Login

१)तीचा प्रेमाचा गंध

सत्यकथा
अजय आणि शुभंम दोघंही घरी येण्यासाठी निघाले होते पण या सर्व झालेल्या घटनेमुळे अजय मात्र अस्वस्थ होता.
   ही मुलगी असं काय? करते हिला कोणताही मुलगा मिळेलं
माझा मागे लागून काय? मिळणार आहे हिला नाही नाही नको मी तीला समजावून सांगेन कि असा वेडेपणा करू नको रस्त्याने चालताना त्याचा मनात विचारांनी थैमान घातलं होतं शुभंम, मात्र काही न बोलता शांत चालत होता त्याला अजयची अवस्था समजली होती म्हणून शुभंम ने शांत राहाणं पसंत केलं
     थोड्या वेळाने दोघं घरी पोहचले तर... घरात सर्व गप्पा मारत बसले होते पण अजयचं चिंत काही थाऱ्यावर नव्हतं तो कोणाकडेही लक्ष न देता यंत्रासारखा त्यांचा रूम, मध्ये गेला इकडे मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं कि याला काय? झालं चेतनाने शुभंम कडे बघितलं आणि डोळ्यांने,खाणाखुणा करत विचारायचा प्रयत्न केला पण शुभंम ने नंतर सांगतो म्हणून
खाणाखुणातचं सांगितलं
     तर... इकडे अजय विचार करत बसला होता तेवढ्यात तिथे चेतना आली. आणि म्हणाली काय? रे अजय दादा काय? झालं एवढा कसला विचार करतोस तुझ्यांत आणि शुभंम मध्ये काही झालयं का?
बोलं दादा तसं काही असेल तर... मी तर आता त्या शुभंम चे दातचं पाडते सोडणार नाही मी त्याला थांब तू...
ये...ये... चेन्नई एक्सप्रेस थाबं बाबा त्याचे कशाला दात पाडतेस बिचारा तो काही नाही बोलला मला...
    मग रे... दादा असा का? विचार करत बसलास काय? झालयं सांग ना... मी तुझी लाडकी आहे ना मग मला पण नाही सांगणार  का? हा बरोबर आहे मला कशाला सांगशील ना मी कोण आहे ना तूझी चेतना बारीक तोंड करत म्हणाली.
ये नाटके लगेच बारीक तोंड नको करू सांगतो ग... मी तुला सांगणारचं होतो तूचं काही तरी करशील आता यावर मला तर... काही समजत नाही
काय? झालंय सांग बरं लवकर
चेतना ते..ते..
काय? ते.. ते करतोय बोलं ना असं अडखळत बोलतोस एवढं काय? झालंय
   चेतना.... एवढंच बोलून अजय परत बोलायचा थांबला तसा चेतनाने,त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांचा हातावर तीचा हात ठेवून घाबरू नको ना.. रे दादा काय? झालंय सांग ना मी आहे ना...चेतनाने विश्वास दिला तसा अजयने सर्व हिमंत करून सांगायला सुरूवात केली
   चेतना ती मुलगी नाही का? त्यादिवशी मोबाईल घेऊन आली होती ती..
हा ती नकचिडी तीचं काय? तीने काय? केलं तुला काही बोलली का? तुला ती
   ती ना तुम्ही त्यादिवशी महाराजांकडे गेला होता ना तेव्हा मयुरी ला बोलवायला आली होती तेव्हा तीची माझ्याकडे बघणारी नजर खुप वेगळी होती खुप प्रयत्न केलेत तीने जवळ येण्यासाठी त्यादिवशी मयुरी सुद्धा बोलली की मामा तीला तू आवडतो म्हणून पण तेव्हा मी दुर्लक्ष केलं या सगळीकडे वाटलं मयुरी लहान आहे नसेल कळत तीला काय? बोलते ते.. पण आज तर... नको ते झालं असतं ग...आणि पुरता अडकलो असतो.
  म्हणजे काय? झालंय
अग मी आणि शुभंम सकाळी गावातून एक फेरफटका मारावा म्हणून गेलो होतो तर... तिथे त्या रस्त्याला त्या अश्विनी चं घर होतं.
आता ही अश्विनी कोण?तीचं काय? मध्येचं
चेतना सांगतोयं ना... मी ऐकायचं सोडून काय? मध्ये मध्ये बोलतेसं
अरे तू अश्विनी म्हणाला म्हणून विचारलं ना...
ही तीचं मुलगी आहे तीचं नाव अश्विनी आहे ग.. माझी आई पुढे मध्ये न बोलता ऐकणार असशील तर... सांगतो नाही तर...राहू दे जा तू... इथून माझं डोकं  नको खाऊ मला आधीचं काही करू समजत नाही.
    अजयचा चिडका चेहरा बघून चेतनाने तीचे कान पकडत दादा साँरी रे... आता नाही मध्ये मध्ये बोलणार बरं तुझं बोलून होतं नाही तोपर्यंत चेतना च्या हाताची घडी आणि तोंडावर बोटं तीने अगदी लहान मुली सारखं केलं
तसं अजयला मात्र हसू आलं
त्यांने तीच्या तोंडावरचं बोटं बाजूला करत ये वेडाबाई तोंडावर बोटं ठेवायची तूला गरज नाही ग तूझां आवाज माझा गेलेला मुडं पण परत आणतो गोडं आहे माझी वेडाबाई अगदी निरागस आहे लहान बाळा सारखी तीच्या नसानसात फक्त मस्ती आणि मस्तीचं जाणवते
     हो ना... मग सांग पुढे काय? झालं ते...
तर... ती म्हणाली कि चला चहा घ्या
मी नकार दिला तर म्हणाली चला ना...
माझे आई बाबा पण बोलवत आहेत
तर मला वाटलं तीच्या आई बाबाचं मन  कशाला तोडू ना... म्हणून मग गेलो तर समजलं कि ती खोटं बोलली होती तीला मला घरात घेयाचं वेगळचं कारण होतं
म्हणजे रे... दादा असं काय? कारण होतं
ती मला म्हणाली कि माझं तुमचा वर प्रेम आहे तर... मी त्यासाठी नकार दिला तर तीने चाकूने स्व:ताचा हाताची नस कापायला प्रयत्न केला ग...कसंबसं तीला फसवून चाकू हातातून काढून घेतला पण आता भिती वाटतेय खुप असं वाटतंय उगाच आलो ग मी.. इथे घरीच बरा होतो नसती आपत झाली उगाचं
    चेतना मी म्हणंत नाही प्रेम वाईट आहे म्हणून आाणि मी दुसऱ्या च्या मुलींना नावं पण नाही ठेवतं पण मला ती आवडत नाही तसं... मी काय? जगातला एकचं मुलगा आहे का?
माझ्यावर प्रेम करायला
    अजयचं बोलणं झालं आणि चेतना म्हणाली
हो आहेस तू भारी जगात एकच मुलगा
तशी अजयने तीच्या डोक्यावर एक टपली मारली आणि म्हणाला मस्ती नको ग ..करू चेतना प्रत्येक बहिणी ला आपला भाऊ जगात भारीचं वाटतो आणि म्हणून मी तूझां नजरेत
चांगलाचं असेन पण चेतना हे पण तेवढंच खरं आहे की माझ्या कडे आहे काय? बघ.कोणावर प्रेम करून काय? देऊ तीला ती मागेलं ते आणता तरी येणार आहे का?शिक्षण आहे पण नोकरी नाही मग कशाला फसवायचं
म्हणून मी कधी प्रेमा बीमाच्या भानगडीत पडलो नाही आणि मला ते कधी करावं असं पण, नाही वाटलं
पण ही मुलगी का? माझा मागे लागलीयं चेतना... मला कोणत्याचं मुलीचं आयुष्य खराब नाही करायचं ग...तीला कोणीही चांगला मुलगा भेटेलंचं मी अजून लग्नांचा विचार पण नाही केला पण ही मुलगी इथे आल्या पासून मागे लागलीयं ती ऐकतचं नाही
बाकी काही नाही ग... मुलगी खुप छान आहे ग पण आपली परिस्थिती तेवढी चांगली नाही आणि ती तीला सांगून पण ऐकून घेईल असं वाटतं नाही काही जरी असलं तरी...पण जीवावर बेतायला नको तीच्या एवढंच वाटतं अजयचं पुर्ण ऐकून चेतना त्याच्याकडे बघतचं राहिली तसा तो म्हणाला
    काय?ग... काय? झालं अशी काय? बघत बसलीस बोलं यावर काही तरी... सर्व तर... सांगून झालं ना.. माझं
काही नाही रे दादा विचार करत होते मी त्या झिंपरीला काय? करायचं ते मी बघते तू.... आता काळजी नको करू
     आाणि काय? रे एक लक्षात ठेवं स्वत:ला कधी कमी लेखू नको तू... खुप वेगळा आहे तू... जीच्या कोणाच्या आयुष्यात जाशील ती मुलगी खुप लकी असेलं
     उदाहरण देयाचंच झालं ना तर... माझंच घे, ना मी तुला किती काय? काय? बोलते पण तू त्यांचं प्रतिउत्तर म्हणून सुद्धा काही बोलला नाहीस रे..दुसऱ्यांना बोलत असशील पण मला मात्र प्रेम आणि प्रेम देत आलास.
    एखादे वेळेस डोक्यात राग असेल तर... समोरच्या ला बोलून जातोस पण काही वेळाने तूला त्या माणसाला आपणं का? बोलून गेलो याचा त्रास पण तूलाचं होतो.

0

🎭 Series Post

View all