Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

तीच पहिला गुरू

Read Later
तीच पहिला गुरू
तीच पहिला गुरू !!

स्वाती हे काय ग लावलेस नवीन नाटक तू दरवेळीच..? आई स्वातीला दटावत म्हणाली

आईने हात पकडला होता स्वातीचा आणि तिने डोळे मोठे करून रागाने विचारण्याची ही स्वातीचा आयुष्यातील पहिलीच वेळ होती..

"आई हात सोड, दुखतोय खूप..इतका जोऱ्यात पकडला की व्रण उठतील.."..स्वातीने हात झटकला आणि आईला ओरडली


"अग तू दरवेळी येतेस, आणि नवीन काही तरी भांडण आमच्या कानावर घालतेस.. त्यातून दोन दिवस राहून जातेस आणि तो तुला घ्यायला आला की हसत निघतेस.. जणू काही घडलेच नाही तुमच्या मध्ये.." आई

"मग येऊ नको का मी माझ्या सेकंड होम ला." स्वाती

" हे काय सेकंड होम म्हणे, माहेर म्हणायायला सांगितले आहे कितीदा.." आई

"आई मूळ मुद्द्यावर ये,मी इथे येत जाऊ नको का ते सांग." स्वाती

"अग बाई तुझ्याशी डोकं लावणेच नको, कुठले कुठे घेऊन जायला शिकलीस सासरी, आधी अशी नव्हतीस ग तू.." आई

"आई परत मूळ मुद्दा त्यावर बोल, हे माझे घर नाही का, मी येऊ नको का इथे.." स्वाती

"तू ये बाईss.. पण हसत ही येत जा जरा..आली की डाफरलेलीच असते सदाच..आमचे काळजी नेहमीच का टांगणीला लावतेस.. जीव खरंच खूप घाबरा होतो ग..आई ला आंनद ही हवा असतो नांदायला गेलेल्या लेकी कडून..पण तू तो कधीच मिळू दिला नाहीस ग स्वाती..शेजारची कोमल आली की हसत येत..जाताना हसत आणि सुखा समाधानाने जाते..आई वडील खुश..भरून पावलेले असतात.." आई जणू काकुळतीला येऊन म्हणत होती

"आई पुन्हा तू रडतेस, अग तुझ्याशिवाय मी कोण आहे, मला त्रास होतो त्याच्या वागण्याचा ..नाही पटत काही गोष्टी त्याच्या आणि मग होतो वाद आमच्यात..आणि मग संतापून येते ते माझ्या ह्या घरी..तुझ्याकडे..मग तू विचारले ना प्रेमाने तर बोलून टाकतेच..मग मन हलके होते.." स्वाती

"पण मी ही आता थकत चालले आहे ग, मला माझ्या व्याधी, मनाची चलबिचलता सतत तुझा विचार ,तुझं सुख या पलीकडे काहीच सुचत नाही, त्यात तुझे अचानक भांडण करून आलीस की त्राण उरत नाही ग, पाय गळून जातात..अजून किती दिवस चालायचे हे तुझे..तो बिचारा इतका ही वाईट नाही..तू रुसलीस.. घरी नसली की सगळे सोडून धावत येतो..मला तुझा त्रास झाला म्हणून माझी ही माफी मागतो..त्याला ही तुझे वागणे लाजिरवाणे वाटते..मग का तू सुखाची भागीदार होत नाही ग..जरा त्याला ही सुख दे..मला ही दे.." आई पुन्हा डोळे पुसत स्वातीला समजून सांगत होती..

"आई ही शेवटची संधी दे,पुन्हा मी त्याला कसली तक्रार करण्याची संधी नाही देणार,मी ही स्वतःवर नियंत्रण ठेवणार..झाले जरी वाद तरी सहन करायचे शिकेन..त्याला माझ्या त्रासामुळे तुझी माफी मागायची वेळ येऊ देणार नाही..पण तू अशी सांजवेळी रडू नकोस ग.." स्वाती

"ती कोमल जेव्हा ही आंनदी दिसते ना तेव्हा तेव्हा देवाला म्हणते असे सुखी आणि आंनदी माझी स्वातीला ही ठेव..माझें सर्व सुख माझ्या लेकीला दे.." आई

दोघी ही गळ्यात पडून रडू लागल्या.. स्वातीने आईचे डोळे पुसले... आईने स्वातीचे डोळे पुसले.. जावई दारात उभा होता..त्याला ही भरून आले... तो त्याची बॅग ठेवून आईच्या पाया पडला..स्वाती लगेच त्याला पाणी आणायला आत गेली..आईने पदर सावरला..डोळे पुसले.. आणि लगेच मूड बदलून जावयाला सुखी होण्याचा आशीर्वाद दिला...आणि हसल्या जणू काहीच घडले नाही...

रोहित,"स्वाती आज तू येऊ नकोस घरी."

स्वाती, " अरे हे काय नवीन तुझे.."

रोहित, "आज मी ही घरी जाणार नाही, मी ही आज माझ्या सासरी मुक्काम करू म्हणतोय.."

आईला छान वाटले जावई किती दिवसांनी घरी रहाणार आहे म्हटल्यावर..जरा दोन दिवस कोणी तरी आहे आधाराला..आणि एकटेपणा दुरु करायला..मन रमायला...

जावई तसा खूप बोलका आणि मन कवडा..कधी त्याने कसला त्रास दिला नाही..जो काही त्रास होतो तो स्वातीमुळेच अशी समजूत होती.. त्याचे वरच्या वर कॉल येत..कधी गरज लागली तर दवाखाना ही तो करत..आणि पैसे ही घेत नसे..

"मग काय आज आई खुश बघ रोहित, इतकी तर लेक आल्यावर ही आंनदी नसते जितका तू असल्यावर असते.." स्वातीने हळूच टोमणा मारला

"तू आहेस तशी गुणाची,आली तशी आईच्या मनाचा बोज हलका करतेस..त्रास अजिबात देत नाहीस..तिचे हाल हवाल तर लांब स्वतःची गाऱ्हाणी सांगत बसते आणि रडायला लावतेस.." रोहित

"रोहित ते असेच अश्रू होते, ते तिच्यामुळे नव्हते रे, तिने सांगावेच काही त्रास असेल तर ..पण त्रास नसतांना ही त्रास होतो ही तिची सवय चुकीचीच आहे..नाही पटत मला.." आई

थोड्यावेळाने सगळे जेवण झाल्यावर..आई , स्वाती , रोहित आपले गप्पा मारत असतात, तेव्हा बाहेरून कोणाचा तरी आवाज येतो...

आई लगेच बाहेर येऊन बघते...

स्वातीला ही कळत नसते नेमका काय प्रकार आहे..

बाहेर कोमल आणि तिची आई दोघीच भिंतीला टेकून रडत उभ्या ...

दोघींचा आवाज आईच्या अचानक कानावर पडतो.. तिला घाबरायला होते...

आई आपल्या गेट मधून बाहेर जाते..आणि त्यांचे गेट उघडते..

दोघी त्यांना बघून गप्प होतात..आणि आत निघायच्या बेतात असतात तितक्यात..स्वाती बाहेर येते आणि विचारते..
" अरे कोमल क्या हुवा, का रडतेस..काकू ही का रडत आहे..सगळे ठीक आहे ना.."

कोमल तिची खूप खास मैत्रीण होती..मनातले सगळे सांगायची..स्वातीला बघताच तिचा बांध फुटला आणि ओकसाबोक्शी रडू लागली..

"स्वाती, सब खतम हो गया.."

" क्या खतम हो गया,? "

" मिहीर मला सासरी येऊ नको म्हणाला " कोमल

"त्यात काय खतम झालं मग, असेल काही कारण ,सांग काय झालं की तो असं म्हणाला " स्वाती खमक्या आवाजात म्हणाली

" स्वाती तो अचानक मला माहेरी घेऊन आला आणि म्हणाला आता तू इथेच रहा..तू इथे येऊ नकोस" कोमल

"मला फोन दे त्याचा मी बोलते त्याच्या शी लगेच ,का असे करतो विचारलेच.." स्वाती

स्वाती ,मिहीर,आणि कोमल सोबत कॉलेजमध्ये शिकत होते..स्वाती मूळे दोघांचे लग्न घडून आले म्हणून ती त्या हक्काने त्याला बोलायला गेली.
स्वातीने मिहिरला फोन लावला.."मिहीर तडक तू माझ्या घरी ये..जिथे आहेस तिथून.."

" अरे यार स्वाती, काय कुठे आहेस..किती दिवसांनी बोलतेस..आज बरी आठवण झाली तुला माझी.." मिहीर

"वेळ नसेल तर वेळ काढून ये मिहीर..तू मला वचन दिले होतेस कोमल ला खुश ठेवशील..कायमच " स्वाती

"अग होच मुळी, मी तिला सगळे सुख देतच आहे, काही तक्रार आहे का माझ्याकडे , असेल तर हा लगेच येतोच मी..ऑन the वे आहे, तिलाच घ्यायला येत आहे.." मिहीर

स्वातीला एकंदर सगळी परिस्थिती कळली, काही टेन्शन घ्यायचे कारण नव्हते असे त्याच्या बोलण्यावरून समजत होते..

तरी तिने कोमलला कारण विचारले..

" कोमल काय झाले होते की तो तुला इथे सोडून गेला..? "

" अग त्याच्या आईला आम्ही सोबत ठेवतो, पण आज माझ्या आईला सोबत घेऊन जाऊ म्हणाले तर त्यावरून घरात वाद झाले..त्याला मी माझी बाजू समजून सांगितली आणि तो काही निर्णय घेण्याआधी मला म्हणाला तू माहेरीच रहा, मुलगा आणि तू तिथेच रहा..मग मी भांडले..जे मी कधीच भांडू शकले नाही..सगळे छान आहे, सगळे छान होईल, आईला त्रास नको म्हणून सहन करत राहीले, त्याचा फायदा सासरच्यांनी घेतला..त्यांना वाटले हिची कमजोरी तिची आई आहे..किती ही बोला ही आईसाठी आपले ऐकून घेईल..पण माझी ही मर्यादा आहे हे नाही का कळत त्यांना..त्यात मिहीर ही तसाच.."कोमल

स्वातीने तिला कान मंत्र दिला ,जसा कधी काळी ती गरीब स्वभावाच्या कोमल ची गुरू म्हणून द्यायची आणि त्यामुळे कोमल बऱ्याच पैकी स्वतःसाठी आवाज उठवायला शिकली..तिच्या मध्ये हिम्मत आली..विविध स्पर्धेत भाग घेऊ शकली..आणि तिथेच मिहीर सोबत प्रेम ही झाले..आणि मग घरच्यांना कसे समजवायचे हे सल्ले ही स्वाती ने दिले..आज ही स्वातीच गुरू म्हणून धावून आली..स्वातीच तिचा जणू पहिला गुरू होती जिने निडर होऊन जगायला शिकवले..

मैत्रिणीचा त्रास सहन झाला नाही म्हणून गुरू पुन्हा गुरू झाली..

"तू नेहमीच तुझी पडकी बाजू आहे, किंवा तुझी ही कमजोरी आहे हे कोणालाही कळू देऊ नकोस, आणि तू चूक आहेस तर ऐकून घे पण तुझी चुकी नाही तर ऐकून घ्यायचे नाही हेच लक्षात ठेव..मिहीर जरी प्रेम असेल तरी नवरा आहे..वेळी त्याला ही तुझी बाजू मांडताना भांड..पण गप्प बसून प्रश्न सुटत नाही हे लक्षात ठेव..आणि भांडण झाले की ये बिनधास्त आई कडे..रहा दोन दिवस..मग बघ कसा येतो तोच तुझ्याकडे. हो पण सतत नको..तिथे राहून ही किल्ला लढाऊ दाखव...मग तुझ्या अस्तित्वाची जाण येईल लक्षात सगळ्यांच्या.. " स्वाती

" जमेल की नाही हा सल्ला पण मी नक्कीच विचार करेन ..आता माझी मर्यादा संपलीच ग." कोमल

"तू ग कशी येतेस इथे दरळवेळी,तू का नाही लढवत किल्ला स्वाती ?" आई

"आई आमचा राजा राणीचा कारभार आहे ग, म्हणून " स्वाती

मिहीर येतो आणि स्वतीसोबत टाळी देत एन्ट्री करतो..

"मी कोमल आणि तिच्या आईला घेऊन जायला आलो आहे, घरी कोमल आणि तिच्या आईला घेऊन ये म्हणत आहेत....कोमल नाही तर सगळे जण हरवल्या सारखे झाले आहेत..आणि मी तिचा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहचवला आहे ..तो त्यांना पटला आहे.."

" मग मला का इथे ठेवून गेला होतास.?" कोमल

"त्यांना तुझी किंमत कळावी म्हणून..जी तू असताना कधीच कळली नसती म्हणून" मिहीर.


अशी ही एक गुरू असावीच ना स्वाती सारखी.. असेलच तुम्हाला ही अशी एक गुरू कम मैत्रीण हो ना..समाप्त
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//