तिचे जग भाग 20

Tiche Jag Bhag 20


तिचे जग भाग 20


रेणुकाची घरी भेटायला आलेली जिवलग मैत्रीण किमया. जी घरी नको आता बाहेर भेटू म्हणणारी रेणूका आणि ती बाहेर भेटतात. एका हॉटेल मध्ये.


किमया रेणुकाला म्हणाली - तुला भेटून मनमोकळं बोलायचे होते रेणुका. आज योग आला. मैत्रीणीना लग्नानंतर भेटायला योग यावा लागतो. मी माहेरी आले की तु सासरी गावी गेलेली असते. नाहीतर मुलबाळ तुला तुझे काहीतरी असते.


रेणुका आपल्या सोबत परीला आपल्या मुलीला घेऊन आली होती. तिला डोसा भरवत होती आणि तिला मोबाईल वर लहान मुलांच्या कविता, बडबड गीत पाहत परी खात होती.


रेणुका म्हणाली बोल बिनधास्त किमया काय म्हणते.


किमयाच्या डोळ्यात पाणी तरळले ती पुसत म्हणाली - अगं लग्नाला 5 वर्षे झाली पण मुलबाळ नाही. तुला महिती आहे. माझा पाळी चा प्रॉब्लेम होता. त्यात माझ्या वडिलांनी दवाखान्यात खूप पैसे घातले पण डॉक्टर आणि आजचे नवीन विज्ञान पण सांगतात मला बाळ होणे शक्य नाही. आमचे एकत्र कुटुंब. सासुबाई, सासरे, मोठ्या नणंदा, मोठ्या जावा येता - जाता त्यावरूनच सारखे बोलतात. टोमणे मारतात. खुपच लागतात माझ्या मनाला. सासूबाई आणि सासरे माझ्या नवऱ्याला म्हणतात तु हिला घटस्फोट दे. नवीन दूसरे लग्न कर. किमयाला रडूच कोसळले.


रेणुकाने तिला कसेबसे सावरले. रेणुकाने विचारले - किमया नवरा/अहो काय म्हणतात.


किमया म्हणाली - नवरा घटस्फोट घ्यायला नाही म्हणतो. मला शब्दाने कधीच दुखवत नाही माझा नवरा.


रेणुका म्हणाली - मग झाले तर. नवरा आहे ना तुझ्या बाजूने भक्कम ऊभा.


किमया म्हणत होती - स्त्रीया फक्त मुलांना जन्म देण्यासाठी. याच्या वंशाला दिवा देण्याचे मशीन आहे का? नाहीतर मशीन मोडीत काढा.


रेणुका कडे काही शब्द नाहीत.... रेणुकाला मैत्रीणीचे दुःख कळत होते.


किमया रेणुकाला पुढे म्हणाली - अशी काही किमया व्हावी आणि मी आई व्हावे. मला सुद्धा वाटतेच गं. मला हवे आहे. पण माझ्या हातात नाही. मला दुःख आहे आणि त्या दुःखाला मलम तर नाहीच. वर परत जगाची बोलणी त्या जखमेवर मीठ चोळतात. मी काय करू? स्त्रीचा जन्म फारच अवघड आहे. स्त्री जन्मच वाईट आहे.


रेणुका किमयाला म्हणते- तुझा नवरा आहे तुझ्या सोबत. बस्स. मोठी गोष्ट आहे. जरा खंबीर कर मनाला. सोपे नाही. रामाचे नामस्मरण करत जा. रडू नकोस.


रेणुका किमयाला पुढे म्हणाली - अशी काही अनाथ मुल आहेत ज्यांना आई आणि बाबा हवे असतात.


किमया रेणुकाला म्हणाली - हो. माझा नवरा आणि मी दोघेही तोच विचार करत आहोत.


रेणुका म्हणाली - एका अनाथ मुलाला तु जर घर, नाव, शिक्षण, कपडे, खाणं - पिणं, आई आणि बाबा ची माया देऊ शकली तर किती पुण्याचे काम आहे. एकाचे आयुष्य सुधारते तु. खुपच मोठी गोष्ट आहे.


किमया रेणुकाला म्हणाली - तुझ्याशी बोलून मनमोकळं होत रेणुका. तु माझी जिवलग मैत्रीण आहे.


रेणुका म्हणते - हो मग.


किमया रेणुकाला म्हणाली - मी माहेरी आले. माझ्या माहेरी आई, वडील, भाऊ, काका, काकू सगळे आहे माझ्या सोबत. वडील आणि भाऊ खुपच पैसे लावतात दवाखान्यात मला.


रेणुका म्हणाली - मग काय भरपूर सपोर्ट आहे तुला. उगीच रडते वेडी. रेणुका म्हणाली माझ्याकडे बघ मला आई, वडील, भाऊ, माहेर नाही. तूझ्या कडे आहे. तू स्वतःला भाग्यवान समज. खुश रहा किमया. रेणुका म्हणाली आपल्या कडे काय आहे. ते पाहून यात आनंद मानायचा.


दोघी हात हातात घेऊन हसतात. निघतात हॉटेल मधून बील देऊन.


रेणुकाने मनात विचार केला मी माझ्या राज आणि परी कडे पाहून आनंद मानला पाहिजे. माझी आई मीरा परीच्या रूपात परत आली आहे. किती प्रेम आणि माया लावते परी मला. मुलीची मायाच वेगळी असते. जे आपल्या जवळ आहे त्यात आनंद मानायचा रेणुका स्वतःला समजावत होती..


रेणुका विचारते किमयाला किती दिवस आहे माहेरी.


किमया म्हणते परवा जाणार.

रेणुका म्हणते किमया ला - काहीही प्रॉब्लेम आला. काही सांगावे वाटले फोन करत जा.


रेणुका आपल्या सगळ्या प्रॉब्लेम सांगायला डायरी चा आधार घेत होती जे असेल ते डायरी मध्ये लिहायचे. फारतर जवळच्या 3 मैत्रीणीला सगळे सांगायची.


रेणुका, देवेंद्र, राज, परी, लहान दीर, सासू सासरे, कनक भाची सगळे गावी यात्रेसाठी जातात. महादेवाची यात्रा असते गावी. गावी घराला लागून महादेवाचे मोठे मंदिर आहे.


सासुबाई रेणुकाला म्हणाल्या नैवेद्य दाखवायचा आहे लवकर कर सकाळी - महादेवाला साधा भात, वरण, पिठले, पोळी चा नैवेद्य. साधा भोळा सदाशिव. राग आला तर तांडव करणारा महादेव. जागृत देवस्थान आहे.


रेणुका सगळा नैवेद्य केला की सगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नैवेद्य दाखवला जातो.


सासुबाई रेणुकाला म्हणाल्या - संध्याकाळी दारात मैदानात छोटी छोटी दुकाने लागतात. बांगड्या, पिना, माळा, नेकलेस, खेळणी, खाण्याचा खाऊ शेव, फरसाण, गरम जिलबी, पेढे.... काही स्वस्त आणि मस्त.. गावातल्या स्त्रीयांना तेवढाच दिवस मनसोक्त आनंद शॉपिंगचा. काही चटकदार पाणीपुरी खाण्याचा.


रेणुकाच्या तिच्या भाचीला सांगते - खरचं या गावातील स्त्रीयांना रोज शेतात काम करा, पेरणी, खुरपणी, काढणी. ऊन्हात - तान्हात.... घरची कामे सगळी करा, धुणी, भांडी, स्वयंपाक, झाडलोट, सडा, रांगोळी..... ऊन्हाळ्यात वाळवण खारोड्या, कुरड्या, पापड करा.... गाय, गोर्‍या, कालवड, शेळी यांचे चारा - पाणी, शेण काढा, दूध काढून पाठवा. पोर बाळ, नवरा, एकत्र कुटुंब सगळ्याचे करा.... हेच आयुष्य गावातील स्त्रीयांचे. स्त्रीला फक्त कष्टच करा. माझ्या सासूबाईंनी हेच केले. या गावी नदी, पाट, धरण जवळ म्हणून पाण्याचे सुख. नळाला पाणी येत घरात. नाहितर काही ठिकाणी बायकांना पाणी लांबून डोक्यावर, कंबरेवर हंड्याने भरावे लागतात. शिक्षण कमी. परिस्थिती मध्यम किंवा चांगली असली तरी. यांच्या हातात पैसे नाहीत. यांना अर्थिक स्वातंत्र्य नाही.


भाची रेणुकाला म्हणाली - खरचं गावातील स्त्रीयांचे आयुष्य अवघडच आहे.


रेणुका म्हणाली भाचीला - तसे स्त्री म्हणल तर कुठली असो कठीणच आयुष्य. रांधा - वाढा - उष्टी काढा. चुल आणि मूल पहा.. आपण म्हणतो काळ बदलला पण स्त्रीयांच्या बाबतीत नाही बदलला काळ. विं. दा. करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी आहेत
चिर चिर चिरा.. किस किस किसा.. मर मर मरा..


रेणुका पुढे भाचीला म्हणाली - सासऱ्यांचे जेवण करण्याचे नियम फारच कठीण आहे. ते सासुबाई आणि मला पाळावेच लागतात.

भाची म्हणाली काय आहे नियम.


रेणुका सांगते - सासऱ्यांना सकाळी आणि रात्री ठरलेल्या वेळीच. पोळी आणि भाजी ताजीच पाहिजे. सकाळची संध्याकाळी चालत नाही. नुसती पोळी भाजी चालत नाही. सोबत चटणी, कोशिंबीर, कांदा, काकडी, गाजर काप पाहिजे. प्रत्येक भाजी ठरलेल्या पध्दतीने केली पाहिजे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजी पाहिजे. समजा लाल भोपळ्याची भाजी करायची. त्यात मेथी दाणे फोडणीत घालून केलेली पाहिजे. त्यात गुळ पाहिजे पण जास्त नाही. त्यांना शुगर आहे. भाजी खुप शिजलेली नको. त्यांना पथ्य पाणी हि भाजी चालत नाही. ती भाजी चालत नाही. त्यांना भात चालत नाही. खिचडी चालत नाही.


भाची म्हणते बापरे.. हे रोजच..


गावी सेपरेट बेडरूम नाही. रेणुका, देवेंद्र, राज, परी, भाची कनक बाहेर ओट्यावर झोपतात. ऊन्हाळा आहे. ऊकाडा आहे म्हणून.


गावी यात्रेसाठी आले दर्शन झाले महादेवाचे, 2 दिवस मजा आली यात्रेची भरपूर शॉपिंग केली. एक वेगळा आनंद.


रेणुका दिराला म्हणाली - आपण बासुंदीचा बेत करू या.


दिराने गावातील मित्राकडून 10 लीटर दूध आणले.


रेणुका भाचीला म्हणाली - गावी शुद्ध, चांगले दूध मिळते. ताजे. चुली मांडून दूध आटवता येत. गावी आजी सासुबाईची पितळी मोठी पातेली आहे. पातेले काळे होऊ नये म्हणून बाहेरून माती लावायची. साखर कारखान्याचे सदस्य आहेत सासरे. साखर स्वस्त आणि भरपुर उपलब्ध. बासुंदी म्हणजे बासुंदी घट्ट. काय आटल्यामुळे रंग येतो. आहा हा.. चारोळ्या, वेलदोडे, जायफळ... सुवास... मस्तच.... बासुंदी चा मनसोक्त आनंद घ्यावा तर गावीच.... त्यावर आलेली जाड साय.. ओहोहो.. वाट्या तोंडाला लावायच्या..



क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®


हि एक काल्पनिक कथा आहे. कथा आवडली तर शेअर, लाईक करा. कृपया कॉमेंट करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all