Mar 04, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 2

Read Later
तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 2


तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 2
.......

मीना विचारात होती, तिने डिश मधे पोहे घेतले , सासुबाईंना डिश दिली,.. "आई किती जग बदलला ना, आम्ही लहानपणी किती ऐकायचो आई बाबांच, कधी अस ओरडून बोललो नाही त्यांच्याशी, अजूनही बोलत नाही आणि हे मुल किती बोलतात मला" ,

"काय झालं मीना, कोण काय म्हटलं तुला?",.. सासुबाई.

"आई नेहमीच आहे, मुल ऐकत नाही माझ काही, त्यांना वाटत मला काय समजत, मी सामान आवरलं नाही तर ते तसच वर्षानुवर्षे पडून राहील, हे मुल स्वतःही आवरत नाही मलाही करू देत नाही. वळण कधी लागेल या मुलांना काय माहिती, पुढे जावून त्यांच्या बायका नवरे मला बोलतील ना काही शिकवलं नाही मुलांना ",.. मीना.

" पुढची काळजी करू नको तू, पडू द्यायचं मग तू पण तसच, अजिबात करायचं नाही त्यांच काही ",.. सासुबाईंनी तिची बाजू घेतली.

" दिनेश प्रत्येक गोष्टीत मला बोलतात, प्रेम अस राहील नाही आमच्यात ",.. मीना.

" हे वय अस असत बाईच, अस होत यात, नवरा बिझी असतो, मुल मोठी होतात, तू तुझ काहीतरी कर मीना, बाहेर पड यातून ",.. सासुबाई.

मीना विचार करत होती काय काम सुरू करू, नौकरी करू का, नको, मग बिझनेस नको, काहीही सुचल नाही तिला. थोडं घर काम झालं होतं, दिनेशचा फोन आला,.. "मीना बँकेत जाऊन ये, तिथून मला फोन कर, एफडी रिन्यू होणार आहे, मी सांगतो काय करायचं ते, हे बघ धांद्रटपणा करू नको, एफ डी रिन्यू करायची आहे पैसे काढायचे नाहीत",

"आहो ते मागच्या वेळी बँक मॅनेजरच म्हटले होते की हे पैसे आधी अकाउंट वर येतील आणि मग त्याची एक-दोन दिवसात एफडी होईल ऑटोमॅटिक त्या दिवसापासून तुम्ही मला तेच बोलता आहात, मी मागे पण सांगितल होत, मी नाही जाणार यावेळी बँकेत ",.. मीना चिडली होती.

" हे बघ एक तर मला रविवार शिवाय सुट्टी नसते आणि रविवारी बँक बंद असते, तू घरी असते तर जाऊन ये ना",.. दिनेश.

" तिथे काय होत, कधी कधी वेळेवर काही निर्णय घ्यावे लागतात हे माहिती आहे ना तुम्हाला , मला का बोलता तुम्ही नेहमी , मी बरोबर करते काम ",.. मीना.

" ठीक आहे बाई होऊन जावू दे तुझ्या मनाप्रमाणे आणि सारखा मला फोन करायचं नाही",.. दिनेश.

" अहो तुम्ही माझ्याशी प्रेमाने का बोलत नाही आता हल्ली",.. एकदम मीना बोलली,

दिनेश गप्प झाले,." तस नाही मीना तुला जमत तस कर काम ",

" संध्याकाळी लवकर या ",.. मीना.

हो... दिनेशने फोन ठेवून दिला. मीना काय म्हटली आता, खर आम्ही दोघ चिडचिड करत असतो आता हल्ली,
शांततेने घ्यायला पाहिजे मी, मीनाने केल बँकेच काम तर ठीक नाहीतर करू काही तरी , अक्षयला सांगायला पाहिजे होतं काम.

मीना बँकेत जाऊन आली, व्यवस्थित सगळ काम झाल, ती स्कूटर वरून घरी जायला निघाली, घरी गेली की अजून खूप आवरायच आहे, घरात कितीही काम करा कमीच पडत, चला पटकन,

दोन-तीन बॅग होत्या तिच्याकडे, एकात भाजीपाला किराणा वगैरे होता, सासुबाईंचे औषध ज्याला जे हवं त्या लिस्ट प्रमाणे व्यवस्थित घेतलेलं होतं, बँकेचं काम झाल होतं, चला सगळ्यांच काम झाल, मी शक्य तोवर सगळ्यांच करते, मला त्रास नाही होत यांचा, त्यांना त्रास होतो माझा, आमच्या मधे मधे करु नकोस अस करतात मुल, आपलेच आहेत तरी सगळे स्वार्थी, ती दुःखी होती.

मीना... मीना... आवाज ऐकायला आला, कोण आहे तिने वळून बघितलं, तिच्या वर्गातली सोनल होती.

"अरे तू आज आली का इकडे सोनल, आपला रियुनियनचा प्रोग्राम परवा आहे ना ",.. मीना.

"मी माझ्या नणंदेच्या घरी आली आहे, इथून जवळ रहातात त्या " ,.. दोघी खूप बोलत होत्या.

" झाली का रियुनीयनची तयारी" ,.. मीना.

हो.

"उद्या येशील का मग आमच्याकडे",.. मीना.

"नंतर येईल परवा जायच ना आपल्याला शाळेत, माझ्या सोबत येशील का तु आमच्या कारने",..सोनल.

"हो सोबत जावू ",.. मीना.

दुसर्‍या दिवशी मीना तिच्या कामात होती, उद्या दिवस भर घरी नाही, खूप आवरत होती ती, थोडा चिवडा तयार केला तिने आणि खूप सारे लाडू केले , वर्गातल्या सगळ्यांना एक एक तरी आला पाहिजे, शाळेत असतांना आईच्या हातचे लाडू खूप आवडत होते सगळ्यांना, आता तिच्या हाताला बर्‍या पैकी आई सारखी चव होती,

पूजा किचन मधे आली,.. "काय करतेस आई?",

"काही नाही आवरते आहे" ,.. मीना.

"तू आज माझ्याशी सकाळ पासून बोलली का नाही" ,.. पूजा.

"तस काही नाही, सरक बाजूला माझी गडबड आहे आज",.मीना.

आई काही जास्त बोलत नाही, त्रास देत नाही, काय झाल आज? ,

नाश्ता जेवण टेबल वर झाकून ठेवल होत,.. "तुमच्या हाताने घ्या आज",

"उशीर होतो आहे आई, तू दे ना ",..पूजा.

"काही हरकत नाही, तिने पूजा साठी डिश बनवली ",..पूजाला लक्षात आल मीना चिडली होती.

आईला राग आला वाटत, किती गप्प आहे ती, पूजा शाळेत निघून गेली, संध्याकाळी मीना पार्लेरला गेली होती, यायला उशीर झाला तिला, घरी कढी खिचडी तयार होती, सगळे जेवायला बसले, मीना अजुन उद्याच आवरत होती,

" आई आज खूपच बिझी आहे. ये ना इकडे",.. पूजा.

" जेवून घे मीना",.. दिनेश.

"हो आले, उद्या पहाटे उठायच आहे, तुमचा सगळ्यांचा स्वयंपाक नाश्ता बनवून जाईल मी, पूजा अक्षय आजीला नाश्त्याला देवून जायच ह घरातून",.. मीना.

" मी उद्या वर्क फ्रॉम होम करेन, मी आहे घरी",.. दिनेश.

बर झाल दिनेश घरी आहेत, आईंची काळजी मिटली.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//