तिचं जग ( भाग चवथा)

प्रेम ही अती सुंदर गोष्ट आहे. प्रेमा ईतकं पवित्र जगात काहीच नाही. प्रेम हे शाश्वत आहे कारण ते शरीरावर नव्हे तर मनावर केलेलं असतं.


तिचं जग (भाग चौथा)

विषय:तिचं आभाळ 


आठ दिवस होऊन गेले होते तिला पत्र पाठवून. कुठेतरी खोलवर तिला वेडी आशा होती की त्याचं एखादं तरी सांत्वना पर पत्र येईल. पण रोज पोस्टमन येत होता. तिला पत्र देऊन जातही होता. परंतु तिला हवं ते पत्र मात्र अजूनही आलेल नव्हतं. तिला तिचच कळत नव्हतं की आता ती कशाची अपेक्षा करत होती. त्याला त्याच स्वतःच आयुष्य होतं. तो दिसायला सुंदर होता. तिच्यापेक्षा वयाने लहान होता. आणि तिला तिनेच तर त्याला सुचवलं होतं की त्याने एखादी दुसरी चांगली मैत्रीण पहावी. मग आता त्याचा विचार करण किती चुकीचं होतं. तिचे विचार आणि तर्क बरोबर होते. पण मन आणि हृदय तिच्या ताब्यात नव्हत. रात्र रात्र ती जागून काढत असे. रात्र भर न झोपल्याने, डोळे तारवटलेले असत. भूक लागत नसे आणि काही लिहायला पण सूचत नव्हते. रोजचा आनंद देणारा सूर्य प्रकाश आणि टॉमीच्या खोड्या देखील तिला आवडेनाशा झाल्या. आठ दिवसात खूप दिवसांची आजारी असल्यासारखी ती दिसायला लागली होती.


कधी कधी तिला त्याचा खूप राग यायचा. का म्हणून हा आला माझ्या आयुष्यात. माझ्या सीमित असलेल्या जगात मी खूप सुखी होती. हा आला आणि प्रचंड उलथापालथ करून निघून गेला. या आधी फक्त पायांचं अपंगत्व होतं. याने मात्र आपल्या मनालाही अपंग करून टाकल.

असेच अजून दोन दिवस गेले .ती निराशेतून बाहेर येतच नव्हती. टॉमी एकटाच अंगणात खेळत होता. अचानक एक पत्र, ज्याची ती वाट पाहत होती ते येऊन पडलं . तृषार्ता सारखं तिनं ते पत्र हातात घेतलं. घट्ट हृदया जवळ धरुन ती अश्रू ढाळत बसली. आपल्याला कोणी पाहात आहे की नाही याचंही तिला भान उरल नव्हत. त्यात काहीही लिहिलेलं असो. पण ते त्याचं, त्याने लिहिलेलं पत्र होतं.

कितीतरी वेळ ती ते पत्र कुरवाळत बसली होती. अखेर तिने ते पत्र उघडल. आणि वाचायला सुरुवात केली. पत्रात फक्त दोनच ओळी लिहीलेल्या होत्या.

"मी उद्या रात्री तुला घ्यायला येतं आहे. तू तयार राहा."

तिला आपण काय वाचतो आहोत तेच कळेना. त्या अक्षरांचा तिला अर्थच कळत नव्हता. तिच्या सर्वांगाला कंप सुटला होता. घशाला कोरड पडली होती. हात पाय थरथर कापत होते. तिच्या डोळ्यातून झरझर झरझर अश्रू वाहायला लागले. रडतच तिने सगळ सामान आवरायला घेतलं.

तयारी तशी काहीच करायची नव्हती.सोबत न्यायच्या गोष्टींमध्ये तिने टॉमीलाही धरलं होतं. त्याच्या शिवाय ती जगूच शकणार नव्हती. टॉमीलाही जणू तिच्या भावना समजल्या होत्या. कधी नवद तो आनंदाने बागडायला लागला होता.

संध्याकाळ झाली. सगळीकडे काळोखाच साम्राज्य पसरलं. सगळे गुपचूप झोपलेले होते. तिच्या अभ्यासिकेतून ती अलगद कडी काढून बाहेर आली.

काळोखात तिने पाहिलं. तिच्या प्राणाचा प्राण तिला सोबत घेऊन जाण्यासाठी उभा होता.

पळून जाताना तिने त्याला हळूच विचारलं , अरे मी तुला सगळ सांगितलं होतं ना.

तो तिचा हात हातात घट्ट धरून म्हणाला,

" जेंव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा तू मला वसंतात सौंदर्याची उधळण करणारी वन देवताच वाटली होती "

तिने अंधारात स्वतःला त्याच्या हवाली केलं तेंव्हा तिला वाटलं की आपल्याला आता पायांच्या जागी पंख फुटलेले आहेत.

तिच्या अवकाशात सप्तरंगांची उधळण झालेली होती.

( समाप्त )

लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all