Dec 07, 2021
नारीवादी

तिचा नवरा असून नसल्यासारखा

Read Later
तिचा नवरा असून नसल्यासारखा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

तिचा नवरा असून नसल्यासारखा

कोमल आणि अनय चे लग्न होऊन दहा वर्ष पूर्ण झाली होती,,,पण दोघांच्या विचारात फार अंतर होते,दोघांचे विचार अजिबातच जुळत नव्हते,तिला सारखे वाटत असे की कसेही करून हे नाते शेवट पर्यंत टिकले पाहिजे,त्यामुळे बरेचदा ती स्वतःचे विचार पती समोर मांडत नसे,आणि मांडायला बसली की तिला माहीतच असायचे की तिचा नवरा नकार च देईल....

ती सारखी विचारात असायची की अनय चा नेमका विचार तरी काय,तिला काहीच कळायला मार्ग नव्हता,शेवटी तिला ही गप्प राहण्याच्या कंटाळा आला होता त्यामुळे पती ने काही म्हटले की ती पण वर तोंड करून उत्तर देत असे,...आणि याच गोष्टीचा अनय ला खूप राग यायचा,

कोमल ने प्रत्येक वेळेस अनय ची काळजी घेतली,पण त्या काळजीची त्याने नेहमी अवहेलना केली,...ती जेवढी काळजी अनय ची करायची तो तेवढंच तिच्याशी वाईट वागायचा...

तिने काहीही म्हटले की तो त्यातून वाईट च विचार करायचा,आणि सरळ तिला म्हणायचा तुझ्या आईने तुला हे च सांगितले का...तिने स्वतःहून त्याला काहीही चांगले सांगितले की तो तिला नेहमी खालून पाळून बोलायचा...तिला नेहमी अपमानास्पद वागणूक द्यायचा,...आणि कोमल ने काहीही केले तरी ते चुकीचे च आहे हे वारंवार सांगायचा....

अनय च्या अशा वागण्याला कोमल खूप जास्त कंटाळली होती,,तिला अजिबातच सुचत नव्हते कसे वागावे अन् काय करावे,...पण पतीवर खूप प्रेम असल्यामुळे ती पती शिवाय राहू शकत नव्हती,परंतु अनय काही तिला समजून घेत नव्हता,,अन् तिला ही समजून घेईल ही अपेक्षा उरली नव्हती,,ती कसेही करून केवळ तडजोड करत होती,...

दिवसामागून दिवस जात होते,आणि तिची तडजोड ही चालूच होती,आज मते जुळतील उद्या जुळतील असे करून दिवस जात होते,परंतु कोमल ला विश्वास होता की केव्हा ना केव्हा अनय तिला समजून घेईल...

एका स्त्री ला कितीही दुःख असले तरी देखील स्त्री आशा सोडत नाही कारण स्त्री ही नेहमी आशावादी असते,...आणि केव्हा तरी तिच्या आशेला एक छोटासा का होईना पण एक किरण मिळतोच,तेच कोमल च्या आयुष्यात चालू होते,पती हा असून नसल्या सारखा आहे,पण तरी देखील तिला केवळ त्याचे असणे महत्वाचे वाटते,मग तो काही करो अथवा ना करो...

Ashwini Galwe Pund

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ashwini Galwe Pund

Teacher

I am simple living women