तिचाही आदर करा...भाग 3 अंतिम

Tialahi samsjun Ghya
तिचाही आदर करा...भाग 3 अंतिम


"मग तुला तिची एक चुक दिसली पण तिच्यातले एवढे गुण दिसले नाही का? ती दिवस रात्र तुझ्या साठी झटते याचे तुला काहीच भान नाही.  लग्ना पासुन आजतागत तिने तुझी सेवा केली. तुझ्या साठी कष्ट केले, त्रास झाला असेल तरी कधी बोलुन दाखवलं नाही. कधी तुझ्या कडे कोणत्या गोष्टींची तक्रार केली नाही आणि आज एक चुक झाली तिच्या कडून तर पटकन बोलुन दाखवलंस.

तिच्या मनाचा विचारही केला नाही कि तिला कसे वाटले असेल. ती ही एक माणूस आहे, तिच्याही कडून चुका होऊ शकतात.

कधीतरी ती तुला काही बोलली असेल तरी तिच्या मनात काही नसेल.

तुला माहीत आहे, तुला आता नको म्हणून तिने तिची आई होण्याची इच्छा सुद्धा मनात दाबून ठेवली."

हे सगळं ऐकुन महेश शांत झाला, त्याला त्याची चुक कळली.

"आजी मला माफ कर, मी असं वागायला नको होतं."

"माफी मागायची आहे तर माझी नको तिची माग."

"आलोच."


तो धावत बाहेर गेला, ती किचनमध्ये होती.
तो तिच्या जवळ गेला.


"ऐक ना."

त्याने तिचा हात हातात घेतला.


"सॉरी ग, तुला समजून घेण्यात मी कमी पडलो, मला माफ करशील प्लिज, आय एम एक्सट्रेमली सॉरी."

तिने ही सगळ विसरून त्याला माफ केलं, चेहऱ्यावर हलकी स्माईल दिली.


आय लव यु म्हणत त्याने तिच्या हातात फुलकोबीचं (बाजूला ठेवलेलं) फुल दिलं.

ती हसायला लागली.

"यावेळी या फुलाने काम चालव, पुढल्यावेळी गुलाबाचं फुल आणेल तुला." त्याने तिला मिठीत घेतलं.

"आता लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल, तुला जे हवं ते मिळेल."

तो कशाबद्दल बोलतोय तिला कळलं.

"खरंच."

त्याने होकारार्थी मान केली.

सगळं आनंदी आनंद गडे झालं.

काही महिन्याने ती प्रेग्नंट झाली, तो देखील मनाने प्रिपेअर झाला होता.

दोघांनी मिळून सगळं करायचं असं प्रॉमिस तिला दिलं.
दोघेही खूप आनंदात होते.


नऊ महिन्यानंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला, घरात लक्ष्मी आली म्हणून तो खूप आनंदात होता.
कुकुवांच्या पावलांनी तिचं स्वागत झालं.

"मी नशीबवान आहे की माझ्या घरी लक्ष्मी आली. पण यानंतर माझ्या कडून कुठल्याच लक्ष्मीचा अनादर होणार नाही याची मी काळजी घेईल.

त्यानंतर तो मात्र कधीच रुसला नाही की फुगला नाही आणि मुलीची खूप काळजी घेऊ लागला.


समाप्त:

खरचं पत्नी म्हणजे देवाने दिलेली सुंदर भेट आहे.
तिचा आदर करा, तिची काळजी घ्या.
ती तुमच्यासाठी स्वत:च घर, स्वत:ची  माणसे सोडुन येते.
तुम्हाला स्वत:च जीवन अर्पण करते. तुमची काळजी करते.

स्त्रीही एक बहीण,  बायको ,सुन, आई , सासु, ननंद, वहिनी, आत्या, मावशी अनेक  रुपं निभावते.
तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
मन जपायला हव.
एक स्त्री म्हणुन तिचा आदर करा.

🎭 Series Post

View all