Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 1

Read Later
तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 1
तिचं जग ( शिल्पा सुतार)... भाग 1

अष्टपैलू कथा मालिका स्पर्धा
दुसरा राऊंड... जलद कथा
.....

सोशल मीडिया ग्रुपवर सकाळ पासून धमाल सुरु होती, मीनाच्या लहानपणीच्या वर्गाचा ग्रुप सहा महिन्यापूर्वी तयार झाला होता, त्यांच रीयुनियनच ठरत होत, सगळे खूप उत्साही होते,

मीना साधारण चाळीशीतली, बर्‍या पैकी सगळ्या मित्र मैत्रिणींचे मुल थोडे मोठे झाले होते, त्यामुळे त्यांच अगदीच सगळंच आवरायचा अस नव्हत, सगळ्यांना जमत होत रियुनियनला यायला.

मीनाचे ही मुल मोठे होते, पूजा दहावीत होती, अक्षय इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता, घरी तिच्या वाचून कोणाच अडत नव्हत, जो तो बिझी आणि हुशार होते, प्रोग्रामला जायला घरून आडकाठी अशी नव्हती.

दोन तासावर तीच माहेर होत, तिथे रियुनीयनचा प्रोग्राम होता, आधी शाळेत सत्काराचा कार्यक्रम होता नंतर जवळच रिसॉर्ट वर गेट टुगेदर होत, ती संध्याकाळी आई कडे जाणार होती जरा वेळ, मग घरी येणार होती.

मीना आज सकाळ पासून मोबाईल घेवून बसली होती, खूप मजा येत होती गप्पा करायला , मध्येच ती हसत होती, त्यांचा मुलींचा एक ग्रुप कॉल झाला, ड्रेस कोड काय आहे ते ठरवत होत्या त्या ,

"आज आवरणार आहे का तुझ मीना? सकाळी सकाळी काय आहे मोबाईल मध्ये, किती जोरात बोलते आहेस तू, मला उशीर होतो आहे, झाला का चहा नाश्ता " ,.. दिनेश आवाज देत होता.

"हो आले... आणि काय हो मी आत्ता आत आली होती रूम मध्ये तेव्हा बघितल तुम्ही सुध्दा मोबाईल वापरता होता की, प्रत्येक वेळी मलाच का बोलतात",.. मीना नवर्‍यावर चिडली.

" मी ऑफिसच्या मेल चेक करत होतो, तुझ आहे का काही महत्वाच, आटोप नाश्ता दे, वाद नको मला",.. दिनेश.

"अहो मी जाणार आहे परवा शाळेच्या प्रोग्राम साठी, ते ठरवतो आम्ही ",.. मीना.

"ठीक आहे",.. नाश्ता करून दिनेश ऑफिसला निघून गेले,

घरात नेहमीप्रमाणे खूपच पसारा होता, कुठून सुरुवात करावी असे विचार करत मीना आधी पूजाच्या रूम मध्ये गेली, पूजा शाळेच्या तयारीत होती,.." चल पूजा खावून घे काहीतरी",

" हो आली आई पाच मिनिट",.. पूजा बिझी होती, भराभर लिहीत होती काही तरी.

" एवढ्या लास्ट मिनिट पर्यंत का लिहायच ठेवते तू, मला काही समजत नाही, रात्री पूर्ण करत जा ना होम वर्क",.. मीना तिला ओरडली.

"आई प्लीज आता हे ऐकायचा माझा मूड नाही, तू मला आता काही सांगू नकोस" ,.. पुजा.

तरी मीना तिची रूम ठीक करत होती,

"आई तू राहू दे तू माझ्या वस्तूंना कशाला हात लावला ",..पुजा .

" अगं तुझे वह्या पुस्तक असेच पडले होते म्हणून मी नीट ठेवत होती",.. मीना.

" काही गरज नाही, तु का अस केल , होम वर्क क्लास वर्क सेपरेट काढले होते मी, आता तू सगळे एकत्र ठेवून दिले",.. पुजा.

"नाही कुठे एकत्र केले ते बघ तिथे आहेत ",.. मीना.

" दादा... दादा... आईला बोलव प्लीज, ती मला त्रास देते आहे ",.. नेहमीप्रमाणे पूजा ओरडत होती, ती वैतागून तिची बॅग भरत होती ,मीना बाजूला उभे राहून बघत होती.

" पूजा का अस करतेस? मी कधी शाळेत गेली नाही का, मी मदत करत होती तुझी, जाऊ दे आता चिडू नकोस छान आनंदात शाळेत जा",.. मीना.

नेहमीच आहे हीच, टीनेज आहे उगीच चिडचिड करते, तिने दुर्लक्ष केलं, तिचं काम करायला किचनमध्ये गेली. नाश्ता टेबलवर मांडला, खायचा तर खा, उशीर होत असेल तर जा तसच, पूजा अति करते.

अक्षय आवरून बाहेर आला,.. "आई मी निघतो",

" अक्षय पोहे केले आहेत थोड खा ",.. मीना

" आई थोडेच दे पटकन, पूजा कुठे आहे, चल पूजा ",.. दोघ पोहे खात होते.

पोहे खाता खाता पण तो खूप बोलत होता,.. "हे बघा आई माझ्या रूममध्ये कशाला हात लावू नको, मी माझ्या घरचा लॅपटॉप चार्जिंगला लावला आहे, तू ते सगळं बंद करून ठेवून देते, मग मला रात्री चार्जिंग रहात नाही, थोड्या वेळाने माझं कुरियर येईल, व्यवस्थित सही करून माझ्या टेबलवर ठेवून दे" ,

हो....

दोघ मुल गेले,

हे कर ते कर, सगळे काम तर मला सांगतात, पण माझ्यावर अजिबात विश्वास नाही यांचा, जावू दे टेंशन घ्यायच नाही. मोबाईल मध्ये मेसेज आले असतिल खूप, ते बघूया.

एकदम प्रसन्न वाटल तिला, ग्रुप वर अजूनही गप्पा सुरू होता, कुठे गेली होतीस ग मीना? , भाऊजी बोलवत होते का? , बरी लगेच आली तू, बरेच मेसेज यायला लागले , मैत्रिणी चिडवत होत्या.

मीना विचार करत होती, कस झाल ना आयुष्य, कोणी नीट वागत नाही माझ्याशी, मुल तसे दिनेश तसे, प्रेमाने जवळ घेण नाही की नीट बोलणार नाही, एवढी काही प्रिय नाही मी कोणाला, सगळे चिडलेले असतात माझ्या वर, एकदम मठ्ठ समजतात मला , जिला काही समजत नाही अशी व्यक्ति आहे मी घरातली, माझ्या वाचून कोणाच काही अडत नाही, त्यांना मदत करावी ते त्यांना आवडत नाही, कराव तरी काय, त्यांना अडचण वाटते माझी. डोळ्यात पाणी होत तिच्या, जास्त विचार करायचा नाही.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//