तिचे जग भाग 22

Tiche Jag Bhag 22


तिचे जग भाग 22


रेणुका देवेंद्रच्या मागे लागली होती शुगर चेक करा. देवेंद्रला इन्जेक्शनची भिती. देवेंद्र किती वर्षापासुन चालढकल करीत होता. शेवटी आज सकाळी उठताच देवेंद्रला पाठवले रेणुकाने लॅब मध्ये जेवणाच्या आधीची चेक करायला. मग जेवण झाले त्यानंतर दोन तासांनी परत चेक करायची जेवणानंतरची


अखेर देवेंद्रला शुगर आहे समजले. डॉक्टरांकडे रिपोर्ट दाखवल्या नंतर त्यांनी गोळ्या, रात्री इन्सुलिन दिले.


सासुबाई मुलाच्या अति काळजी दाखवत रेणुकाला म्हणाल्या ( देवेंद्र समोरच ) - तुझ्या मुळेच शुगर झाली.माझ्या मुलाला.


रेणुका सासुबाईना प्रश्न करते - का माझ्यामुळे कसे काय? मी काय केले?


सासुबाई रेणुकाला - तुच टेन्शन देते त्याला. सारखी.

रेणुका सासूबाईना देवेंद्र समोरच म्हणाली - म्हणजे यांच्या नोकरी मध्ये काही चूक नसताना. हे 2 वेळेला 8-8 दिवस जेल मध्ये गेले. यांना वर्षानुवर्षे पगार नाही. हे फरार होते. आपले आख्खे कूटूंब फरार झाले होते. याचे टेन्शन नाही. मीच टेन्शन देते. देवेंद्रच्या आई आणि वडील दोघांना शुगर आहे. दोघांनाही सकाळ आणि संध्याकाळ इन्सुलिन आहे. यांना अनुवंशिक शुगर आली आहे. की मी टेन्शन दिले.


रेणुका पुढे सासुबाईना म्हणाली - काहीही वाईट झाले की रेणुका मुळेच.. रेणुका फार सोपी आहे. सॉफ्ट टार्गेट आहे. टार्गेट करायला. कॉर्नर करायला. कारण ती स्त्री आहे. कारण रेणुका सून आहे.


देवेंद्र सासूबाईना म्हणाला - शांत बस ना. जाऊदे.


लहान दिर आला रेणुकाला म्हणाला - मी BP ( blood pressure) रक्तदाब तपासला. मला डॉक्टरांनी एक गोळी सुरू केली. तुमच्या मुळेच मला गोळी मागे लागली.


रेणुका लहान दिराला म्हणाली - वा छान. हा लहान दिर लग्न झाल्यापासून माझ्या पाचीला पुजलेला आहे. याचा मला इतका त्रास आहे. याला रक्तदाब गोळी माझ्यामुळे सुरू झाली.


रेणुकाला संताप अनावर झाला होता ती लगेच उत्तर देत होती. रेणुकाची तळपायाची आग मस्तकात गेली होती. राग आला किंवा रेणुकाला सगळे काम उरकता करता रोज जेवायला दुपारी एक वाजत होता. तोपर्यंत काही खात नव्हती अशा कारणाने रेणूकाच्या अंगाचा कायम थरकाप होत होता. रेणुकाला कोणी दवाखान्यात नेत नव्हते. स्त्रीया आधी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. सासरची माणसे फार काळजीने रेणुकाला दवाखान्यात नेतील असे कोणी नाही.


सासुबाई रेणुकाला म्हणाल्या - रेणुकाचा अंगाचा थरकाप होतो म्हणून तिला तू तूझ्या आई वर पडली. काय थरथर कापते या वयात म्हणून हिणवत होत्या.


रेणुका देवेंद्रला म्हणाली - हा लहान दिर सतत वाटेल तसे बोलत असतो. मला चिडवत असतो. याचा फेमस डायलॉग " मी वहिनी तुम्हाला चिडवतो. तुम्ही एका मिनीटात मला मारायला माझ्या अंगावर धावून याल पहायची का गंमत." हा चिडवतो. माझ्या पूर्ण अंगाचा थरकाप होतो. सारखा.


देवेंद्र एक नाही दोन नाही. काही बोलला नाही.


रेणुकाच्या मैत्रीणीचा फोन - रेणुका तूला बोलायला वेळ नाही. भेटत नाही. काय झाले.


रेणुका मैत्रीणीला फोनवर - सासुबाई आणि सासरे यांना सारखे दवाखाने. तालुक्यातील गावी, देवेंद्रच्या नोकरीच्या गावी, नाशिक मध्ये. पुण्यामध्ये.. स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे.. शुगरसाठी, रक्तदाबासाठी, झोप येत नाही म्हणून, मोतीबिंदू आणि काचबिंदू साठी.. गूडघे दुखतात म्हणून.. उलटी झाली म्हणून.. पिशवी भरभरून गोळ्या सासूबाईच्या आणि सासऱ्याच्या. आता सासूबाईचे नवीन दुखणे सुरू झाले खांदे दुखतात.. शुगर शोल्डर.. खांद्यात इंजेक्शन घ्यावे लागते. खांद्याची गादी फाटली. तांब्या उचलत नाही. सासूबाई झोपूनच आता सगळे घरचे मी एकटीने करायचे. नोकरी सोडून दिली. 2 मूल घरचे काम, स्वयंपाक, झाडलोट, पाण्याचे हंडा कळशी घास, पाणी भरा, गॅस ओटा धुवा. जिना झाडून काढा. सणवार सगळे आहे कूलाचार करा. धुणी भांडी घरीच मीच करते. गृहिणी झाले आहे. बिनपगारी, फूल अधिकारी. एक दिवस सुट्टी नाही गृहिणीला. वर तू घरीच असते. तुला काय काम आहे.


मैत्रीण रेणुकाला विचारते फोनवर - तुझे सासू, सासरे दोघे दुसऱ्या गावाला आहे न.


फोनवर रेणुका मैत्रीणीला म्हणते - तसे काही नाही. दर महिन्याला येतात. 10 -15 दिवस. दवाखाने किंवा सासुबाईच्या माहेरचे नातेवाईक भरपुर काही ना काही कार्यक्रमासाठी येतातच. नाहीतर आम्ही सासरी गावी जातो.


रेणुका मैत्रीणीला - 4 व्हिलर / चारचाकी गाडी इर्टिगा घेतली आहे. 7 जण बसतो आम्ही. यांचा पगार चालू आहे.


मैत्रीण म्हणते फोनवर - वा छान. पार्टी पाहिजे रेणुका.


रेणुका म्हणते - हो. नक्की. ये तू इकडे माहेरी.


मैत्रीण रेणुकाला फोनवर - सासू आणि सासरे सोडत नाही माहेरी. मी तिकडे आले. सासूबाई वर पडतात कामे. माझ्या नवऱ्याला चहा सुद्धा येत नाही करायला. सगळे आयते हातात लागते. मी माहेरी आली की पंचाईत होते. मग माझे माहेरी येणेच बंद.


मैत्रीण रेणुकाला म्हणते फोनवर - लग्न आई आणि वडीलांनी करून दिले. कुठे अडकलो यार आपण. आपले लग्नाच्या आधीचे दिवस काय भारी होते रेणुका. पिक्चर, बर्थडे पार्टी, गिफ्ट, कोणते कोणते डे, आपला गृप, ट्रिप, परीक्षा, सगळी नुसती धमाल.. स्त्रीला लग्न म्हणजे शिक्षाच आहे. किती जवाबदाऱ्या. कितीही काम करा. सासरी सूनेच कौतुक शक्यच नाही. सासूरवासच सासरी स्त्रीच्या नशीबात. सासू एकदा तरी दाखवतेच कि मी सासू आहे.


रेणुका मैत्रीणीला फोनवर - खरचं आहे तुझे.


मैत्रीण रेणुकाला फोनवर म्हणते - मला माहेरी नाही सोडत. माझी नणंद मात्र मस्त माहेरीच जास्त असते. तिचे सासू आणि सासरे दूसरीकडे रहातात. हे वेगळे निघाले. सासरी नणंदेच्या करता वेगळे नियम ती मुलगी आहे. माहेरी आली. मला वेगळे नियम. मी सून सासूरवाशिण.


मैत्रीण रेणूकाला फोनवर - कंटाळून गेले मी.


रेणुका मैत्रीणीला - काय करणार जे आहे ते आहे.


मैत्रीण - किती त्याग करीअर चा, नोकरीचा. एवढे शिक्षण घेतले काय फायदा झाला. घरचे किती करा किंमत नाही. किंमत शून्य भोपळा नुसता.


रेणुका मैत्रीणीला - अगं नोकरी मी केली. काही उपयोग नाही. 10 - 12 तास बाहेरचे करा. घरी आल्यावर घरची कामे करा. स्त्रीयांना चूल आणि मूल चुकतच नाही. सणवार करा. माझ्या नवऱ्याचा पगार. होत नव्हता. एटीएम कार्ड त्यांच्या कडे. त्यांनाच पिन नंबर पाठ. मला लक्षात नाही. तेच पगार काढणार घर भाडे फेडणार, किराणा, गॅस सगळे तेच बघणार. माझा पगार माझ्या हातात नाही. मी पाच पैसे स्वतः साठी खर्च केले नाही. सासूबाई म्हणत होती. नौकरी करते तर काय उपकार करते. तू तूझ्या संसारासाठी करते. मला पैसे काढून देते का? सगळे सणवार, घरचे सगळे करावेच लागते. तारेवरची कसरत. नोकरी करा तिथे वेळ पाळा. बॉसिंग, बॉसची बोलणी खा. बाहेर आणि घरी नुसते काम करा. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे. एवढे करूनही शून्य.


मैत्रीण रेणुकाला फोनवर म्हणाली - स्त्री म्हणून जन्माला येण वाईट आहे. काही तरी पाप आहे.


रेणुकाला नवरा म्हणतो - इतक्या वेळ फोनवर. बस कर कामे पडली आहे. परीला भूक लागली खाऊ घाल तिला.


रेणुका मैत्रीणीला बरं ठेवते फोन.


मैत्रीण रेणुकाला फोनवर म्हणते - हो. माझी पण कामे पडली आहे. बोलतील तूला आणि मला. फोनवर बोलण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. आपण मैत्रीणी बोललो की तेवढेच बरे वाटते गं. करत जा फोन वेळ मिळाला की.


रेणुका फोनवर मैत्रीणीला - ओके. बाय.

मैत्रीण फोनवर - बाय.


दूसऱ्या दिवशीच रेणूकाचा वाढदिवस असतो. रेणुकाला आठवते. रेणुका कोणाला म्हणत नाही.
सासरी कोणालाही लक्षात नसते. कोणी तिला साध्या शुभेच्छा देत नाही. जवळच्या चार मैत्रीणी व्हॉटस् अ‍ॅप वर शुभेच्छा देतात.


क्रमशःसौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®


हि एक काल्पनिक कथा मालिका आहे. आवडली तर शेअर आणि लाईक करा. कृपया कथा कशी वाटली कॉमेंट करून सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all