तिचा न्याय ( भाग तिसरा )

एखाद्या स्त्री ने जर मनात आणलं तर ती कोणत्या थराला जाऊ शकते याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.


तिचा न्याय ( भाग तिसरा )

विषय: तिचं आभाळ

त्या किर्र अंधारात तिच्या आई-वडिलांनी तिला नाहीस होताना पाहिलं आणि ते मटकन खाली बसून गेले.
ती मात्र तिरा सारखी फक्त धावत राहिली. फक्त धावत राहिली. धावताना कित्येकदा पडली. उठली. परत धावत राहिली. ती कुठे चालली आहे, काय करत आहे याचं तिला काहीच भान नव्हतं. फक्त ती धावत होती. धावता धावता समोरचा रस्ता दिसेनासा झाला. समोर दाट अरण्य आ वासून पसरलेल होतं. अचानक ती एका मोठ्या दगडाला अडखळून खाली पडली आणि पडल्याबरोबर तिची शुद्ध नाहीशी झाली.

किती वेळ ती बेशुद्ध होती. तिला काहीच कल्पना नव्हती. जेव्हा तिला जाग आली. तेव्हा ती एका झोपडीत एका अंथरुणावर झोपलेली आहे असं तिला दिसलं. जाग आल्या बरोबर तिच्या डोक्यामध्ये खूप मोठा ठणका उडाला." आई ग " असं म्हणत ती कण्हत राहीली. तिचा आवाज ऐlकून एक व्यक्ती हात आली. त्या माणसाची गळ्यापर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र
दाढी होती. चेहऱ्यावर कोमल भाव होते.

" मी कोठे आहे " तिने क्षीण आवाजात विचारल.

" तू अतिशय योग्य जागी आहेस. पण मला अगोदर सांग की तू कोण आहेस आणि इतक्या रात्री मी रात्री जंगलातून का धावत होतीस  ? " त्या व्यक्तीच्या गोड आणि आश्वासक बोलण्याने तिला अगदी आतून रडू आलं. त्याने तिला मनसोक्त रडू दिलं. ती रडत होती तो पर्यंत ती व्यक्ती तिला थोपटत राहिली.

शांत झाल्यावर तिने रडतच आपली सगळी हकीकत सांगितली.

" बाळ, मी एक वैद्य आहे. तू आता मी देतो ते औषध घे आणि शांतपणे झोप. आपण या वर सकाळी बोलू या"
असं म्हणून त्यांनी आतून दरवाजा लावला. त्या औषधाच्या परिणामाने तिला गाढ झोप लागली. शिवाय तिच्या वेदना देखील बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या होत्या. पण मनातलं शल्य अजिबात कमी झालेलं नव्हत. रात्री झोपेत देखील ती दचकत होती.

सकाळी तिला खूप उशीरा जाग आली. ही खरं तर तिच्या शाळेत जाण्याची वेळ. आता कसली आली शाळा आणि कसलं काय. तिला त्या दुष्ट मुलाच्या आठवणीने खूप संताप संताप झाला.

तिने उठण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. ती अशीच दुखावल्या सारखी पडून राहिली. ते मंदसे हसून म्हणाले,

" बाळ, तुला खूप खोलवर जखमा झालेल्या आहेत. त्या भरून यायला बराच काळ लागणार आहे. तेंव्हा तू लवकर बरं व्हायचं असेल तर भरपूर आराम कर. बाकी सगळ माझ्यावर सोड"

तिनं मलूल नजरेनं त्यांच्या कड पाहिलं आणि क्षीण आवाजात ती त्यांना म्हणाली,

" पण उगाच तुम्हाला त्रास"

" असं काही नाही बाळ. अगोदर तू फक्त बरी हो. म्हणजे मला देखील बरं वाटेल "

बघता बघता महिना संपला. हळूहळु ती उठून फिरायला लागली. सुरुवातीला तिला संकोच वाटत होता. नंतर सवय झाली. दोघं गप्पा मारत असतं. त्या आजारपणात त्यांनी तिची खूप काळजी घेतली.

सगळ वातावरण बदललेल असल्यामुळे तिची तब्येत बऱ्याच प्रमाणात बरी झाली. पण अजूनही झोप लागत नसे.

एक दिवस त्यांनी तिला तयार होऊन गावात फिरायला जायचं असल्याचं सांगितलं. कितीतरी दिवस तिचा माणसांशी संबंध आला नव्हता. त्या मुळे तिला थोड अवघडल्यासारखं झालं. पण आता ते असताना तिला कशाचीच भीती वाटतं नव्हती.

" उद्या गावात जत्रा आहे कदाचीत तिथं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल." ते म्हणाले.

( क्रमशः)
लेखक:  दत्ता जोशी

🎭 Series Post

View all