तिचं जग (भाग१) अश्विनी मिश्रीकोटकर

कथा मालिका


तिचं जग १

"नंदिनी तू ही केस लढणार नाही. तू स्वतः चा निर्णय बदलावा असे मला वाटते."

"पण, का? माझा निर्णय झाला आहे अभिजीत."

"अगं, मी त्या बाईच्या केस मध्ये तिच्या विरूद्ध लढत आहे आणि तू माझ्या विरूद्ध उभी राहणार का?"

"अभिजीत, अरे तिचा अपराध तरी काय आहे ? स्वतःच्या पोटासाठी ती हे करते ना! मग आपण तिला सपोर्ट केला तर काय बिघडले."

"हे बघ , मला तुझे हे वागणे मुळीच पटत नाही. माझा निर्णय मी तुला सांगितला आहे आणि आपल्या घरातल्या लोकांच्या विरोधात तू काहीही करणार नाही. मला चांगले माहित आहे. त्यामुळे तुझा निर्णय.."

"नाही अभिजीत मी ही केस लढणार. कारण, एका स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तिची काहीही चूक नसतांना तिला शिक्षा होणार. हीच गोष्ट मनाला पटत नाही. आज आपण पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनंतर आपण एकमेकांसमोर उभे राहणार . तेव्हा \"बेस्ट ऑफ लक\" अभिजीत."

"नंदिनी, प्लीज नको ना असे करू. ती बाई कशी आहे? कोण आहे? तुला माहिती असुनही. तिच्या मुळे गावातील लोकांमध्ये , घराघरांमध्ये भांडण होतं आहे. तरीही तू .."

"अभिजीत, मला तुमचा अपमान करायचा नाही. पण, तुम्ही माझ्या समोर आहात म्हणून मी मागे हटावे हा कुठला न्याय. आपल्या व्यवसायाचा आपल्या सहजीवनावर परिणाम होणार नाही. याची काळजी आपण घेऊच अभिजीत."

तरीही अभिजीत नाराज होऊन बाहेर निघून गेला.

"नंदिनी काय झाले? तुमच्या दोघांमध्ये परत वाद वाढले का? अगं, अभिजीतला नसेल पटत तर तू का लढते ही केस? " शालिनीताई आर्ततेने बोलत होत्या.

"आई, मला मान्य आहे की आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत. पण आई, तिही एक स्त्रीचं आहे ना? तिलाही अस्तित्व आहे. आज जरी तिचं जग वेगळं असलं तरीही ती पोटासाठी नाचते . काहीतरी अडचण असेल तेव्हाच ती हे काम करते ना? त्यामुळे तिची बाजू जाणून मी तिच्यासाठी लढणार हे नक्की."

"नंदिनी, परत एकदा विचार कर."वसंतराव शांततेत बोलत होते.

"बाबा, आजपर्यंत तुम्ही मला सून नाही तर मुलीप्रमाणे वागवले. तुम्ही मला प्रत्येक वेळी सपोर्ट केला आणि आज मी मागे व्हावे असे का वाटते तुम्हां दोघांना?"

नंदिनीचे सासु सासरे नंदिनीला समजावून सांगत होते. पण, नंदिनी स्वतः च्या निर्णयावर ठाम होती.

"नंदिनी तुझ्या या हट्टापायी मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही याची मात्र काळजी घे."

"हो बाबा नक्की."

"आई, बाबा या बाबतीत तुम्ही दोघांनी मला आजपर्यंत सपोर्ट केला. पण, आज ही केस माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही काळजी करू नका. अभिजीत आणि माझ्या जीवनात कोणतेही वितुष्ट येणार नाही. याची पुरेपूर काळजी घेईल मी."

"हे बघ नंदिनी आपल्या गावात जी काही घटना घडली आहे. त्याचे फारच वाईट वाटत आहे. पण, तू कुटुंबाबरोबर समाजाचं काही देणं लागते ही गोष्ट मात्र विसरू नकोस.‌ याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. तेव्हा\"बी केअर फुल\".

"हो बाबा नक्की मी लक्षात ठेवेन."

असे म्हणत नंदिनी तिच्या केसवर अभ्यास करायला निघून गेली.

पाहुया पुढच्या भागात काय झाले होते गावात ते.....

©® अश्विनी मिश्रीकोटकर



🎭 Series Post

View all