तिचे जग भाग 14

Tiche Jag Bhag 14


तिचे जग भाग 14


रेणू अशी केस पाहत होती. अभ्यासत होती. स्त्रीचा अपमान तर झालाच होता. तिचा जीव सुध्दा गेला होता. मेल्या नंतर आता न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी सगळे आरोपी पोलीसाच्या एन्काऊंटर मध्ये मारले जातात. लोक पोलीसांवर फुले उधळतात. पोलीस देव होतात.रेणुका केस पाहून खुप हालली होती. स्त्रीचा दोष इतका ती स्त्री म्हणून जन्माला आली. असा मनात विचार आला.


( रेणुका घरी आली. दमून भागून ऑफिस मधून.)


सासुबाई म्हणाल्या - आज तळी आरती, तळी पुजा करायची होती. नेवैद्य दाखवायचा होता. आटपा. मग सगळा स्वयंपाक केला भात, आमटी भाजी, पोळी, शिरा केला.


सासुबाई म्हणाल्या - रेणुका लग्नाला वर्ष होत आलं अजून मूलबाळ नाही. सुट्टी घे उद्या डॉक्टरीण बाई कडे जाऊ. म्हणून सुट्टी घेतली. सासुबाईनी देवेंद्र आणि रेणुकाचे चेक अप करून घेतले. काही गोळ्या दिल्या डॉक्टरीण बाईने सगळे ओके सांगितले. सासुबाईनी आता नातूच हवा यासाठी उपाय सुरू केले रेणू वर. रेणुकाच्या नाकपुडी मध्ये दूर्वाचा रस घालायचा. तो डाव्या की उजव्या बाजूला त्यावेळी नक्षत्र कोणते हवे सगळे सासुबाई करत होत्या. रेणुकाने तिच मत मांडले नाही तिला कोणी विचारले नाही. अजून भरपूर नियम होते मुलगा व्हावा म्हणून सासुबाई सांगत होत्या आणि रीतसर रेणूका कडून करूनच घेत होत्या.


रेणुकाने एकदिवस गुडन्यूज दिली आणि सगळे घर आनंदून गेले. आता सगळे जण रेणूकाची काळजी घेत होते. रेणुकाला सारख्या उलट्या होत होत्या. परत देवेंद्रनी रंग बदलला. यावेळी तो रेणूचे डोहाळे पुरवत होता. हा रंग देवेंद्रचा रेणूंच्या साठी सुखकर होता.


आता स्वयंपाक करताना वासाने उलट्या होत होत्या. सासूबाई वर स्वयंपाक पडेल याआधी सासू, सासरे गावाकडे निघून गेले. आता रेणुकाने पोळ्यासाठी बाई लावली.


मीराने रेणूला पाचव्या महिन्यात चोरचोळी केली. मोठ्या थाटामाटात रेणूकाचे सातव्या महिन्यात डोहाळे जेवण मीरानी केले. हिरवी साडी 4 हजारांची, फुलाचे हार, झाकलेली वाटी पेढा उघडला मग सासुबाई खुश, मोत्याचे दागिने, फोटो एक आठवण रेणुका दोन जीवाची कशी दिसते ती. रेणुका खुपच छान दिसत होती. नोकरी आणि घर दमणूक होऊन एक दिवस काही त्रास होत असतो. डॉक्टरीण बाईने चेक केले तर काही कॉमप्लीकेशन मुळे सीझर करतात. रेणुकाने मीराच्या शब्दाने धीराने तोंड दिले.. भुल देण आणि सीझर सोप नाही बाळाला जन्म देण रेणूकाचा सुध्दा पुनर्जन्म झाला आणि रेणूकाला मुलगा झाला.सगळ्यांना खुपच आनंद झाला. पेढे वाटले. नातूच झाला सासुबाईच्या मनासारखे झाले आता तरी रेणुका लाडकी होईल सासुबाईची अशी आशा रेणुकाला वाटली.


मीरा एकटी बाळंतपण करणे अवघड वाटले मीरा थकली होती. वय झाले होते. त्यामुळे सासरी बाळंतपण सासुबाईनी केले. शेक, शेगडी, लाडू, धुरी, बाळाची गुटी, रेणूंच्या खाण्यात येणारी पथ्य पाणी, रात्रीचे जागरण बाळाचे, लंगोट, दूपटी.. रेणुकाला जास्त दूध उतरले नाही आणि सासुबाईची खुप बोलणी रेणुकाने खाल्ली दूध आले नाही त्यावरून खुप अपमान रेणूकाने सहन केले.


बाळाचे बारसे, जावळ, पहिला वाढदिवस, बाळाची दुखणी खुपणी रेणूला रजा घेऊन पहात होती. रात्री जागरण करत होती. लंगोट,दूपटी धुणे. 4 महिने बाळंतपणाची रजा संपताच रेणुका नोकरी परत जायला लागली. दिवसभर सासूबाई संभाळत होत्या. 2 वर्षाचा मुलगा होताच सासुबाईनी गावाकडे रेणूचा मुलगा राज तिकडे नेला.


मुलगा रेणुका पासून शरीराने, मनाने दूरावला. 3 वर्षाचा राज इकडेच आला. तो आता सारखा तोंडावर मीरा आणि रेणुका ला म्हणायचा की मी तुझा नाही. मी रेणुका च्या सासुबाईचा, काकाचा आणि वडीलांचा आहे. मात्र मीरा जास्त लाड पुरवायची. सणवार, वाढदिवसाच्या वेळी 3 ड्रेस राजला, आम्रखंड काय श्रीखंड काय....


नोकरी आणि घर पाहणाऱ्या आईचे मोठ्ठे दुःख मुलांना वेळ न देऊ शकल्या मुळे मुल शरीराने आणि मनाने दुरावणे. अशावेळी सगळे अर्थ शून्य रेणुकाला वाटू लागले. मुलांना जाणीव असावी आपली आई आपल्या करता कमवते, आपल्या करता घरी सुद्धा काही पदार्थ बनवते. आपल्याला जन्म देणारी आपली आई आहे. पण असते उलटे.... रेणूला काय करावे कळे ना....


रेणुकाचे माहेर म्हणजे मीरा एकच मायेची, जवळची. माहेर हे फार ह्रदयाच्या जवळचे असते. सासरी नांदणारी स्त्रीच माहेरची किंमत सांगू शकते. रेणुकाने सुट्टीच्या दिवशी आईला भेटायला गेली तर देवेंद्र म्हणत होता काय आहे रोज रोज आई कडे काही खजिना ठेवला आहे का? रेणुकाने स्पष्ट माझी आई आहे मी जाणारच. तरी देवेंद्र वाद घालत होता. रोज काय आहे? एकीकडे रेणुकाचा मूलगा तिच्या पासून दूरावला. दुसरीकडे आईला भेटायला सासरची परमिशन घ्यावी लागते.


राजचा पाचवा वाढदिवस मोठा केला. नंतर मीराचा 75 वा वाढदिवस मोठा केला. केटरिंग ठरवले होते. फक्त जवळचे बोलावले होते.

यात मीरा म्हणाली रेणूला - की मी एकटी बाईमाणूस राहते. मीरा म्हणाली की दर महिन्याला ठराविक पैसे देते रेणू तुझ्या घरी रहाते. मी एकटी आहे. थकले आहे. मला होत नाही.


रेणुका म्हणाली - सासू, सासरे यांचे विचार आणि तुझे विचार जमत नाही रोज भांडण होतील. आणि आई कोणाच्या घरी गेले त्यांच्या नियमानुसार रहावे लागते. रेणुकाने देवेंद्रच्या कानावर घातले देवेंद्र नाही म्हणाला.


मीरा एकटीच रहात होती. इतक्या वर्षाची सवय पहाटे घर, आंगण झाडून, सडा टाकणे. पहाटे चार वाजता मीराची अंघोळ करून मीरा भजन ऐकणार. आदल्या दिवशी रेणुका फॅमिली सगळे मतदान करण्यासाठी गावाकडे गेले. एकदिवसाकरीता मीराला महित नाही. मीराने अंघोळीला पाणी काढले आता मीराचे हात थरथर कापत होते. पाणी खुपच गरम होते. गॅस बंद करायचा विसरली होती. गिझर बंद पडला होता. आता तिचा पाय बाथरूम मध्ये घसरला आणि त्या बादलीला लागला. बादली आडवी झाली. गरम उकळत पाणी सांडले त्या बाथरूम मध्ये पाणी साचून रहात होते पटकन पाणी जात नव्हते. त्यामुळे मीरा च्या मागच्या मांड्या, सीट सगळे गरम पाण्यात भाजल्या. मीराला हात टेकून उठावे लागे. हात भाजला. पहाटे एकटी कुठे जाणार. उजाडल्यावर तशा अवस्थेत मीराने साडी घातली रेणूंच्या घरी गेली. रेणूचे घर जवळ होते. पण घरी कोणी नव्हते. मीराला मोबाईल फोन इतका वापरता येत नव्हता. शेजारच्या बाईला हात भाजलेला दिसत होता. बाकी काही मीराने सांगितले नाही. हाताला औषध लावले. त्या बाईने मीराच्या मोबाईल वरून रेणुकाला फोन लावला. गावी रेंज नव्हती. रात्री 9 वाजता रेणूला गावाकडून येताना फोन लागला. हात भाजला इतके फोन वर शेजारच्या बाईने सांगितले. रात्री 10 वाजता रेणू, तिचा नवरा, दिर सगळे आले दवाखान्यात नेले. हाताचे बँडेज करताना मांडीवर पण शिंतोडे आहे समजले पाहिले तर मागच्या मांड्या आणि सीट सगळे भाजले रेणूला समजले डॉक्टरांनी सांगितले मोठ्या दवाखान्यात उपचार करा. पहाटे झाले. आता रात्री उशिरा उपचार मिळत आहे इतक्या वेळा मुळे जास्त त्रास झाला. वयोमानानुसार अवघड. 35% भाजली आहे. मग दवाखान्यात मोठ्या नेले. पैसे खर्च करायला फक्त रेणू आणि तिचा नवरा. मीराची थोडीच सेव्हिंग होती. रेणुकाने तिचे मंगळसूत्र, लहान मंगळसूत्र, बांगड्या मोडल्या, मीराने लग्नात दिलेला नेकलेस मोडला. सख्ख्या नातेवाईकांनी पाच पैसे मदत केली नाही. फक्त मोठ्या चूलत भावाने 45 हजार दिले. रेणुका च्या मैत्रिणी ने 50 हजार दिले.उधार. मीरा महिनाभर अति दक्षता (ICU) मध्ये होती. रोज 4 हजाराचे इंजेक्शन होते. नातेवाईक जवळचे डबा आणत नव्हते की दवाखान्यात थांबत नव्हते. याच मीराने ते दवाखान्यात असताना नातेवाईकांना डबे तयार करून भरभरून नेले होते. तेच नातेवाईक मीरा ला बघायला येत नव्हते दवाखान्यात. मीराला महिन्या नंतर डिस्चार्ज घेतला पैसा नाही आता म्हणून. 7 लाख रुपये रेणुकाने आणि तिचा नवरा देवेंद्रनीच लावले होते.


क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे.
©®


हि एक काल्पनिक कथा आहे. सर्व वाचकांना आग्रहाची विनंती आपला अभिप्राय द्या. कथा आवडली तर नक्की शेअर करा.

🎭 Series Post

View all