तिचं तिला ठरवू द्यावं...

TIla To adhikar aahe


तिचं तिला ठरवू द्यावं..
लघुकथा..
ऋतुजा वैरागडकर

लाडकी लेक , मायेची भावंडं यांच्या सोबत आयुष्याची पाहिली २५-२६ वर्ष मजेत व्यतित केल्यांनतर मुलीला सासरी रुजायाला थोडा वेळ लागतो.

मुली प्रेम तर दोन्ही कडे सारखेच करतात पण सासर कडूनही तेवढीच उब मिळावयास पाहिजे ;नाहीतर सुनेला कोलमडून जायला होते .

माहेरी आजारपणात अंथरूण सुद्धा न सोडणाऱ्या, लेकीला सासरी आल्यावर आजारी असताना , आयता चहा सुद्धा कित्येक वेळेस नशिबात नसतो . मुलींना सुद्धा मन आहे तेव्हा २५ वर्षे दुसऱ्या अंगणात असणारी ही तुळस आपल्या घरात सुद्धा बहरायलाच पाहिजे हा, वेळ आल्यावर हे कुणीच करत नाही, तिच्या पगारावर मात्र हक्क दाखवतात.


मुलगी नोकरी करणारी असेल तर तिने तिच्या पैशाच काय करायचं हा सर्वस्वी तिचा अधिकार आहे, ती ठरवेल तिला तो पगार माहेरी द्यायचा आहे की सासरी. आणि जर तिने तो माहेरी दिला तर तो त्यांचा हक्क आहे कारण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आई वडीलच आपल्याला मदत करतात. मग सासरच्यांना काही आपत्ती नसायला हवी.

बऱ्याच ठिकाणी मुलगी सून म्हणून येणार असली की "माझ्यावरचा घरकामाचा ताण हलका होणार" या विचारात अनेक सासवा आणि नणंदा खुश असतात.. मग एकदा का सून घरात आली की घरातील सगळी कामे तिने करावी ही अवास्तव अपेक्षा ठेवली जाते.. ती बिचारी शेवटी माणूसच.. कामात काहीतरी कमीजास्त होतेच.. पण अशावेळी तिला समजून न घेता तिलाच दूषणं दिली जातात.


आपल्याकडे लग्नातील मानपानाला अतिप्रचंड महत्त्व दिले जाते.. सर्वसामान्यपणे मुलीचेच वडील लग्न लावून देतात, आणि वरपक्षाच्या मानपानात काही कमी राहू नये म्हणूनही झटतात.. पण बहुतेकदा वरपक्षाच्या मनाप्रमाणे मानपान झाले नाही तर सासरी मुलीला खूप त्रास सहन करावा लागतो.. मानपानातील त्रुटीही सासरी मुलीच्या स्वातंत्र्य आणि प्रेमावर परिणाम करणारे ठरते..

सासू सासरे, नवरा हे सगळे चांगले असतात आणि सूनबाईही चांगली असते, पण कधी कधी तडजोडीत कमी पडल्याने , कधी विसंवाद झाल्याने किंवा एकमेकांना समजून घेण्यात चुकल्याने एकमेकांविषयीचा आदर किंवा प्रेम कमी होते.

मुलीने माहेरी मदत करणे आवश्यक आहे, तो तिचा अधिकार आहे आणि जबाबदारी सुद्धा, सासरच्यांना आपत्ती नसावी.

हे तिचं तिला ठरवू द्यावं, सासरच्यांनी त्यात लुडबुड करू नये.

समाप्त: