तिचं नशीब

श्रेया ने बोलून बोलून तिच्या मनातील सर्व भावना दुःख काढून घेतले . कित्येक दिवसांनंतर ती इतकी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या . तिला समजवून तीही तिच्या घरी परतली . सुधाची आत्याच्या घरी राहून शारिरिक आणि मानसिक तब्बेत ही सुधारली . महिना दोन महिने राहून तीही तिच्या गावी आईबाबांकडे गेली . घरी आल्यावर तिच्यासाठी पुन्हा स्थळ शोधले जाऊ लागले कारण लहान बहिणीचेही लग्न करायचे होते . आणि मोठी बहिण घरी पडलेली असली की लहान बहिणीच्या लग्नात अडचण असा समज बोलणाऱ्या लोकांचा .सुधा घटस्फोटिता असल्याने स्थळही तशीच येत होते . लग्न झालेले दोन मुलांचा बाप असलेले ,एक स्थळ आलेले त्या मुलाच ही आधी लग्न होऊन घटस्फोट झालेला होता . पाच बहिणीचा एक भाऊ सुरेश , आईवडिल म्हातारे घरी गाई म्हशी होती . तिला तिची संमती कोणी विचारलीच नाही . लवकरच तिचे लग्न लावण्यात आले
तिचं नशीब 



          असं म्हणतात ना , जन्म घेतल्यावर आपल्या नशिबाचे भोग भोगावेच लागतात. ते सुटत नाही असच काहीसं झालंय . हा जीवनाचा प्रवास कुठून कुठपर्यंत आणून सोडणार हे मलाही माहित नाही .

 

सुधा जगदाळे ही अतिशय सुंदर शांत स्वभावाची थोडी नाजुक अशी जन्मानंतर ही जास्त आजारीच असायची . डॉक्टरकडे नेल्यानंतरही नेमका कोणता प्रॉब्लेम आहे हे माहितच नव्हता होत पण एक होत की तिला आजारी पडल्यावर वारंवार रक्त लावावे लागत होते . म्हणूनच की काय अभ्यासात मागे होती . तरुणपणात पर्दापण झालं तसं सुंदर असल्यामुळे तर मुलांची रांगच लागली होती . शाळेत ही कॉलेजात ही मुल मागे मागे होती . तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते . पण ही कोणाशी काही बोलेल तर शप्पथ ! कॉलेजच्या मुलाने तिच्या मैत्रिणीच्या मार्फत तिला चिठ्ठी ही दिली. ती चिठ्ठी तिने पाहिली ही नाही तशीच परत पाठवली . तिने चिठ्ठी घेतली नाही म्हणून तो मुलगा दुपारच्या वेळेला तिच्या घरी जाऊन चोरून खिडकीतून तिच्या अंगावर चिठ्ठी फेकून दिली . तो कागद सापडला तीच्या लहान बहिणीला तीने तो वाचला . घरात सर्वांना माहिती झाले शेजारीही माहिती झालं हिला एका मुलाने चिठ्ठी दिली म्हणून मग कॉलेजला जातांना येतांना सोडले जात होते. कसबस तीच वर्ष पूर्ण झाल आणि स्थळ पाहायला सुरवात झाली. पहिलच स्थळ आलं मुलांना चांगल्या नोकरीवर होता पगार ही चांगला कुठेच नाव ठेवायला जागा नव्हती म्हणून मग हे स्थळ फायनल करून लग्न धूमधडक्यात लग्न झालं . लग्नानंतर नवलाईचे नऊ दिवस सरले तसे नवऱ्या मुलाचेही एक एक गुण बाहेर येऊ लागले . रात्री मद्यपान करून येऊन तिच्यासोबत तिच्या मनाविरुद्ध संबंध ठेवले . तिला मारझोड करून डांबून ठेवले . काही दिवसांनी माहिती पडलं की त्याच आधी एक लग्नं झालेले होतं . तिने त्याचा जाब विचारला तर तिच्याच चरित्र्यावर संशय घेतला गेला . उलट तिच्यासोबत च राहणार असं म्हणाला तेव्हा हे सर्व तीने आईबाबांना फोन करून सांगितले आणि मला घेऊन जा म्हणाली .आईबाबां येऊन तीला घेऊन आली. सुधाच्या सासरच्या लोकांच्या विरोधात कम्पेंट केली. आधीच शांत असणारी सुधा शांत शांत राहत होती एकटी बसून एकटक विचारात बसत असायची . तिथे असूनही नसल्या सारखी होती. तिने निर्णय घेतला घटस्फोट देण्याचा आणि दिलाही याला वर्षाचा अवधी लागला . नंतर तिला मानसिक ताण दूर व्हावा म्हणून तिच्या आत्याकडे काही दिवस पाठवले. तिथे तिच्याच वयाची तिच्या आत्याची मुलगी श्रेया होती . तिचेही लग्न झालेले होते . तीही तिला भेटायला आलेली . दोन्ही ही बहिणी कमी मैत्रिणी सारखेच राहत होते . 


"सुधा अशी शांत शांत किती दिवस राहशील , नको विचार करू गं इतका तो तुझ्या लायकच नव्हता मुळी त्याने फसवलं गं आधीच त्याचं लग्न झालेले हे त्यां सर्वांनी आपल्या पासून लपवून ठेवले . मला एक तरी त्याची अशी गोष्ट सांग तिच्याने तुला आनंद झाला असेल?" श्रेया 



"श्रेया , एक ही अशी गोष्ट नाही की आठवण नाही त्याची पण हे माझ्यासोबतच का झाले?" सुधा





" सुधा हे का झाले हे माहित नाही कदाचित आपण त्यांची चौकशी करण्यात कुठे कमी पडलो . पण ते झाले ते आता बदलता येणार नाही . तू पुढचा विचार कर मागच सर्व सोडून दे ! आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोतच की." . श्रेया तिला समाजावत म्हणाली .




श्रेया ने बोलून बोलून तिच्या मनातील सर्व भावना दुःख काढून घेतले . कित्येक दिवसांनंतर ती इतकी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या . तिला समजवून तीही तिच्या घरी परतली . 



सुधाची आत्याच्या घरी राहून शारिरिक आणि मानसिक तब्बेत ही सुधारली . महिना दोन महिने राहून तीही तिच्या गावी आईबाबांकडे गेली. 




घरी आल्यावर तिच्यासाठी पुन्हा स्थळ शोधले जाऊ लागले कारण लहान बहिणीचेही लग्न करायचे होते . आणि मोठी बहिण घरी पडलेली असली की लहान बहिणीच्या लग्नात अडचण असा समज बोलणाऱ्या लोकांचा .




सुधा घटस्फोटिता असल्याने स्थळही तशीच येत होते . लग्न झालेले दोन मुलांचा बाप असलेले ,एक स्थळ आलेले त्या मुलाच ही आधी लग्न होऊन घटस्फोट झालेला होता . पाच बहिणीचा एक भाऊ सुरेश , आईवडिल म्हातारे घरी गाई म्हशी होती . तिला तिची संमती कोणी विचारलीच नाही . लवकरच तिचे लग्न लावण्यात आले . लग्न होऊन ती एखाद्या जनावराला जुंपली आहे तशीच अवस्था होती . नवरा ड्रायवर असल्याने कधी दोन दोन दिवस बाहेरच कामावर राहत होता . दोन महिने होताय न होता तोवर सासूबाईंनी घरात पाळणा हलत नाही म्हणून कुरबूर करू लागल्या होत्या . ती सासुबाईंचे टोमणे ऐकत होती . एक दिवस सुधाचा नवरा रात्रीचा कामावर गेला होता त्याच वेळी ती झोपली असतांना तिच्या जवळ तिचा सासरा आला आणि तीला वरून तर खालपर्यंत त्याची वासनाने भरलेली नजर फिरवत 
होता . जवळ जाऊन तो तिच्या डोक्यावरुन हात फिरवून खांद्यापर्यंत नेला . तिच्या पायावरून नजर फिरवून हात फिरवला पायाच्या अंगठ्यापासून घाणरेडा स्पर्श करत वर जात होता . त्याचवेळी तीला काहीतरी वेगळं जाणवले आणि तिने डोळे उघडले . समोर तिच्या सासर्याला पाहून ती उठून उभी राहिली .

 

"तुम्ही इथे काय करताय ? जा इथून " … घाबरून ती जोरात ओरडली . आणि रडत बसली . सुरेश घरी आल्यावर त्याला सांगून दिले. त्यानेही त्यावर कानाडोळा केला . तिने तिच्या आईला सांगितले पण ही गोष्ट घरातली बाहेर जाऊ न देता तीच्या आईने त्यांना बोलावून चांगलेच सुनावले .



काही दिवसांनंतर तिला दिवस गेले आणि सासुबाईचे तोंड बंद झाले . मुलगा झाला वंशाचा दिवा आला होता पहिली डिलिव्हरी माहेरीच होती . बाळाचे नाव मोहन ठेवले गेले . तीन महिन्यानंतर सासरी गेली. तिचं रुटिन सुरु झालं . सर्व आवरता आवरता थकून जात होती . मोहनचे सर्व अतिलाड करत होते त्यात मुलगा म्हणून बघायलाच नको! बाळ हट्टी होत होते . तिला तिच्याच बाळाला बोलायची चोरी. 'बोलू नको आमच्या नातवाला!' मोहन तीन वर्षांचा झाला पण तो कोणाचेही ऐकत नव्हता . जी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि हे सर्व त्या बाळाचे हट्ट बाबा ,आजी आजोबा पुरवत होते त्यानेच जास्तच हट्ट करत होता . सुधा आई असूनही काही करू शकत नव्हती. तिचा नवरा सुरेश ही तिचे काही ऐकत नव्हता . अशातच एकाएकी सुधाची आई हे जग सोडून गेली . तिची आई तिच्यासाठी मॉरल सपोर्ट होती .. तिचा मॉरल सपोर्ट हरवला . तिच्या आईला जाऊन एक महिना झाला आणि तिच्या वडिलांनी दुसर लग्नं केले . तिच्या लहान बहिणी मयुरीचेही लग्न झालेले होते .


सुधाच्या घरी दुसरा पाहूणा ही आला होता. छोटी माहि आली . मोहनने एकदा तिला झोक्यातून पाडले तरीही आजी आजोबा त्याचा बाबाही काहीही बोलले नाहीत . आणि एकदिवस कामावर गेल्यावर सुरेशची तब्बेत खराब झाली आणि त्यातच तो कायमचा सोडून गेला. सुरेश गेल्यानंतर तिच्यासमोर मोठ्ठ संकट उभे राहिले . दोन्ही मुलांचे संगोपन पण आधीच मोहन कुणाच ऐकत नव्हता . सुधा नवरा गेल्यावरही सासरीच राहिली . आता सुरेशला जाऊन दोन महिने झाले होते .



अचानक रात्री तिला तिच्या छातीवर दाब जाणवला तशी खाडकन डोळे उघडून पाहिले आणि समोरच्याला व्यक्तीला दूर ढकलून दिले जोरातच ओरडली . समोर असलेली व्यक्ती दुसर कोणी नसून तिचा सासरा होता . स्वतः पाच मुलींचा बाप असूनही दुसऱ्या मुलींच्या अंगावर हात
टाकणे.आज तर सर्व सीमा पार ओलांडून दिल्या . सुधावर हात टाकला तिच्याकडून बोलणारे कोणीच नाही एक होती सुधाची आई तीही या जगात नाही . बाप तर नावापुरतीच राहिला होता आणि सुरेश गेल्यावर तिच्या सासऱ्याला रान मोकळे झाले होते . तिच्या सासू आणि सासर्याने तिलाच बोल लावले की ही म्हातारपणात बदनामी करत आहे. तीला तिथे आता एक क्षण ही थांबू वाटले नाही तीने तडक निघायची तयारी केली . मुलांचे कपडे भरून त्यांना घेऊन बाहेर निघेल तर सासुने मोहनचा हात पकडून घेतला ते दोघही मोहनला सुधा सोबत जाऊ देत नव्हते. दोघांची वादावादी झाली . 


"मोहन आमचा नातू आहे तो एकुलता एक वारस आहे आमच्या घराण्याचा , तुला जायचं आहे तू जा!".. सासूबाई



" मोहन माझा मुलगा आहे त्याला मी सोबतच घेऊन जाणार ". सुधा



सुधा रडत होती. मोहन सोबत येण्यासाठी मनवत होती पण मोहन हा सुधाचा ऐकणारा नव्हता तो फक्त आजी आजोबाच ऐकायचा . छोट्याशा मोहनला त्याच्या आईविषयी सासुबाईंनी काही बाही सांगितलं होतं त्यामुळे त्यानेही त्याच्या आईचे ऐकून घेतले नाही . नाईलाजाने ती मुलीसोबत च माहेरी आली. माहेरी आल्यावर दोन दिवसांनी तिच्या दुसऱ्या आईने तिच्या बाबाला सांगून कामाला लावले ती तिच्या मुलीचे काम करून घरात ही काम करत होती पण आता ही कायमची त्याच्याजवळ आली म्हटल्यावर त्यांना तीची अडचण जाणवायला लागली होती . तिच्या मुळे तीच्या दुसऱ्या आईचा आणि तिच्या जन्मदात्याचा संसार होत नव्हता असा त्या दोघांच म्हणणं होतं . एवढ्या मोठ्या घरात तिला एकाच खोलीत वेगळे काढून दिले . एकवेळेस तर तिला त्या रूम मध्ये कोंडून बाहेर मुख्य दरवाजाला कुलूप लावून बाहेर पडले . गॅस सर्व लपवून गावी गेले . शेजारी असलेल्या रमा मावशीने कुलूप तोडून टाकले . दोन ते तीन दिवस रमा काकूंनी तिला जेवण आणून दिले होते . विश्वास बसणार नाही पण खरं आहे . लहानपणी तिच्यावर जीव ओवाळून टाकणारा बाप असा वागू शकतो . मयुरीने येवून आईवडिलांसोबत भांडण केली. 


"सुधाला ताई कोणीच नाही तिला आधार नाही म्हणून ती ह्या घरातच राहिल . पुन्हा तीच्यावर काही करण्याचा प्रयत्न जरी केला तर मी हे विसरून जाईल की तुम्ही आमचे बाबा आहेत . कायद्याने तीचा अधिकार आहे. तुम्हाला जर तीची अडचण होत असेल तर तुम्ही दुसरीकडे राहू शकता " तीने कडक शब्दांत बाबांना सुनावले .
दोन चार दिवस राहून मयुरी तिच्या घरी गेली. आणि सुधा तिथेच राहू लागली. मुलगी लहान असल्यामुळे बाहेर कुठे जाऊ शकत नाही . विधवा म्हणून तीला पगार मिळतो त्यात आणि सुधाची बहिण हि आठवड्यातून एकदा घेऊन सामान भरून देत होती . ती तिचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत होती .

समाप्त

हॅलो फ्रेंडस्,
ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे . 
किती वाईट परिस्थिती आली नं तिच्यावर असं तर कोणासोबत ही होऊ नये. आई असे पर्यंत तिचे बाबा तिचे होते पण आज तिला कोणाचाच आधार नाही . विधवा महिलेचा पगार किती असतो. हे तर तुम्हालाही माहिती आहेच . काल्पनिक कथेत आपण शेवट गोड करू शकतो. पण काल्पनिक आणि सत्यात खूप फरक असतो . म्हणून शेवट गोड झाला नाही . ती सुधा आजही तशीच जीवन जगत आहे. तिच्या मुलासाठी तिचा जीव तळमळत आहे. तिची मुलगीच तिच्या जीवनाचा आधार आहे पण एक आशा आहे की तिचा मुलगा तिच्याजवळ परत येईल . दोष कुणाचा ? तिचा की तिच्या नशिबाचा ? . काय करावं तिने पुढे .. मुलासाठी तिने सासरी जायला हवं का? दोनदा झालेला प्रयत्न तिसऱ्यांदा पूर्ण होऊच शकतो. तुम्हाला काय वाटते अभिप्राय जरूर कळवा . 

माझी हि कथा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा .

धन्यवाद