंकली. सरांनी रेणुकाचे कौतुक केले. रेणुकाने आईला, बाबांना सगळे सांगितले त्यांनाही खूपच कौतुक वाटले रेणूचे.


एकदिवस कामवाल्या मावशी आल्या नाहीत रेणुका आणि मीरा दोघींना थोडी काम करावी लागली काही काम दुसर्‍या नोकरांकडून करून घ्यावी लागली. त्या कामवाल्या मावशी तीन दिवस आल्या नाहीत. असे न सांगता न जाणाऱ्या कामवाल्या मावशी तीन दिवस न सांगता गायब झाल्या शेवटी चौथ्या दिवशी आल्यावर सांगत होत्या नवरा दारू पिऊन मारहाण करून धिंगाणा घालतो. मावशींना बरेच वळ येईपर्यंत मारले होते त्यांच्या नवऱ्याने. तो स्वतः काही काम करत नव्हता. या मावशी काम करत होत्या त्यांचे पैसे दारूत उडवत होता. तरी इतके वर्ष मावशीचा संसार सुरू होता, रेणुकाने मावशी ना बसवले चहा, पाणी दिले. 4 दिवसाचे खाडे नाही कापणार सांगितले. मावशी रडून हकिकत सांगत होत्या. वळ दाखवत होत्या रेणुका पाहून हळहळली मीरा जवळ. किती स्त्रीया जगात असा त्रास सहन करत असतील. किती अवघड आहे खरंच.. रेणुकाने व्यसनमुक्ती केंद्रात जा नवऱ्याला घेऊन असा सल्ला दिला मावशींना.



रेणुका ऑफिस मध्ये आवरून गेली. ऑफिस मध्ये एक मैत्रीण जवळची झाली होती. रेणुका आणि तिची मैत्री झाली तिचे नाव होते आरती. आरतीला रोज रेणुका तिच्या गाडीवर न्यायची आणायची. आरतीसाठी रस्ता बदलून रेणुका यायची. आरती तिला आग्रहाने घरी घेऊन गेली. आरतीला लहान चार बहिणी आणि एक भाऊ. रेणुका आणि आरतीची मैत्री हळूहळू वाढत गेली. आरती कडून बोलण्यातून, वागण्यातून, आरतीच्या घरी प्रत्यक्ष जाऊन रेणुकाला समजले. मुलगाच हवा या हट्टा पायी. आरतीच्या आईने शारीरिक व मानसिक त्रास सहन केले. दोन तीन मुलीचे गर्भ समजल्याने पोटातच असताना जन्मदात्याने मारल्या. स्त्री भ्रूणहत्या केल्या. एका लहान जिवाला मारून टाकले का तर मुलगी आहे.... स्त्री आहे म्हणून.... तरी मुलगा होईल या आशेवर पाच मुली झाल्या. त्यांच्या गरजा वस्त्र, शिक्षण पूर्ण करण्यासाठी वडीलांकडे पुरेसे पैसे नव्हते. आरतीने छोट्या मोठ्या नोकऱ्या करून आपले बरेच शिक्षण पूर्ण केले. वडीलांना हातभार लावला. पाच मुलीना कधी हौस - मौज नाही, फिरणे, शॉपिंग, पार्टी महित नाही. कपडे एकमेकींचे घालून दिवस काढायच्या. जन्मदातेच पाच मुलीशी प्रेमाने वागत नव्हते. आणि त्या मुलाला, वारसाला, वंशाच्या दिव्याचे लाड - कौड - कौतुक. पाच मुलीना शिळे अन्न. एका मुलाला साजूक तुपाची धार, बेरी. हे रेणुकाने तिच्या डोळ्या देखत पाहिले. आरतीच्या घरी रेणूचे रोज जाणे येणे व्हायचे. आरतीला गाडीवर सोडायची, आणायची बऱ्याचदा पेट्रोल शेअरिंग आरती करू शकत नव्हती. रेणु आरतीला फुकट आणायची, सोडायची. आरतीला मैत्रीणीची, मैत्रीची जाण होती. तिने शेवटपर्यंत रेणुकाशी मैत्री जिवापाड जपेन असे स्वतःला वचन दिले.



रेणुका तिच्या घरी आल्यावर मीरा आणि मुकूंदा च्या पायाच पडली. रेणुका एकुलती एक मुलगी होती तिला मुलगी मुलगा भेदभाव करत वाढवलेले नव्हते. रेणुकाला लाडाकौडात वाढवलेले. रेणुकाने रडत आरतीची कहाणी सांगितली आणि तुम्ही मला किती फुलात ठेवले, जपले याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रेणुकाच्या मनात आई आणि बाबा दोघांच्या बद्दल प्रेम, आदर वाढला होता. रेणुकाने आजीने शिकवलेला प्रसादाचा शिरा केला आणि देवाचे आभार मानले.


रेणुकासाठी एक स्थळ वधू वर सूचक वाल्यांनी सूचवले. मुकूंदा ने मीराला सांगितले. मुकूंदाने त्याच्याशी संपर्क करून व्हॉटस् अ‍ॅप वर फोटो, पत्रिका आणि बायोडेटा मागवला. गुरूजींच्या घरी मीरा आणि मुकूंदा गेले. गुरूजींना पत्रिका रेणुकाशी जुळते का विचारलं गुरूजींनी जुळते सांगितले की त्यांना दक्षिणा दिली मीरा आणि मुकूंदाने गुरूजींना नमस्कार केला. रेणुका ऑफिस मधून आल्यावर तिला फोटो, बायोडाटा दाखवून विचारले बघ आवडते का? रेणुकाने विचार करायला वेळ मागितला.

*


रेणुकाचा तारखेने वाढदिवस आला. रेणुका आता मोठी झाली होती. मुकूंदाने तिच्या लहानपणीच्या आवडीच्या लिमलेटच्या गोळ्या, बाहुल्या, जामची साखर लावलेली बिस्किटे, भातुकली, परीचा फ्राॅक सगळे रेणुकाला गिफ्ट आणले. रेणुकाने विचारले बाबा तुम्ही हे काय आणले. बाबांनी उत्तर दिले माझ्यासाठी तू माझी तिच छोटी चिमणी आहेस. पुढच्या वर्षी वाढदिवशी कदाचित लग्न करून सासरी गेली असशील मग माझ्या चिमणीच्या आवडीचे सगळे आणले. रेणु, मुकुंद एकमेकांना जवळ घेऊन अश्रूंना वाट मोकळी करून देतात. मग रेणुकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1 अनाथाश्रमात आणि 1 वृध्दाश्रमात अन्नदान मुकूंदा आणि मीरा करतात. संध्याकाळी तिघे देवीच्या दर्शनासाठी जातात. दर्शन घेऊन घरी जाऊन मीरा रेणुकाचे औक्षण करून केक कापतात. मग तिघे हॉटेल मध्ये जेवायला जातात. रेणुकाला सुंदर ड्रेस मीरा आणि मुकूंदा गिफ्ट दिलेला घालून रेणू छान दिसत असते तिघे हॉटेल मध्ये सेल्फी घेतात.रेणूंच्या वाढदिवसाच्या दिवशी दिवसभर दमून जातात. घरी जाऊन झोपतात. वाढदिवस साजरा छानच झालेला असतो. रेणुका खुपच खुश असते.


दुसऱ्या दिवशी आरतीचा वाढदिवस असतो. दोघीही छान ज्यूस सेंटर मध्ये ज्यूस घेत असतात. छान गाणे लागले असते. रेणुका तिच्या पगारातून आरती साठी एक छानसा ड्रेस घेतलेला गिफ्ट देते. 1 लॉ चे पुस्तक गिफ्ट देते. ड्रेस पाहून आरतीला वाटते इतका महाग कशाला उगाच आणला. मी असे महाग घालत नाही. बाबा काय म्हणतील. रेणुकाने सांगितले अग माझे नाव सांग मी गिफ्ट दिला आहे. आरती घरी जाऊन आनंदाने रेणुकाने दिलेले गिफ्ट्स दाखवते. वडील आरतीला रागावतात एवढे महाग.


मीरा एक दिवस बरे नसल्याने कणकण वाटत असल्याने झोपून असते. रेणुकाने ऑफिस मधून घरी जाऊन मस्त तांदळाची खिचडी, पापड, दही मिरची तळल्या, प्रवीणच आंबा लोणचे , वरून घरचे साजूक तूप, लिंबू बेत केला. मीराला आराम दिला. मीराला झोप लागली. मुकूंदा आला मीराला डोक, अंगदुखीच्या गोळ्या दिल्या. खिचडी सगळ्यांनी खाल्ली. पोटभर. बेत छान झाला म्हणून मुकूंदाने, मीराने कौतुक केले. मीरा ला नंतर जरा बरे वाटले. मीराला आराम दिल्याबद्दल मीराला विशेष कौतुक वाटले. मीराने रेणुकाची नजर काढून टाकली. मीराला बराच आराम मिळाला बरे वाटले. रेणुकाने झेंडू बाम लावून मीराचे डोक चेपून दिले. मीराला ठणठणीत झाल्या सारखे वाटले. मीराने रेणुकाचे तोंड भरून कौतुक केले. दोघी मायलेकी झोपी गेल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी मीरा ठणठणीत. आई मुलीच्या माहेरासाठी सासरी नांदत असते असे म्हणतात. तर कधी मूलीला आईची आई व्हावे लागते. लेकीची माया छानच असते. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मीराने रेणूंच्या आवडीचे पदार्थ केले. थालीपीठ त्यावर लोण्याचा गोळा, शेंगदाण्याची खलबत्त्यात कुटलेली चटणी. रेणुका खुश. रात्री झोपताना मीराने तेल मालिश डोक्याला रेणूंच्या करून दिली. मुकूंदा म्हणाला मला पण तेल मालिश करून दे. मुकूंदा ला रेणुने तेल मालिश डोकं शांत करून दिले. परीवाराने एकमेकां सोबत घालवलेला वेळ, एकमेकांच्या साठी केलेल्या गोष्टी लक्षात रहातात. मुड छानच करतात. कुटूंबातील प्रेम वाढवतात. एकमेकांच्या सोबत वेळ घालवा. कुटुंबाला वेळ द्या. क्वालिटी टाईम द्या. संस्कार, शिकवण पुढच्या पिढीला देताना सोबत घालवलेला वेळ मारलेल्या गप्पा महत्वाच्या. आपण काम, टेंशन, सिरियल, मोबाईल अशा गोष्टीत वेळ घालवतो.


क्रमशः


ही एक काल्पनिक कथा मालिका आहे. आवडली तर शेअर करा. वाचकांना मनःपूर्वक विनंती कृपया आपला अभिप्राय द्या.


सौ भाग्यश्री चाटी सांबरे
©®








🎭 Series Post

View all