Login

३०) तीचा प्रेमाचा गंध

सत्यकथा
तर..दुसरी कडे अजयचा आईची लगबग सूरू होती पापड कुरडया तीळकुड सर्व पदार्थ ती चेतनाचा मदतीने करत होती 
दोन ते तीन दिवसात ती पण काम पूर्ण झाली फक्त पापड आाणि कुरडया पाण्याचा याना दोन तीन दिवस रोज उन्हं दाखवावं लागत होत वरून कुत्र मांजर यापैकी कोणी नासधूस करू नये म्हणून लक्ष ठेवणं गरजेचं होतं
   म्हणून मग ते काम  झाल्याशिवाय दुसरं काम हातात घेता येत नव्हंत.  
दोन तीन दिवसात पापड वाळून झाले ते नीट डब्यांत भरून वर माळ्यांवर ठेवण्यांत आले.
   आता राहिला मसाला तसा संपतचं आलायं म्हणून लग्नाचा निमित्ताने तो पण बनवायला गिरणीत टाकला गेला
आता राहिलं लोचणं ते मात्र विकत आणलं गेलं.
   पापड, पेन्या, कुरडया तीळकुट(सुखी चटणी) मसाला लोणंच जेवढ लक्षात येत होतं तसं तसं अजयची आई बनवायला घेत होती.
घरात बनवले जाणारे पदार्थ बनवले गेले.अजयचा आईचं बरसं  काम संपलं होतं.
      आता घराची साफसफाई करावी म्हणून चेतना आाणि अजय दोघांनी घरं साफ केलं पुर्ण एक दिवस घराची साफसफाई चालू होती शेवटी ते पुर्ण झालं आाणि अजयने सुटकेचा श्वास घेतला.आाणि म्हणाला आता अजून एक काम बाकी आहे चेतना घराला रंग लावावा लागेल. तर...तू... सांग तूझं लग्न आहे ना कोणता रंग लावायचा होऊन जाऊदे तूझा आवडीचा. चेतनाने रंग सांगितला आाणि अजयने दोनचं दिवसात मित्रांचा मदतीने  घर रंगवून घेतलं.सर्व खुप छान चालू होतं
     अजयचा घरी मुहुर्त निघायचा आधी बरीच काम झाली होती. चेतना खुप खुश होती कारण सर्व तीचा मनाचा विचार करून तीची आवड लक्षात घेऊन केलं जात होत
      लागोपाठ काम करून अजय पण वैतागून गेला होता म्हणून पुढचे दोन दिवस काही न करता फक्त आराम करायचा म्हणून ठरवलं
     पुढचा दोन दिवसात शुभंमच्या बबांचा फोन आला. आाणि त्यांनी लग्नाचा मुहूर्त सांगितला आाणि थोडफार बोलून काँल ठेवला. आाणि बाबां सर्वांना उद्देशून म्हणाले.चला लग्नाची खरी तयारी सुरु करा तिकडच्या लोकांचा काँल होता. लग्नाचा मुहूर्त पुढच्या महिन्यात दुसर्या आठवड्यात आहे.
    शेवटी ललग्नाची तारीख ठरली. त्यामूळे दोघं खुप खुश होते. कारण या लग्न सर्वाचा सहमतीने सर्वाचा उपस्थितीत आाणि सर्वाचा आशीर्वादाने होणार होतं
पहिलं लग्न परिस्थितीमूळ कोणालाही हे लग्न मान्य नसल्यामुळे एका मंदिरा मध्ये जावून करावं त्यात हौस, मौज नव्हती फक्त त्यावेळेची गरज आाणि चेतना वर आई जाण्याची दु:खाचं सावट त्यामूळे त्या लग्नात ना आनंद होता. ना उत्साह
पण काही दिवसाने शुभंमचा बाबांनी लग्नाचा विषय छेडलाचं
शुभंम मला काय? वाटतं आता झालं ते झालं पण तुमचा लग्नाचा ना पुरावा ना अजून काही उद्या दोघांत काही झालं तर...लग्न झालंय यासाठी चार माणासांना उभ, करता येऊ शकलं एवढी माणसं तरी लग्नाला हवी


0

🎭 Series Post

View all