तिचाही आदर करा...

Tichi hi Kalji Ghya
तिचाही आदर करा...भाग 1


तिचाही आदर करा
     तीही एक माणूसच आहे


ती आणि तो
दोघांमध्ये कडाडयाचे भांडण झाले.
अगदी छोट्या गोष्टी वरून.
हे नेहमीच व्हायचं, रोज म्हटलं तरी चालेल.

छोट्या छोट्या गोष्टींवरून चिढणे हा त्याचा स्वभाव होता.

ती सगळं विसरून घर कामाला लागली पण तो मात्र अजूनही रागातच होता.
त्याचा राग सदैव नाकावर राहत असे.

स्वतःच चिढायचं, रुसायचं आणि मग अबोला धरायचा ही त्याची जुनी सवय होती, लग्नाच्या आधीपासूनचची.

रागाच्य भरात तो खोलीत जाऊन बसला.
तोंड फुगवून खिडकीतून बाहेर डोकावत होता.

त्याला असं तोंड फुगवून बसलेलं बघून त्याची आजी आत गेली.


आजीने त्याला विचारले.

"काय झाले रे? इतका त्रासलेला का आहेस? आणि असं तोंड फुगवून का बसला आहेस?"

त्यावर त्याने तिच्या चुकीचे पाठे वाचायला सुरुवात केली.

तिच्या बद्दल काही काही बोलला.


आजी मनातल्या मनात हसली आणि त्याला विचारू लागली.


क्रमशः

🎭 Series Post

View all