तिचं जग (भाग दुसरा)

प्रेम ही अती सुंदर गोष्ट आहे. प्रेमा ईतकं पवित्र जगात काहीच नाही. प्रेम हे शाश्वत आहे कारण ते शरीरावर नव्हे तर मनावर केलेलं असतं.

तिचं जग (भाग दुसरा )

विषय: तिचं आभाळ 


तिने पत्र पाठवल्याची तारीख पाहिली. बोटांवर दिवसांचा काही हिशोब केला.ती मुळापासून दचकली. बापरे ! म्हणजे तो आजच येणारं होता की. त्याच्या येण्याच्या विचारांनचं ती शहारली. वसंत ऋतूत कुठले तरी अनामिक फूल उमलावे आणि त्याचा धुंद सुगंध रंध्रा रंध्रात भिनुन जावा, अचानक आकाशात अनंत चांदण्या फुलून याव्या. कधी न ऐकलेली असंख्य गाणी मनात उमलून यावी , त्या गाण्यांची फुलपाखरं व्हावी. त्या फुलपाखरांच्या पंखावर बसून स्वप्नांच्या राज्यात फिरून यावे अस तिला वाटलं.

पण त्याच वेळी,ज्या गोष्टीची तिला खूप भीती वाटतं होती तेचं होणार होतं. आजपर्यंत त्याने तिला भेटण्यासाठी खूप आर्जव केली होती. तिनं भेटाव म्हणून त्यानं तिला साहित्य संमेलनाची आमंत्रण दिली होती. कित्येकदा तर तिकिटंही पाठवली होती.पण प्रत्येक वेळेस तिने काहीना काही कारणं सांगून त्याला भेटण्यासाठी टाळलं होतं. का कुणास ठाउक तिला नियतीची खूप भीती वाटत होती. असं वाटतं होतं की आजवर आपण त्यांचं किंवा त्यानं आपलं मनामध्ये जे चित्रं रेखाटलं आहे त्या चित्राला या भेटीने तडा न जावो. तिला चांगलच कळून चुकल होत की ती त्याच्या मध्ये गुंतत चालली होती. तिचं आणि त्याच प्रेम असच शाश्वत राहावं असं तिला जर वाटतं असेल तर दोघांची भेट न होणं हाच एक पर्याय आहे याची तिला खात्री होती. पण त्याला न भेटता आपण आता राहुही शकत नाही याचीही तिला जाणीव होती. स्वप्न आणि वास्तव या दोहोच्या मध्ये ती लोंबकळत राहिली. आता मात्र त्याला थोपवण तिच्या हातात राहिलेलं नव्हतं. वसंत ऋतूतल्या मोहक थंडीने तिला सर्व बाजूने वेढल. तिने खांद्यावर रुळणारी शाल पाया पर्यंत ओढून घेतली. आता तिला थोडं आश्वासक वाटायला लागलं.

तिला भीती वाटण्याची कारणं बरीच होती. एक म्हणजे तिच्या घरातील जून्या विचारांच्या रुढी आणि परंपरा, ज्या तिची आई आणि बहिणी कटाक्षान पाळत असत. मुलांपेक्षा मुलींवर बंधनं जास्तच. कारण घराण्याच्या अब्रूची जास्त जबाबदारी त्यांच्यावरच असे. त्यात ती मोठी. म्हणजे जास्त बंधन तिच्यावरच. तिला कथा, कविता लिहू देत हिचं मोठी मेहेरबानी होती.

वडील तर आचार विचारांनी अत्यंत कर्मठ होते .त्यांचा शब्द घरामध्ये शेवटचा शब्द मानला जाईल. सर्वांना त्यांचा प्रचंड धाक वाटप असे एकदा तिच्या लहान मिळणे बहिणीने वडिलांच्या विरुद्ध जाण्याची हिंमत केली होती .त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला केलेली शिक्षा सगळ्यांना कायमची लक्षात राहिली होती. तेव्हा त्यांच्याविरुद्ध जाणे काय पण तसा विचार करणे स्वप्नात देखील अशक्य गोष्ट होती.

मुला मुलींच्या बाबतीत तिच्या वडिलांची मत अगदी ठाम होती. प्रेम बीम या शब्दांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. किंबहुना त्या शब्दाला त्यांच्या घरात प्रवेश संस्था नव्हता. त्यामुळेच की काय तिच्या कवितांमध्ये प्रेम नदीप्रमाणे ओसंडून वाहत असे.

बाहेरच्या जगात मात्र तिच्या कवितांनी सगळ्यात तरुण लोकांना वेड लावलेलं होतं. ते लोक पत्र लिहिताना तिच्या कवितांच्या ओळी उद्धृत करत असत. तिच्या कवितांच्या ओळींनी आपल्या प्रेमाला शाश्वत बनवत असत. त्यापैकीच हा एक वेडा होता जो साता समुद्रा पार राहत होता. परंतु तिच्या कवितांवर मात्र जीवापाड प्रेम करत होता. आता तर हळूहळू त्याचं या कवयित्री वर प्रेम बसत चाललं होतं. अनेक वेळा त्याने ते व्यक्तही केलं होतं. तो स्वतः देखील असाच हळुवार मनाचा राजकुमार होता. तिच्यासाठी वेडा झालेला होता. त्याला तिला भेटायचं होतं. तिच्या तोंडून तिच्या कविता साक्षात ऐकायच्या होत्या आणि कानांना तृप्त करून घ्यायचं होतं. पण ती मात्र तिच्या निश्चयावर ठाम होती. सतत काहीना काही कारण सांगून भेटायचं टाळत असे .पण यावेळी त्याने मात्र अजिबात ऐकलं नव्हतं .ती त्याच्याशी बोलो ना बोलो. घरात घेवो ना घेवो. तो तिच्याकडे येणारच होता.

या आधीच्या पत्रांवर मध्ये तिच्या एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आलेली होती ,की त्यांचं प्रेम अस्तित्वात येणं ही निव्वळ अशक्य प्राय गोष्ट होती. कारण ती त्याच्याहून तब्बल सहा वर्षांनी मोठी होती. वय आणि घरातले वातावरण या दोन गोष्टी तिच्यासमोर पोलादी भिंतीप्रमाणे उभ्या होत्या. याखेरीज दोघांचे देश वेगळे होते. संस्कृती वेगळी होती. धर्म वेगळा होता. रितीरिवाज वेगळे होते. मन मात्र एकमेकात गुंतून गेले होते. त्यामुळे तिला वाटत होतं की हे मनापासून हृदयात निर्माण झालेलं प्रेम असंच मनामध्ये ताजं राहू द्यावे. त्याला या कठोर जगात आणून नष्ट करू नये. परंतु तो मात्र ऐकायला तयार नव्हता. नको नको म्हणता म्हणता, वसंत ऋतूप्रमाणे आज तिच्या दारात येऊन उभा राहणार होता आणि तिला साद घालणार होता, बघ मी आलो आहे. माझं स्वागत करणार नाहीस का.

तिने चमकून समोर बघितलं. तिला हे शब्द जणू काही स्वप्नात ऐकल्यासारखे वाटले. तो खरच आला होता आणि अगदी तिच्या मनातलेच वाक्य तिला बोलून दाखवत होता. माझ स्वागत करणार नाहीस का ? तिने तिच्याकडे बघितलं. त्याचे ते सोनेरी सोनेरी केस. त्या सोनेरी केसांमधून उघडून येणारा सूर्याचा प्रकाश थेट तिच्यापर्यंत पोहोचत होता. तिने दुरुनच त्याच्या डोळ्यात बघितलं. त्याचे समुद्रासारखे गर्द निळेशार डोळे तिला खूप गहिरे वाटले. अनंत जन्माची ओळख असल्यासारखं आपुलकीचं हास्य तिच्या ओठांवर आलं. तिचा टॉमी देखील त्याला बघून भुंकण्याच्या ऐवजी त्याच्याकडे लाडाने धावत आला. त्याच्या अंगाला अंग घासू लागला. लाडाने शेपूट हलवत त्याच्या अंगावर उड्या मारायला लागला.

खुर्चीवर बसल्या बसल्याच तिने आपले बाहू उंचावले आणि तो देखील समुद्राने नदीकडे यावं आणि नदीला आपल्यात सामावून घ्यावं तसा तिच्याकडे झेपावला. दोघं एकमेकांपासून एकमेकांच्या बाहू पाशात विसावली आणि नंतर साता जन्माची ओळखं असल्या सारखा गप्पांचा निरंतर ओघ सुरू झाला.

किती वेळ झाला होता कुणास ठाऊक. तो येऊन, गप्पा मारून केव्हा निघून गेला होता तेही तिला आता आठवत नव्हतं. फक्त आठवत होता फक्त त्याचा तो आश्वासक आवाज .प्रेमाची याचना आणि ते आर्जव.

तिने आपल्या कवितांची वही काढली आणि त्यावर एक ओळ लिहिली, तो आला आणि परत कधी गेलाच नाही.

तो गेल्यानंतर निराशेची एक प्रचंड पोकळी तिला जाणवायला लागली. त्याचं आणि आपलं एकत्र येणे किती अशक्य गोष्ट आहे ,याची तीव्र जाणीव तिला झाली. आपलं वय आपल्या घरातील कर्मठपणा याव्यतिरिक्त जी महत्वाची गोष्ट होती ती त्याला आपण सांगायला हवी होती असं तिला प्रकर्षाने जाणून गेलो आणि तिच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वहायला लागले.

लेखक: दत्ता जोशी
( क्रमशः)

🎭 Series Post

View all