तिचं जग (भाग/२)

कथा मालिका


तिचं जग २

रत्नावलीला अटक झाली. त्याचे नेमके कारण काय बघुया....

गावात सगळीकडे हाहाकार उडाला होता.‌ सरकारी दवाखान्यात अचानक गर्दी झाली होती. अनेकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. काय होतं आहे हे कळतच नव्हते.‌ सरकारी डॉक्टरांनी शहरातून‌ काही
डॉक्टरांना ताबडतोब बोलावून घेतले आणि लोकांवर उपचार सुरू केले. तेव्हा कुठे परिस्थिती आटोक्यात आली. पण, सोबतच पोलिस आले. पत्रकारांना तर एक नवीन मुद्दा मिळाला. शिवाय गावातील अनेकांना प्रश्न पडला की कसे झाले? याला कोण जबाबदार?

कारण, गावात महाशिवरात्रीची यात्रा भरली होती. गावातील महादेवाचे मंदिर अतिशय प्रसिद्ध होते. लोकांच्या भावना तिथे जुळल्या होत्या. श्रध्दा,भक्ति, त्याग आणि समर्पण यांचा जणु मेळाच भरायचा. आयुष्यात होणाऱ्या सुखदुःखाचा वाटेकरी महादेव होता. निस्सीम भक्त होते. डोळे झाकून देवावर विश्वास ठेवणारे. त्यामुळे शिवरात्रीच्या आठ दिवस आधीपासूनच गावातील प्रत्येक घरी पाहुणा असायचा. यात्रेमध्ये विविध प्रकारची अनेक दुकाने लागायची. छोट्या पडद्यावर सिनेमा आणि लावणी हे दोन्ही यात्रेचे आकर्षण असायचे.

यावेळी लावणी सादर करण्यासाठी खास कोल्हापूर वरून रत्नावलीला बोलवण्यात आले होते. कारण, महाराष्ट्राची शान म्हणून लावणी नृत्याचा आस्वाद घेण्यासाठी फार दुरून दुरून लोक येतात.

रत्नावलीची मादक अदा आणि तिचे सौंदर्य बघून भले भले लोक गावात आठ आठ दिवस मुक्कामासाठी येऊ लागले. तिच्या डोळ्यांत दाटलेले भाव बघतांना लोक बेहोश होऊन जातं. रत्नावली गावात येण्याने अनेक लोकांना काम मिळाले. पैसा हाताशी खेळू लागला. सर्व काही सुरळीत चालू होते. एका रात्री तमाशाचा खेळ सुरू होता. तिच्या अदाकारीत सगळे धुंद झाले होते. याचा फायदा घेत काही लोकांनी दारू विकायला आणली. आधीच सौंदर्याचा आस्वाद आणि दारूची नशा यामुळे लोकांना वेळेचे भान राहिले नाही. अगदी पहाटे पर्यंत तमाशाचा फड चालूच होता. अतिशय धुंदीत असणाऱ्या लोकांचा दारूने घात झाला. गावठी दारू पिऊन अनेकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला.

यासाठी रत्नावलीला जबाबदार धरण्यात आले.‌‌ गावातील काही लोकांच्या विरोधामुळे पोलिसांनी तिला अटक केली.
तिला कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी वकील म्हणून त्यावेळी नंदिनी तिच्या मदतीला धावून आली.

"ताई, मला वाचवा हो, मी काहीही केलं ‌नाही. मी फक्त नाचते हो. हे दारू प्रकरण कसे झाले याची मला कल्पना देखील नाही."

"हे बघ रत्नावली तू घाबरू नकोस. तुझी केस मी हॅन्डल करीत आहे. तू मला सविस्तर सांग सगळं."

"ताई, मी फक्त माझ्या नृत्यात मग्न होते.‌ काही लोक खाली गोंधळ घालत होते. पण,
मी तिकडे दुर्लक्ष केले. त्यातच लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घालायला सुरुवात केली. काही लोक एकमेकांना विरोध करीत होते. नेमके लोकांनी रात्रीच्या शोची तिकीटे काढल्यामुळे हे शो देखील बंद करता येत नव्हता. पहाटे चार वाजता शो संपला आणि लोक निघून गेली. पण, दोन तीन तासांनी कानावर ही बातमी आली आणि पोलिसांनी मला अटक केली."

दुसऱ्या दिवशी सकाळी तिला कोर्टात हजर केले आणि नंदिनीने स्वतःचा कसं लावून तिची बेलवर सुटका केली. दुसरी कोर्टाची तारीख येईपर्यंत तिचे शो बंद करण्यात आले. आता प्रश्न होता पोटाचा. तोपर्यंत नंदिनीने तिचे काही पेपर्स तयार केले आणि कोर्टात केस उभी राहिली‌. नंदिनीने स्वतः चा पूर्ण कसं लावला आणि नंदिनी केस जिंकली. कारण, रत्नावलीची बाजू खरी होती आणि खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली. पण, आता तिने तिचा तंबू गुंडाळायला सुरूवात केली.

यात मात्र अभिजीतचे नुकसान झाले होते. तो थोडासा नाराज झाला होता. पण, नंदिनीने त्याला सपोर्ट केला. समजावून सांगितले. तेव्हा कुठे तो शांत झाला. पण, आता तिला उत्सुकता होती ती रत्नमालाच्या जीवनाची. तिच्या आयुष्याची गणितं नंदिनीला सोडवायची होती.

"रत्नावली मला तुझ्या आयुष्यात डोकावायचा अधिकार नाही. पण, या केसच्या निमीत्ताने मी तुझ्याशी मी खूप अटॅच झाले आहे. तेव्हा तू जाण्याआधी मला निःसंकोचपणे सांगू शकते."

काय सांगेल रत्नावली पाहुया पुढच्या भागात.....

©®अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all