तिचा संसार-1

नणंदेचा संसार तो संसार..
"मीनाक्षी ताई, अगं तुला यायला जमेल का गं थोडे दिवस? हिला बेड रेस्ट सांगीतलीये 10 दिवस.."

अरुण आपल्या लग्न झालेल्या बहिणीला विनवणी करत होता. कारण वेळच तशी होती. अरुणची बायको वीणा प्रेग्नंट होती आणि कालच्या तपासणीत काहीतरी गुंतागुंतीचं आढळलं म्हणून तिला बेड रेस्ट सांगितलेली.

वीणा तशी कामात अगदी अचूक आणि कष्टाळू. घरकामात कधीही कोणतीही कसूर केली नाही. आळशीपणा तिला माहीतच नव्हता. सतत काहीतरी करायची तिला सवय. रोजचा स्वयंपाक करणं तर होतंच पण सोबतच मुलांना वेगवेगळ्या रेसिपी बनवून खाऊ घालणं.. घर सुशोभनासाठी वेगवेगळ्या वस्तू बनवून बघणं, बागकाम करणं हे सगळं दिवसभर तिचं चाले. आता गरोदरपणात सुद्धा ती कुठलंही काम टाळत नसे. सासूबाईंकडून होत असताना सुद्धा त्या वीणावर सगळं सोडून निवांत झाल्या होत्या.

पण आता तिलाच बेड रेस्ट सांगितली असल्याने मोठी पंचाईत झाली. अरुणला वाटायचं की आईचं आता वय झालंय, तिच्याकडून काही होणार नाही म्हणून बहिणीची मदत त्याने मागितली...पण तिने फोनवर सांगितलं की-

"दादा अरे मला यायला काही प्रॉब्लेम नाही पण घरी माझेच मावससासरे आलेत...2 दिवस राहतील तर घरी.."

"अगं पण तुझ्या घरच्यांना काही अडचण नसणार, त्यांना ओळखतो मी..हवं तर 2 दिवसांनी ये.."

त्यांचं बोलणं सुरू असतानाच आईने मधेच त्यांचा संवाद तोडला आणि म्हणाली,

*****

🎭 Series Post

View all