"अरुण अरे तिला कशाला त्रास देतोय? मी आहे ना...फोन आण.. हॅलो, हे बघ मीनाक्षी, तू तुझ्या घराकडे लक्ष दे...इथली काळजी करू नको.."
असं म्हणत आईने फोन ठेवला आणि उलट अरुणलाच बोलायला लागली,
"अरे तुला काही वाटतं का आपल्या बहिणीला इथे बोलावताना? सासुरवाशीण आहे ती.."
"अगं आई तिच्या घरचे चांगले सुशिक्षित आहेत, त्यांना समजलं तर तेच इथे पाठवतील तिला.."
"म्हणून काय त्याचा गैरफायदा घ्यायचा आपण? ते काही नाही, मी बघेन घरातलं सगळं.."
आईने लेकीला कसलीही झळ पोहोचू न देता सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. खरं तर चांगलंच जीवावर आलेलं आईच्या, आणि लक्षातही आलं की वीणा किती काम करत असते दिवसभर..
दिवस भरभर निघून गेले, वीणाची मुलं मोठी झाली. मीनाक्षीला सुद्धा एक गोंडस बाळ झालं..तिला मूल व्हायला तसा उशीरच झालेला म्हणा...
मीनाक्षीची मुलगी वर्षाची झाली, तिचा वाढदिवस घरीच करायचा ठरला. वीणाला पावभाजी खूप छान जमायची, मग काय, वाढदिवसाच्या दिवशी वीणा दिवसभर मीनाक्षी ताईकडे असे. पूर्ण वाढदिवस साजरा होऊन भांडी धुवून झाडलोट होईपर्यंत वीणा तिथेच असायची. रात्री उशिरा घरी यायची..
मीनाक्षीच्या मुलीचा प्रत्येक वाढदिवस असाच साजरा होई, 6 वाढदिवस झाले आणि सहाही वेळा वीणाचं येणं आणि पावभाजी बनवणं ठरलेलं असायचं.
सातव्या वाढदिवसाच्या वेळी मात्र विणाच्या घरी चांगलीच धावपळ होती. तिची लहान मुलगी दहावीला, तिचा शेवटचा पेपर होता आणि मोठया मुलाला पुण्यात ऍडमिशन घेण्यासाठी अरुण दिवसभर पुण्यात मुलासोबत जाणार होता.
मीनाक्षीने नेहमीप्रमाणे फोन करून वीणाला वाढदिवसासाठी येण्याचं सांगितलं..वीणा म्हणाली-
"मीनाक्षी ताई यावेळी शक्य दिसत नाहीये.."
"का गं वहिनी?"
"मेघाची दहावी आहे, तिचा शेवटचा पेपर आहे..त्यामुळे तिला वेळेवर खाऊ घालून अभ्यासाला बसवायचं आहे...तिकडे आलो की वेळ जाणारच..मुलं काय, त्यांना गांभीर्य समजत नाही...मुलांमध्ये मिसळले की त्यांना वेळेचं भान राहत नाही..."
"आणि दादा??"
"ते उद्या रोहितच्या ऍडमिशन साठी पुण्याला जाताय.."
मीनाक्षी भडकली,
"नेमकं वाढदिवसाच्या दिवशीच कसं सगळं आलं तुमचं??"
"ताई असं काय बोलताय, दहावीच्या परीक्षा आपल्यावर असतात का? आणि ऍडमिशन ची तारीख सुद्धा वरून दिलेली असते ती पाळावी लागते.."
"ते काही नाही, दादाचं जाऊदे पण तू उद्या यायला हवं.."
"सॉरी ताई, नाही जमणार.."
******
******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा