तिचे जग भाग 32

Tiche Jag Bhag 32


तिचे जग भाग 32


रेणुकाच्या वरती राहणाऱ्या घरात जोरदार भांडणाचा कायम आवाज यायचा.बघ्याची गर्दी व्हायची. सासूबाई हाकलून लावायची सगळ्यांना. काय पिक्चर चालू आहे का? चला निघा.कारण सासूबाईंच्या दोन्ही सूना सतत भांडायच्या.. मोठी सविता लहानी ललिता दोन जावा. ते म्हणतात ना. जावा जावा उभा दावा.... त्यात सविताला 2 मुलीच म्हणून नावडती सून सासूबाईंची आणि ललिता ला 2 मूले म्हणून आवडती सून सासूबाईंची. नावडतीनी किती काहीही करा. नावडतीचे मीठ ही आळणीच. आवडतीला सासूबाईंचे कायम झुकते माप. दोन्ही सूना मध्ये सतत तूलना. एका सूनेचे लाड दुसरीचा द्वेष. कळीचा मुद्दा होता. ते म्हणतात ना.... कुरडई एका वेळी एकच तळता येते. तडतड करते तळताना. भजे एका वेळी दहा तळू शकतो. पूरूष म्हणजे भजे.. स्त्री म्हणजे कुरडई... हाहा.. जोक सपाट पण कधी स्त्रीच स्त्रीची शत्रू असते. स्त्रीया एकमेंकी मध्ये अबोला, हेवेदावे, कमी लेखणे, आपण सर्वश्रेष्ठ दाखवणे, बढाया, इगो, गटबाजी, 2 जणींचा गृप एखादीला एकटे पाडायचे, एकमेकींच्या मागे चुगल्या करणे, उगाच माघारी हिला नाव ठेव, तिला नाव ठेव हे जास्तच असते. हे किती वाईट आहे पण खरे आहे. वरती भांडणाचा आवाज. तिघींना एकत्र रहाणे शक्य नाही.


रेणुकाची कामवाली बाई रेणुकाला म्हणाली - स्वतःचे घर करा तुम्ही.


घरमालक रेणुकाच्या बाईला म्हणतात - रोज. नळ बंद करत जा भरल्यावर. उगाच पाणी वाया जाते. इकडे पाणी सांडू नको. खाली पत्र्यावर पाणी आले पत्रे खराब होतात. कपडे जोरात आपटू नको दगड तिकडे ठेवू नको. फरशा फुटतील.


कामवाली बाई रेणुकाला म्हणाली - धुणी, भांडी, फरशीला जेवढे पाणी लागते तितके लागतेच. हे करू नका. ते करू नका. घरमालकांची किती बंधने.

रेणुका कामवाल्या बाईला - हो. 15 वर्षे लग्न झाल्यानंतर भाड्याच्या घरात रहाते. घरमालकांचा खुपच त्रास सहन केला आहे. घर करणे सोपे नाही. जागा घ्या बांधा. पैसा खुप पाहिजे.


रेणुका मनात - नवऱ्याचे लग्नानंतर कित्येक वर्ष पगार नाहीत. माझ्या एकटीच्या पगारात घर चालवले. कोर्ट कचेऱ्या, वकील मागे लागले त्यात पैसा खर्च झाला. जेल, फरार किती मानसिक त्रास सहन केला. सासू, सासरे, नवरा तिघांना शुगर इन्सुलिन रोज. सासू, सासरे कायम दवाखान्याचा खुपच खर्च. सासऱ्यांच्या पायात काटा गेला ऑपरेशन, सासुबाईच्या एका डोळ्याचे ऑपरेशन 1 लाख लागले. 80 हजार लेन्स मोतीबिंदू आणि काचबिंदू दोन ऑपरेशन झाले. औषधे वेगळी, डिंकाचे लाडू वेगळे. दर महिन्याला सासू आणि सासरे लाखोंचे दवाखाने, औषधे, डॉक्टर, ऑपरेशन चालूच आहे. राजला सैनिकी शाळेत खर्च केला. त्याला 10 दिवसांनी परत आणले. आता आई, वडीलाजवळ शाळेत टाकायचे परत फी, वह्या, पुस्तके, यूनीफॉर्म, बॅग खर्च. परीची शाळा सुरू तिचा खर्च. कसे स्वतःचे घर होणार?


रेणुका कामवाल्या बाईला - आमचा खर्च खूपच आहे. तुम्हाला माहिती आहे. दवाखाने, पोराची फी. गावी आहे स्वतःचे घर, शेती थोडी.


रेणुका कामवाल्या बाईला - सासू, सासरे, सासुबाईच्या माहेरी नातेवाईक यांना दवाखाना खर्च, पोरांच्या फी चा खर्च दिसत नाही. त्याबद्दल काहीच नाही बोलायचे. सगळी फॅमिली वाढदिवसाला हॉटेलमध्ये जेवली. की हॉटेल मध्ये खर्च करतात म्हणून घर होतं नाही म्हणतात. सारखे म्हणतात. हॉटेल मध्ये जेवले सूनेला स्वयंपाकात आराम मिळतो ते खुपते फारच.


रेणुकाचा नवरा आणि दिर नोकरीहून घरी येतात. दिराला गाणी मोठ्या आवाजात ऐकायला आवडतात. गाणी लावतो.


खालून घरमालकांचा आवाज - गाण्याचा आवाज कमी करा.


रेणुकाला घरमालकीणीच्या सूचना असतात - घरमालकीण काही कुटले की फरशा फुटतील. ओटा फूटेल. जिना झाडून काढा. दुसरे शेजारी भाडेकरू जिना झाडो, ना झाडो. पण रेणुकाला सारखे जिना झाड. रेणूका एकटीच कायम झाडते.


रेणुकाच्या मनात - रेणुका मुलांकरता घरी बसली. नोकरी सोडली कुठून पैसा आणायचा. घर स्वतःचे कधी होईल.


दिर आणि नवरा रेणुकाला सतत म्हणायचे - आपल्याला घर नाही करायचे. रेणूका स्वच्छ ठेवत नाही. आपल्याकडे कोण करणार नाही. काही फायदा नाही.


रेणुका नवऱ्याला आणि दिराला म्हणते - कपडे ठेवायला फर्निचर नाही. कपड्यांचा पसारा दिसतो. मुलाचे कपडे आज घड्या घाला. उद्या पसारा करतो. परीचा खेळण्याचा पसारा किती आवरा. असतोच. संपतच नाही. रेणूका दमून जाते. तरी नवरा म्हणतो तू घरीच आहे तुला कामच काय आहे? घर आवरणे फक्त घरातील स्त्रीचे काम आहे का? तसे कुठे लिहीले आहे का? घर करणे, घरासाठी राबणे यात आयुष्य जाते. सोपे नाही. यात घर करण्यात काही असले तर स्वतः केल्याचा स्वकष्टाचे, स्वबळावर केल्याचा आनंद, समाधान मोठे असते. घर म्हणजे डोक्यावर छप्पर आहे. आधार आहे. संरक्षण आहे. सुगरणीचा खोपा कसा छान वाटतो. काडी काडी जमवून करते. स्वतः चे घर स्वतः चे घर असते.


रेणुका देवेंद्रला म्हणाली - आजकाल घर करणे सोपे नाही. जागा घ्या. बांधा, फर्निचर, इंटेरियर, डेकोरेशन, पडदे, बेडशीट, गालिचे मॅचिंग. सगळ्या सुखसोयी करायच्या. पाणी, वीज, हवा, उजेड पाहिजे. वास्तूशास्त्रानुसार पाहिजे. प्रत्येकाला सेपरेट पाहिजे. पार्किंग सोय पाहिजे. सोलर बसवले उत्तम.


रेणुका देवेंद्रला म्हणाली - घराला इतका खर्च केला की जपा मग घरमालकासारखे आपणही असेच करू. आपले घर असले तर. इथे खिळा ठोकू नका. भिंतीला तडे जातील. इथे गादी गच्चीवर धोपटू नका स्लॅब ला तडे जातील.


सासुबाई रेणुकाला म्हणतात - स्वतःच्या घरासाठी बचत करावी लागते. मामे नणंदेसारखी. चिकटपणा काही नाही. तुला धुण्यासाठी, भांड्याला, फरश्या पुसायला बाई लागते.... हे सर्व खर्च कमी कर. हॉटेल बंदच.


रेणुकाच्या मनात - इकडे दार उघडे टाकायचे आणि मोरीला बोळा लावायचा.


सासूबाईं रेणुकाला म्हणतात - एवढाले शिक्षण केले काय फायदा केला. नोकरी केली असती. एकाच पीठ आणि एकाच मीठ.


रेणूका म्हणाली - चांगली नोकरी आली होती. हे म्हणाले परीला संभाळ. नको करू नोकरी.


रेणुकाच्या मनात - आधी नोकरी करत होते. सासूबाई
म्हणायच्या नोकरी करते तू तुझ्या संसारासाठी धावते. मला काय फायदा मला काढून देते का? मी करा कष्ट व्हा नष्ट. सासूबाई म्हणायच्या रेणुकाला मनात वाटते मी नोकरी करत होते एटीएम नवऱ्याकडे पिन नंबर यांना पाठ हेच पगार आला काढणार. घर भाडे फेड, किराणा फेड रेणुका फक्तं नोकरी करायची पैसे, पगार पीएफ सगळे नवऱ्याला. पाच पैसे रेणुका स्वतःला घेत नव्हती. कारण नवऱ्याचा पगार येत नव्हता. कित्येक वर्षे.


सासरे आणि सासुबाई म्हणतात - आम्हाला फ्लॅट आवडत नाही. वर आपली मालकी नाही. खाली आपली मालकी नाही. कधी वाढवावे वाटले तर जागा नाही. फ्लॅटचे दार बंद करतात. शेजारी कोण रहाते महिती नाही.

रेणुका देवेंद्रला म्हणाली - रेणुकाच्या आईच्या घराच्या पैशात जागा घेतली. ती घर बांधताना विकायची आणि तो पैसा घर बांधायला वापरायचा.


रेणुका मनात - जागा आणि घर बांधण्यासाठी लागणारा खर्च वाढतच चालला घर कधी होणार? घर बांधले. घरातील लोकांत प्रेम, विश्वास असणे गरजेचे आहे. सगळे एक. रेणूका एकटी आहेच. रेणूकाला कविता आठवली -


घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी

या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती


परी रोज तिचे घर बनवते उश्या, लोड लावून छानच घर बनवते. आपली आपली खेळत आनंद घेत असते घर बांधल्याचा. परीचे घर पुर्ण होते रेणुकाच्या बाजूने. परी म्हणते आई तु माझ्या घरात आहे. कसे आहे. रेणूका म्हणते छानच. सगळे असेच सोपे असते तर काय बहार येईल. हाच काय तो बाल आनंद. निरागस, निष्पाप.क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®


हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. आवडली तर शेअर करा, लाईक करा. कथा कशी वाटली कमेंट करून सांगा प्लीज.
🎭 Series Post

View all