Login

तिचाही आदर करा...भाग 2

Tilahi Japa
तिचाही आदर करा...भाग 2

आजी मनातल्या मनात हसली आणि त्याला विचारू लागली.

"काय रे तुझ्या लग्नाला किती वर्षे झालीत?"

"तीन.. तू असं का विचारतेस?"

"कळेल तुला."

"हम्म बोल मग."

"मला सांग तुझं लग्न झाल्यापासून ती तुझे कामे करते, तुझा  डबा बनवून देण्यापासून ते तुझ्या हातात रुमाल देईपर्यंत सगळं करते, अगदी सगळं तुझ्या हातात देते, देते ना?"


"त्याचं इथे काय आजी?"

"अरे काय म्हणजे ती तुझी सगळी कामे करते ना?"

"सगळेच करतात अग."

"अंघोळ करून आल्यानंतर तू तुझा टॉवेल सुद्धा वाळत घालत नाहीस. कोण घालतंय?"

"ती.."

"न चुकता रोज तुझ्यासाठी नवीन नवीन डिश कोण बनवतं?"

"ती.."

"तुला माहीत आहे जेव्हा तुझा बाबा आजारी असतो आणि तू बिनधास्तपणे ऑफिसमध्ये काम करत असतोस तेव्हा ती त्याची काळजी घेत असते."

कुणाला काहीही अडचण आली तरी पहिले धावून जाते.

तू नसताना घरात पाहुणे आले की त्यांचा पंचपक्वान खाऊ घालून त्यांचं स्वागत करते.


तुला आठवतंय तू आजारी होतास तेव्हा रात्र जागून तुझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या होत्या तिने.

तुझ्या प्रत्येक संकटात आणि दुःखात ती तुझ्या सोबत असते.


स्वत:च घर, स्वत:ची माणसे सोडुन तुझ्या सोबत नादांयला आलीय ती.


तू आजारी पडलास की कासावीस होते, तुझी काळजी करत असते.

तुझ्या आई बाबांची काळजी घेते.

एवढं सगळं सांभाळून, ती सर्व तुझ्या साठी करते याचा कधीतरी विचार केला आहेस."


त्याने खाली मान घातली,