गरम माऊ भात आणि साधे वरण त्यावर साजूक तुपाची धार आणि थोड मीठ घालून थोडे लिंबू हे स्वर्गसुख.... रेणुका हाताने कालवून. रेणुका परीला चिऊ काऊ चा घास भरवत होती. परी मोबाईल वर पेपा पेग बघत होती. आईने भरवणं यातली मज्जा आहा हा.... लहानपणी कळत नाही. रेणूकाला किंमत तर तिला मिळत नाही..
रेणुकाचा नवरा आणि दिर दोघे डबा घेऊन गेले. हे दोघे घरी नसतातच. सतत वकील, कोर्ट कचेऱ्या, तारखा.. वर्षानुवर्षे चालू. या गोष्टीमुळे देवेंद्र टेन्शन मध्ये त्यामुळे शुगर झाली. देवेंद्र या कोर्ट कचेऱ्या मध्ये वेळ द्यायला लागल्याने मुलांना, रेणुकाला, घरासाठी वेळ देऊ शकत नाही. पगार वर्षानुवर्षे होत नाही. एखाद्या नोकरीमध्ये त्रास किती सहन करावा लागत आहे. त्यात देवेंद्रच्या पदा मध्ये अडचण यायला लागली. जेल काय फरार काय. रेणूका कंटाळून गेली. रेणूकाला वाटते सहज सोपे साधे, सुंदर आयुष्य पाहिजे. वरण, भात, तुप, मीठ, लिंबू सारखे.
रेणुका दोन मुलांना घेऊन गाडीवर गेली. राज आणि परीची इंग्रजी शाळेत अॅडमिशन केली. राज सैनिकी शाळा सोडून आला. तिथे करमत नाही. आई, बाबा जवळ रहायला. शाळेतले सगळे कागदपत्रे पूर्ण केली. राजची एक मुलाखत, एक परीक्षा झाली. रेणुकाने राज कडून तयारी करून घेतली होती. आजकाल साध्या सातवीत प्रवेशासाठी इतके करावे लागते. हुश्श. शिवाय पहिलीत सुध्दा ट्युशन्स असतेच. एवढी पुस्तके काय. वह्या काय. चार - चार युनिफॉर्म काय त्यावर वेगवेगळे शुज आणि सॉक्स काय. शाळेत प्रवेश घेतला खर्च दरवर्षी, दर महिन्याला, दररोजचा अरे बापरे. एवढी मोठी लिस्ट रेणुकाच्या हातात काय काय घ्यायचे. कुठे घ्यायचे. शाळेची दुकाने ठरलेली त्याच दुकानात जाऊन घ्यायचे. महागडी दुकाने. लुट आहे. लोक कोणी एकत्र येत नाही. कोणी काही बोलत नाही. फावणार कुणाचे तरी. याला काही पर्याय नाही. शाळेच्या बसेस. शाळा मोठ्या. शाळेत कॅन्टीन सगळ्या सोयी. पैसे कमावतात कमावणारे. गरीब आता शिक्षण कसे घेत असतील. प्रश्न आहे. पुढे कसे जात असतील. जीव घेण्या स्पर्धा. कसे तयार करायचे मुलांना. शाळा झाली की ट्युशन्स ट्यूशन झाली की क्लास. वेळ नाही मुलांना. फार अवघड झाले आहे सगळे.
रेणुकाच्या मनात - आमच्या वेळी काही नव्हते. पहिली ते दहावी एवढा खर्च शाळेत केला नाही. कधीही पॅरेंट मिटींग नसायची. आई, बाबांना शाळेत खेटे घालावे लागले नाही. चांगले मार्क मिळाले आम्हाला. पासही झालो. कधीही रिझल्ट आणि परीक्षा साठी आई, वडीलांना नेले नाही. आई दहावीच्या पहिल्या पेपरला सोडायला आली होती. बस्स. मराठी माध्यमातून शिक्षण पण कधीच कुठे अडले नाही. दहावी, बारावी, डिग्रीला कॉपी नाही केली. शाळेतील शिक्षक खुपच चांगले शिकवायचे. शिक्षणाची गोडी लागली होती. महागडे अॅप नव्हतेच. उच्च वर्गासाठी ट्युशन्स लावली होती. त्याकाळी तिच महाग वाटायची मग अजून कसून अभ्यास करायचा. आधीच शिक्षण आताच शिक्षण बदलले. गुणवत्ता ती नाही. मराठी शाळेत तयार झालो. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मुलांना घेऊ शकतो. शिक्षण पुर्वी गुरूकुल पध्दतीने शिकवले जाई. आई सांगायची. पावकी - निमकी होती. आईचे कमी शिक्षण असून गणित पक्के होते. व्यवसाय एकटीने चांगला सांभाळला होता. शिक्षणपद्धतीत बदल झाले. आता एकुलता एक मूलगा लाडका असतो. त्याला मारले पालक शिक्षकांना भांडतात. आमच्या वेळी शिक्षक छडीने हातावर मारायचे. घरी कळले तर तूच काही केले असशील म्हणून घरचे परत मारायचे. खुपच मज्जा आधीच्या काळी. काही जणांना रोजचा प्रसाद ठरलेला असायचा. कधीही त्यांचे पालक येऊन शिक्षकांना काही म्हणाले नाहीत. आईच्या डब्याची अजुनही मैत्रीणी आठवण काढतात. आमचे शाळेचे दिवस छानच होते. रम्य त्या आठवणी.
रेणुकानी राजसाठी, परीसाठी आज संध्याकाळी पावभाजी बेत केला. संध्याकाळी. घरभर घमघमाट सुटला होता. रेणूका आई होती पावभाजीच्या निमित्ताने मुलांच्या पोटात बऱ्याच भाज्या जातील. अशी रेणुकाला आशा. मस्त तयार पावभाजी डिश. लाल, चमचमीत, पावभाजी वरून बटर, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू. अहाहा. बटर लावलेले पाव.
रेणुका बायको देवेंद्रची. पावभाजी छान करून अहोचा मुड चांगला करावा. नोकरीतले टेन्शन दूर रहावे. नवऱ्याला प्रेमाने जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो. बायको चांगली सुगरण असेल. चांगले पदार्थ खाऊ घालून नवऱ्याचे मन जिंकून घेऊ शकते. रेणूकाला आईने सांगितले होते. तो रेणुकाचा प्रयत्न. आधी नवऱ्याला, मुलांना खाऊ घालून त्यांना आवडले. त्यांनी छान म्हणले पोचपावती दिली की रेणुकाचे पोट आपोआपच भरणारी घराघरातील अन्नपूर्णा असते. त्यासाठी चिरणे, किसणे, वाटणे, घाटणे, शिजवणे, उकडणे तासनतास ओट्यापाशी चटके सोसणे सगळे सहन करते. रोज. आमच्या वेळी चायनीज वगैरे चोचले नव्हते.
देवेंद्रचा वाढदिवस आला जवळ - रेणुका दरवर्षी प्रमाणे याही वर्षी. चांगला शर्ट देणार ठरवून यावेळी ऑनलाईन शर्ट बुक केला. गणपती बाप्पा चा आशिर्वाद घ्यायला मंदिरात जाऊन येऊ. केक ऑर्डर देऊन ठेवली. देवेंद्रला औक्षण करून हॉटेल मध्ये रात्री जाऊया. हा प्लॅन रेणुकाने केला. अजून काय करता येईल विचार करत होती.
रेणुका आपला एक छंद आजही जोपासते. वेळ मिळाला की चांगल्या कर्तबगार स्त्रीया बद्दल काही पेपर मध्ये आलेली महिती, त्यांचे फोटो रेणुका एका रजिस्टर मध्ये चिकटवून ठेवते. आज रेणुकाचे मोठ्ठे दोन रजिस्टर भरले. त्यात देशाला सुवर्ण पदक, रौप्य पदक, कास्य पदक मिळवून देणाऱ्या खेळाडू आहे. त्यात देशाच्या पंतप्रधान आहेत. त्यात राष्ट्रपती आहेत. त्यात थोर समाजसेविका आहे. उद्योजिका आहे. लेखिका, कवयित्री आहेत. अभिनेत्री, गायिका आहे. संशोधक, डॉक्टर, वकील, आयपीएस, कलेक्टर आहे. लष्करी अधिकारी आहेत.... खुप जणी खुप क्षेत्रात नावाजलेल्या गाजलेल्या सगळ्या रेणुकानी स्त्री शक्ती, अन्नपूर्णा, लक्ष्मी, निर्मितीची शक्ती, सौंदर्य, मायेच्या माऊली, बहिणीची सावली सगळ्या एकत्र करून जपून ठेवला त्यांचा ठेवा. एक प्रेरणा देणारी गोष्ट.
रेणुकाला झोप येत नव्हती. बेडरूमच्या खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राला पहात हळूच झोप लागली आणि स्वप्नात शिरली. स्वप्नात आज तिच तिला दिसत होती. आता प्रश्न करत होती. काय स्त्री म्हणून जन्माला आली. माहेर पाहिले. सासर पाहिले. आता ऊठ तुझे अस्तित्व सिद्ध कर. थांबू तुझी स्त्री शक्ती जागृत कर. बस करून दाखव. लढ. प्रयत्नांची पराकाष्ठा कर. सासूरवास, दुष्टांचा त्रास, एकटेपणा खुपच सहन केला. आता चल. तू कोण आहेस ओळख. तूझी ओळख आहे तुला? तुझ्यातली तू आता ओळखून आता तिला न्याय दे. तू करू शकते. तू शक्ती आहे. तू दूर्गा आहे. तू लक्ष्मी आहे. तू अन्नपूर्णा आहे. तू म्हणजे कायम दुय्यम स्थान असलेली स्त्री नाही. स्वाभिमान जप. तू का कमी लेखते स्वतःला ऊठ. स्वतःची ताकद ओळख. तुझ्यातही अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, पाणी पंचमहाभूते आहे. तुझ्यात धगधगती ज्वाला आहे. ती सतत चालू ठेव. तु मायेची माऊली आहे. तशी तू स्वतः कडे बघ आणि तिला हारू देऊ नको. तिला काही चांगले करून दाखवायचे तिला स्वस्थ बसून चालणार नाही. चल ऊठ. ओळख स्वतःला. तुझा प्रवास सोपा नाही. कारण स्त्री आहे. तुला बंधने आहेत. तुला अनेक अडचणीची शर्यत पार करायची आहे. तु स्वतःला असे तयार कर. तुझ्या भात्यात सगळी शस्त्र असू देत. तूच स्वतः शक्ती आहे. तुच तुझी सोबती आहे. करून दाखव. थांबवायला येणारे आहे. तू थांबू नकोस. सुवर्णमध्य शोध. आज तुझ्यातली ती तुला सांगते ऊठ काही चांगले करून दाखव. चल. थांबला तो संपला काळ पुढे चालला. आज तुला काळाच्या पुढे जायचे बस्स. खुपच झाले. ऊठ आता उठ.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®
हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. कृपया लाईक, कॉमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा