तिचे जग भाग 3

Tiche Jag Bhag 3
तिचे जग भाग 3


रेणुका आणि आजी मॉर्निंग वॉक साठी गेल्या होत्या. 2 - 3 जणांनी रेणुकाला छेडत होती आणि आजी च्या गळ्यातले ओढुन पाहू लागली. रेणुकाने दुर्गा रूप धारण केले. ब्लॅक बेल्ट कमवल्याचा फायदा झाला. स्वसंरक्षण महत्त्वाचे स्त्रीसाठी. बराच चोप दिला. तिघांना पळता भुई थोडी झाली. आजीला शांत बसवले एका बेंचवर आजीने अगदी डोळ्याने सगळे बघितले रेणुकाचे रूप. कौतुक केले. आशिर्वाद दिला. धाडसी रेणुका बदल भरभरून आजी सगळ्यांना किस्सा न कंटाळता सांगत होती. रंगवून, वर्णनात्मक पद्धतीने आजी उत्साहाने, कौतुकाने सांगत सुटली होती. मीराने नजर काढून टाकली रेणुकेची. मुकूंदा ने शाबासकी देऊन पाट थोपटली.


रेणुका सतत शाळा, महाविद्यालये, ट्युशन, कॉम्प्युटर क्लास, कराटे यातच बिझी राहू लागली. रेणुका एकुलती एक, लाडात वाढलेली, अभ्यासात हुशार, कराटे ब्लॅक बेल्ट सगळे असले तरी जशी जशी लग्नाचे वय जवळ येऊ लागले आजीला वाटू लागले. रेणुकाला स्वयंपाक करता येत नाही. काहीच येत नाही. पिढ्यानपिढ्या स्त्रीयांचे कार्यक्षेत्र चुल.... आजीला वाटले रेणुकेला शिकवावे. रेणुका आजी दोघी रात्री जवळ झोपायच्या लहानपणापासून गोष्ट सांगता सांगता ऐकता ऐकता दोघी झोपायच्या. तेव्हा आजी रेणुकेला म्हणत होती रेणू माझ्या आवडीची पुरणपोळी खावी वाटते उद्या करशील का? रेणुकेला वाटले असे काय म्हणते मला काही येत नाही तुला महित आहे ना.. मला काय सांगते.. घरात आई आहे. नौकर चाकर आहे त्यांना सांग. आजी म्हणाली तेच ना त्यांच्या हातचे तेच तेच खाऊन झाले आता वेगळे तूझ्या हातचे बघू. रेणुकाने ओळखले हिला काय सांगायचे.... मला स्वयंपाक करायला लावायचा आहे तुला.. आजी म्हणाली काय हरकत आहे. शिकावे मुलीनी.. पाक कला आहे ती.. समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी छानच आहे. कोणाच्या ह्रदयात घर करायचे तर त्याचा मार्ग पोटातून जातो.... " लग्नानंतर स्वयंपाक स्त्रियांना करावाच लागतो." स्त्रीची पाठ सोडत नाही चूल शेवटपर्यंत.... स्त्रीला अन्नपूर्णा म्हणले जाते. घरातल्या नवऱ्याला बायकोच्या , पोरांना आईच्या हातचे खायचे असते. त्यात फर्माईश असतात. कधी स्पेशल कधी रोजचे स्त्रीलाच करावे लागते. स्त्रीयांना स्वयंपाक चुकतच नाही. आजी रेणुकेला सांगत होती. तु कितीही मोठ्या पदावर जा. कितीही पैसा कमव. स्त्रीला स्वयंपाक करावा लागतो. त्यात कष्ट, कौशल्य आहे. त्यामुळे समोरच्याचे मन जिंकू शकता तुम्ही. रेणु समज एखादा पदार्थ केला आणि समोरच्या व्यक्तीला आवडला त्यांनी कौतुक केले त्या सारखा आनंद नाही. स्वयंपाक करताना त्यात जीव ओतून करावा लागतो. एकाग्र होऊन मग पदार्थ चांगला होतो. स्वयंपाक करताना तु जे विचार करशील तेच अन्नात उतरतात. आपण जसे अन्न खातो तसे आपण असतो. आजी बोलत होती रेणुका ऐकत होती. आजी बहिणाबाई च्या कवितेच्या ओळी रेणुकेला सांगत होती.

"आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर"..


आधी त्रास सहन करावा लागेल. तेव्हा स्वयंपाक कला येईल. मुलीचे लग्न झाले की अन्नपूर्णा द्यायची पद्धत आहे. ज्याने अन्नाची कमी रहात नाही घरात. त्यात असाही अर्थ असेल तु त्या घरात अन्नपूर्णा हो.... खुप मोठी गोष्ट आहे. सोप नाही. स्त्रीयांना स्वयंपाक आला नाही. सासरी नाव ठेवली जातात. आई, वडीलांचा उध्दार होतो. स्वयंपाक तसा सोपा होत जातो रोज करून सवयीने. रेणुकाने सगळे ऐकून घेतले पण स्वयंपाकाची आवड तिच्यात दिसेना आजीला. आजी म्हणे आवडो, ना आवडो स्वयंपाक शिकायचा. उत्तम करायचा. पोळ्या आल्या पाहिजेत. गोल, मऊ, लुसलुशीत, टंब फुगलेल्या, घडीच्या पोळ्या यायला वेळ लागेल पण शिक हो रेणु.. आजकाल मोबाईलवर काय ते असत त्यात शिकवतात. मीरा काही तरी ऐकत होती हो. आजी पोटतिडकीने सांगत होती. रेणूला प्रश्न पडला बायकांनाच का? आजी हसत म्हणाली गाढवापुढे वाचली गिता.... आजी म्हणे उद्या पासून एक एक पदार्थ शिकायचा करायला मी शिकवेन हो रेणु..


रेणुकाला स्त्रीलाच का हे सगळे? राग येत होता. याला पर्याय नाही आजी सांगत होती. रेणुकाने स्त्रीचा हाच गुन्हा आहे की ती स्त्री आहे हे वाक्‍य रेणुच्या तोंडात ऐकून आजी म्हणाली हो स्त्रीचा जन्म अवघडच आहे. स्त्री जन्मा तुझी कहाणी....


रेणुकाला सकाळी आजीने उठवले. स्वच्छ स्नान करून देवघरापाशी नेले गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा दोघांना नमस्कार करायला सांगितला. आणि आजी ने गोडाने सुरवात करू असे म्हणत प्रसादाचा शिरा स्वतः आजी उभे राहून रेणू कडुन करून घेतला. आणि देवाला नैवेद्य दाखवायला सांगितले. रेणुकाने नैवेद्य दाखवला. आणि सगळ्यांना दिला. खुपच छान झाला होता. घरभर सुवास पसरला होता. मीरा आणि मुकूंदा दोघांच्या डोळ्यात पाणी तरळले आणि दोघांनी तोंड भरून कौतुक केले. आशिर्वाद दिला. रेणुकाला जेव्हा दाद मिळाली तिने केलेल्या शिऱ्या साठी रेणुकेला इतका आनंद झाला. तिने आजीला कडकडून मिठी मारली. आजीच्या पाया पडली आजीलाही आनंद अश्रू अनावर झाले. शिऱ्याने अजून गोडवा आणला. हा प्रसंग रेणुच्या मनात राहिला. रेणु आजीला म्हणाली उद्या काय करायचे. सगळे हसले.


रेणूचे नवनवीन प्रयोग सुरू झाले. कधी पदार्थ फसले. कधी जमले. कधी आजीच्या देखरेखीत, कधी आईच्या देखरेखीत, कधी युट्यूबवर हळूहळू सुरू झाले. आवडीचे 2-4 पदार्थ जमू लागले. रेणू तशी खवय्ये होती. तिला आवडत असलेले पदार्थ. ती युट्यूबवर चाट वगैरे स्वतःहून शिकू लागली. रेणुकाने मनावर घेतले की पदार्थ करायची. रेणुकाला आवड लागली थोडी फार स्वयंपाकाची याच श्रेय मुकूंदा ने आईला दिले. मीरा चे म्हणणे होते. मुलीना माहेरी असताना स्वयंपाक शिकवायचा कारण उद्या त्यांना सासरी जायचे. म्हणजे माहेरी आणि सासरी स्वयंपाक, शिक्षण लावायचे. मनमोकळं जगायचे कधी मुलीने.... मुलगी म्हटल की बंधने हवीत पण थोडे तरी मोकळा श्वास घेऊ द्या असे मीरा चे म्हणणे होते. मीरा चे आईचे मन होते. मीरा ला एकुलती एक मुलगी होती. ती 11 वर्षानंतर झालेली. मीरा अतिलाड रेणूचे करायची.



आता आजीला वाटले घरात नोकर चाकर आहे. घरातली कामं करायला. रेणु ला कसलीच सवय नाही. रेणूला स्वयंपाक थोडा फार येतो बाकी सांगाव. आजीने पुढे सांगू. नको लेकराला लोड नको. जाऊ दे असा विचार आजीने केला.

रेणु 18 वर्षे पूर्ण झाली. सज्ञान झाली. आजीच्या तालमीत तयार होत होती रेणू. स्त्री म्हणून आजी आकार देत इथपर्यंत आणली. आजीची तब्येत बिघडली. आजीचे अहिल्याबाई चे वय झाले होते. आजी कडुन फारसे काही होईना. आजी थकली होती आता. आजी ची सगळे काळजी घेत होते. आजीचे सगळे व्यवस्थित चालू होते. डॉक्टर, दवाखाना, गोळ्या, औषध, जेवण जरा कमी झाले आजीचे. आजी अशक्त वाटू लागली.. आजी बरी व्हावी म्हणून रेणू, मुकुंद, मीरा चे आपापल्या परीने प्रयत्न चालू होते. आजी रेणुका मातेच्या दर्शनाला जाण्याचा हट्ट करू लागली. मुकूंदा ने सगळ्यांना दर्शनाला नेले. देवीचे दर्शन छान झाले. घरी आले. आजीच्या मनाला बरे वाटले. थोडी मनाला उभारी आली. रेणुकाने आजीच्या आवडीची पुरणपोळी शिकून जमेल तितकी चांगली करायचा प्रयत्न करून आजीला खाऊ घातली. आजीला आवडली. आजीला भरून आले. नातीचे कौतुक वाटले. मुकूंदा कडे भरभरून कौतुक केले.. आजीने रात्री उशिरा आवडीचा जूना चित्रपट लागला तो पाहिला. मीरा कडून कॉफी हवी तशी करून घेतली. आजी झोपली उशिरा रात्री. सकाळी लवकर उठवू नको मीराला सांगितले. जरा झोपू दे. रात्री उशिर झाला झोपायला. मीराला वाटले ठिक आहे. मीराने, रेणुका, मुकुंद ने आजीला उठवले नाही. उशीर खुपच झाला म्हणून उठली का पहायला गेले. तर आजी गेलेली.


क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®26.1.2022.


हि एक काल्पनिक कथा आहे. आवडली तर शेअर करा. वाचकांना विनंती कृपया आपला अभिप्राय द्या.





🎭 Series Post

View all