तिचे जग भाग 23

Tiche Jag Bhag 23


तिचे जग भाग 23


सगळे गावी आले आहे. सासूबाईच्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे असते. काचबिंदू आणि मोतीबिंदू चे गावातून त्या जिल्ह्याच्या गावी जायचे तिथे ऑपरेशन करून घरी गावी यायचे. दिवस जातो. ऑपरेशनचा नंबर लागायला, यायला आणि जायला. 2 पोरं, सासरे आणि रेणुका घरीच असतात. रेणुकाचा नवरा, दिर आणि सासूबाई तिघे इर्टीगा कारने ऑपरेशनसाठी जाणार असतात.


सासुबाई रेणुकाला म्हणतात - मला असली काय पिन दिली परत मागू नये म्हणून.. मुद्दाम.


रेणूका सासूबाईंना म्हणते - अहो आई बॉलची महाग सेफ्टी पिन आहे. आता यात्रेत घेतलेली. नवी कोरी.


(सासूबाई पिन रेणुकाला लागेल अशी फेकून मारतात. समोर नवरा आणि दिर असतात.)

रेणुका नवऱ्याला म्हणते - तुम्ही पहा या पिनेत काय दोष आहे. माझ्याकडे होती ती चांगली दिली.
माझ्याकडची. मी यांना देणार नाही. पिन कधीच.

सासूबाई म्हणतात - काही जरूरत नाही.


दिर - आई, त्याच्याकडे होती ती दिली त्यांनी.


रेणुका म्हणते - माझा काय सेफ्टी पिन बनवण्याचा कारखाना आहे का? मला फेकून मारली.


सासूबाई रेणूकाला म्हणतात - काय झिजली का? पिन लागली फार तूला.


रेणुका म्हणते सासुबाईना - पिने पेक्षा तुमचे माझ्याशी वागणे, बोलणे जास्त लागले. खोल मनावर घाव झाले माझ्या.तुम्ही माझ्याशी पंधरा वर्षात कधीच चांगल्या बोलल्या मला आठवत नाही.


रेणुका नवऱ्याला म्हणते - या पिन प्रकरणात माझा काही दोष नाही. पाहिल आई कसे बोलतात, वागतात माझ्याशी. तुम्ही कधीही नसतात माझ्या बाजूने.

देवेंद्र रेणूकाला म्हणतो. - हो मग काय करू चपलेने मारू?


( रेणुका उठते दणादण आदळ आपट करत पोळ्या करायला लागते.)


रेणुका मनात स्वतःला समजूत घालते. आख्ख्या पृथ्वीवर आपल्या किती जवळची माणसे असतात. त्यात सगळी कशी आपल्या बाजूने असतील, खासकरून सासू, सासरे आपण असेच स्विकारली पाहिजे. विरोधक, निंदक हवे आपल्यात सुधारणा करायला.


रेणुका मनात स्वतःला म्हणते - सासूबाईंनी 2 बाळंतपण केली आपली. हे आपण विसरता कामा नये. एकावेळेस आपली आई नव्हतीच. एक वेळ आई कडून होत नव्हते. सासूबाई बऱ्याच वेळा बाळंतपण केले बोलून दाखवतात.  एका बाळंतपणात कामाला 3 बायका लावल्या. पण केले त्यांनी. जगात फक्त आपले आई आणि वडील हेच आपल्यासाठी जे करतात. त्यांना फक्त परत करावे लागत नाही. बाकी सगळी नाती उसन्या ला पासनं आहे. सासूबाईची जमेल तेवढी परतफेड या मोतीबिंदू आणि काचबिंदू ऑपरेशन मध्ये करून टाकू रेणुका विचार करत होती.


रेणुका म्हणते - फक्त सासुबाईचे डोळ्याचे ऑपरेशन म्हणून आले मी गावी. त्यांना काही नाही. नाहीतर एकटी तिकडे नोकरीच्या गावी थांबले असते तर ते परवडले असते मला.


रेणुका नवऱ्याला म्हणते -, तुम्ही एस. टी. मध्ये बसवून द्या मला मी जाईन.


नवरा आणि सासूबाई एकाच वेळी - हा निघ..


रेणुका पोळ्या करत असते. तेवढ्यात धुणी, भांडी, फरशी पुसणारी कामवाली मंदा बाई येते. मंदा माझे डोळ्याचे ऑपरेशन आहे. एक 8-15 दिवस स्वयंपाक कर बाई. मंदा बाई मला नाही जमणार.


नवरा म्हणतो - मंदा बाई पर्यंत गेले सगळे.


रेणुका म्हणते - तिच काय सगळ्या गावाला भोंगा लावून सासूबाई सगळ्या गावाला सांगतील. माझे गाराणे.


( सासूबाई, दिर, देवेंद्र बाहेर ऑपरेशन, जाणे, येणे यात दिवस जातो. बाहेरच जेवतात.)


दुपारी मावस नणंदेचा मेसेज येतो रेणूकाला बघ बर सासूबाईंचे डोळ्याचे ऑपरेशन झाले. तुझ्या वर चांगले लक्ष राहील आता त्यांचे. रेणुका हसण्यावारी रिप्लाय देते मेसेजला. रेणूंच्या एका सख्ख्या चूलत मामाचा फोन येतो.रेणूका ऑपरेशनचे सांगताच मामा म्हणतो बघ बरं तुझ्या चूका स्पष्ट दिसतील त्यांना आता.


रेणुकाचे रोजचे रूटीन / रोजचे रहाट गाडगे चालू - संध्याकाळची वेळ.. दिवे लागणीची वेळ.. रामरक्षा.. रोज म्हणायची संस्कृत शब्द उच्चार शुद्ध करायचे. ना जाणो कधी राम हाकेला धावून येईल. आपल्या हाकेची आर्तता आणि आपले पुण्य कमी पडत असेल. कधी तरी राम येईल. याच आशेवर. दिराला रंगेहात पकडणे शक्य होईल. झोप इतकी वैरी झाली. "जो सोवत है | वो खोवत है |" सगळ्या देवांना, संत यांचा धावा करायचा.... रेणुकाच्या मनात हे चालवायचे.


" वद जाऊ कुणाला शरण गं....
करील तो हरण संकटाचे...."


सासू, देवेंद्र, दिर घरी आल्यावर. पोरं उड्या मारतात. काका, बाबा, आजी आले. स्वयंपाक तयार आहे. सासरे कोणाशी तरी काही तरी बोलतात. किती वेळचे त्यांना जेवायला चला रेणुका म्हणते ते येत नाही. ताट पाणी घेतले आहे.


रेणूका म्हणते - अर्धा - एक तास झाला. ते जेवायला येत नाही. कोणाशी काय बोलतात काय माहित.


देवेंद्र म्हणतो रेणूकाला तू बैस जेवायला.


रेणुका जेवायला बसते.

(परी हट्ट धरते मी बाबांच्या हातूनच जेवणार. मला हि भाजी नको मटकी पाहिजे.)


देवेंद्र थोडीशी प्लेटभर मटकीची भाजी साधी सपक लहान परी साठी बनवतो. खाऊ घालतो.


( इतक्यात सासरे येतात. जेवणाच्या ठिकाणी त्यांच्याकडे आलेली माणसे जातात.)


सासरे रेणुकाला रागावतात - माझ्याकडे माणसे आली. मला जेवायला बोलवायचे नाही. मी बोलत होतो ना.

रेणुका स्वयंपाक करताना नेहमी - बाबा महाराज सातारकर हरीपाठ, रामरक्षा, विष्णु सहस्त्रनाम मोबाईल वर लावून ऐकणार म्हणजे ऐकणारच. संस्कृत शब्द उच्चार शुद्ध करायचे, विष्णु सहस्त्रनाम पाठ करायचेच. बऱ्यापैकी पाठ झाले होते.

रेणुका म्हणते सासऱ्यांना - मी स्वयंपाकघरात मला काय महित? बाहेर कोण आले? तूम्ही काय बोलतात? ती माणसे काळी का गोरी पाहिली नाही. स्वयंपाकघर कुठे. तुम्ही कुठे बसलेले. आत काही कळत नाही. आंतर किती.


सासरे म्हणतात रेणुकाला - तू काही बोलते. या बोटाच या बोटावर करते.


रेणुका सासऱ्यांना म्हणते - तुमची जेवणाची वेळ, इन्सुलिन घ्यायची वेळ.


सासरे म्हणतात - तू कधी माझी वेळ पाळते.


रेणुका म्हणते - अर्धा ते पाऊण तास झाला तुम्हाला बोलावते जेवायला.


सासरे तू काही बोलूच नको माझ्याशी.


रेणुका देवेंद्रला सांगते - या टि. व्ही च्या बोर्ड जवळ शॉर्ट सर्किट झाले. तड तड तडी सुरसुरी झाली. बोर्ड बंद पडला. तिथे करंट होता. त्या बोर्डाला मोबाईल चार्जिंग होईना, टिव्ही नाही दिवसभर, पाणी आले तर मोटार नाही. पाणी नाही घरात. वरच्या टाकीत पाणी नाही. भांडी घासायचा नळ बंद पडला कशीबशी भांडी झाली. बाथरूम मधले दोन जोडून हौद हातभर खाली गेले. धुणे धुवायला मंदा बाईना नळीने शेवटी सासऱ्यांनी पाणी काढून दिले. प्यायचा तांब्याच्या हंडा घासून आला तो रिकामा.... पाण्याचा प्रश्न आहे.


सासरे चिडून रेणूकावर डाफरत - बघू उद्या पाणी नाही भरायचे. पुरते का नाही उद्या. तुमच्या नोकरीच्या गावी भाड्याच्या घरात पाणी कसे मोजून वापरतात.


देवेंद्र म्हणतो वडीलांना - तिकडे कधी मोजून वापरतो.


रेणुका देवेंद्रला म्हणते - सासरे / बाबा आता उगाच रागावतात माझ्यावर. मला राहू द्यायचे नाही इथे. नको करून पळवून लावायचे.


देवेंद्र म्हणतो रेणूका - जाऊ दे तू शब्द सुध्दा बोलू नकोस.


सासरे म्हणे - दिवसभर एक शब्द तरी बोललो, रागावलो मी तुला.


रेणुका म्हणते आता - जेवणा वरून, पाण्या वरून बोलत आहे.


रेणुका देवेंद्रला सांगते - भाजीला काही नाही. बेसन पीठ संपलेले. पिठलं करावे तर. डबा घासून आला बेसन पीठाचा. परी म्हणते मटकी पाहिजे. तुम्ही येताना आणली म्हणून बरे. म्हणून येताना भाज्या आणा. मी तुम्हाला आठवणीने फोनवर सांगितले होते. शेवटी कांद्याची भाजी केली.


रेणुकाने जेवणाचे आवरून घेतले. काढ घाल. झाक पाक करून. झोपायला अंथरूण टाकली. बाहेर ओट्यावर उन्हाळ्याचे दिवस. दमणूक झाली दिवसभर. शेवटी सासूबाईंचे एका डोळ्याचे दोन ऑपरेशन झाले. मोतीबिंदू आणि काचबिंदू यशस्वी.. 


क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे.
©®


हि एक काल्पनिक स्त्रीवादी कथा मालिका आहे. वाचकांना विनंती तुमची कॉमेंट लाख मोलाची आहे. कॉमेंट नक्की द्या. कथा मालिका आवडली तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा.

🎭 Series Post

View all