Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 3

Read Later
तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 3


तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 3
......

मीनाने सकाळी थेपले केले,

"नाश्त्याच राहू दे मीना, तू खावून घे, चल मी तुला सोडायला येतो",.. दिनेश चांगले वागता आहेत, मीना खुश होती.

तिने थोड खाल्ल चहा घेतला, ती मुलांना भेटली,.. "आई येते मी रात्री पर्यंत",

"हो एन्जॉय कर ग",.. सासुबाई.

दोघ निघाले,

"कसला आहे हा डब्बा",.. दिनेश.

"लाडू आहेत त्यात" ,.. मीना.

"काहीही मीना" ,.. दिनेश.

"असू द्या हो माझ्या फ्रेंड्सला खूप आवडायचे आईच्या हातचे लाडू, म्हणून मुद्दाम केले",.. मीना.

"एवढ दमायची गरज नव्हती" ,.. त्याने एटिएम वरून पैसे काढून तिला दिले, तिने तसे तिचे पैसे घेतले होते सोबत, हे लक्ष्यात ठेवल , तिला थोड बर वाटल,

थोड्या वेळाने सोनल आली, मीनाने ओळख करून दिली,

"तुम्ही उद्या या आमच्या कडे डिनर साठी पूर्ण फॅमिली",.. दिनेश.

"हो नक्की भेटू उद्या ",.. ते निघाले.

दिनेश इडली घेवून वापस घरी आले.

शाळेत सगळे भेटले खूप आनंद झाला होता सगळ्यांना, शिक्षक येत होते, जुन्या गोष्टी आठवत होत्या, खूप गप्पा सुरू होत्या,

थोड्या वेळाने प्रोग्राम सुरु झाला, आधी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला, त्या नंतर त्या वेळचे हुशार विद्यार्थी यांचा सत्कार होता, पहिलेच नाव घेतल त्यांनी मीना,

"अरे नाही मी काय",.. मीना.

"वर्गात काय शाळेत सगळ्यात हुशार होतीस तू, तुझ्या कडून खूप शिकलो आम्ही",.. सोनल.

"अरे पण आता काय त्याच, मी काही करत नाही, आता मी अजिबात हुशार नाही, दुसर्‍या कोणाचा तरी करा सत्कार",.. मीना.

" तु मुलांना छान तयार केलेस , हुशारी काय फक्त नौकरी करण्यात आहे का, सगळच येत तुला, मीना जा स्टेज वर ",.. सोनल.

तिला स्वतः वर विश्वास राहिला नव्हता आता, आपण हुशार बापरे कोणी चुकीच तर बोलत नाही ना, डोळ्यात पाणी आल तिच्या.

ती समोर गेली, स्टेज वर जावुन उभी राहिली, तिची माहिती माईक वरून सांगितली जात होती.

मीना दहावीत पहिली आली, शिवाय जिल्ह्यात प्रथम होती ती, त्या वेळी पेपर मधे नाव आल होत तीच, स्कॉलरशिप तर तिला नेहमीच मिळायची, अतिशय हुशार, नेहमी मदतीला पुढे, शाळेच नाव तिने चमकवल, निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा सगळ्यात पुढे, कुठलही गणित न चुकता सोडवायची, स्काॅलर लिस्ट मध्ये ही नाव होत तीच,अशी ही शाळेची अत्यंत हुशार विद्यार्थीनी मीना,

सगळे टाळ्या वाजवत होते, सगळ व्हिडीओ शूटिंग सुरू होत, मीना भारावून गेली होती, सगळे कौतुक करत होते, तिचा सत्कार झाला.

"तू गणित छान शिकवायची मीना आम्हाला",.. प्रिया.

हो ग.

" सायन्स ही",.. सीमा.

हो.

"एक्चुअली तिला सगळेच विषय जमायचे",.. सोनल.

" एक काम कर मीना माझ्या क्लास मध्ये शिकवायला ये, मला गरज आहे हुशार शिक्षकांची",.. प्रमोद.

" अरे नको प्रमोद, आता मला अनुभव नाही, किती वेळ असेल क्लास ",.. मीना.

"अरे फ्लेक्सिबल टाइम आहे, दुपारी येत जा 4-5 तास",.. प्रमोद.

" हो याचे इंजिनिअरिंग मेडिकल प्रवेश साठी क्लासेस खूप प्रसिद्ध आहेत, मीना छान संधी आहे ही तुला",.. सोनल.

" मीना तुला याव लागेल, मुल मोठे असतिल तुझे, आता तरी घर सोड",.. प्रमोद.

" हो मी सांगते" ,.. मीना.

जेवल्यावर ती प्रमोद कडे बघत होती,.." प्रमोद इकडे ये दोन मिनिट, मला थोडं बोलायचं आहे ",

" काय झालं मीना ",.. प्रमोद.

" अरे मला काही अनुभव नाही शिकवायचा , मुलं लहान होते तेव्हा त्यांना मी शिकवायची, मला नाही जमणार तुझ्या क्लास मधे शिकवायला ",.. मीना.

"काही काळजी करू नको मीना , तू एकदा बघितलं की लगेच शिकतेस, खूपच ग्रास्पिंग पावर आहे तुझी, तू म्हणशील तर आपण तुझे ट्रेनिंग अरेंज करू, बघ थोडे दिवस आवडलं तर कर काम, पण मला असं वाटतं आहे की तू हे काम करावं, तुझ्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्यांना करून दे",.. प्रमोद.

" अरे पण अकरावी बारावीच्या मुलांना शिकवायच म्हणजे जास्त होत, मी नाही तेवढी हुशार ",.. मीना.

" करशील तू आहेस बोल्ड, थोडे दिवसात होईल सवय, आपण दोघ मिळून तेव्हा ही बर्‍याच मठ्ठ मुलांना सुधरवल होत ना, मीना काय यार हो बोल, करू सोबत काम ",.. प्रमोद.

" चालेल मी करते तुला फोन",.. मीनाच्या मनात धाकधूक होती,

मीना घरी आली, तिकडे काय काय झालं तेच ती बोलत होती, सगळे कौतुकाने ऐकत होते, आता यावेळी ती क्लास बद्दल लगेच काही बोलली नाही.

दुसऱ्या दिवशी सोनल आणि तिची फॅमिली जेवायला येणार होते, त्याच्याच तयारीत ती होती, काय काय मेनू करायचा आहे ती सासूबाईं बरोबर बोलत होती, सकाळी जाऊन सामान घेऊन यावं लागेल,

"दिनेश लवकर या आज घरी",.. मीना.

" हो येतो मी सात-साडेसात वाजेपर्यंत काही आणायचे का? ",.. दिनेश.

"हो रसमलाई आणा",.. मीना.

दिवसभर मीना कामात होती, लवकर स्वयंपाक करून घेतला होता तिने , मसाले भात, पनिर, मिक्स वेज, पोळ्या, कोशिंबीर, वडे सगळंच तयार होत.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//