Mar 01, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिचं जग (श्रावणी लोखंडे)भाग ४ अंतिम

Read Later
तिचं जग (श्रावणी लोखंडे)भाग ४ अंतिम


शालिनी ने तिच्या लेकीला न्याय मिळवून दिला होता पण आता त्याला शिक्षा व्हायची बाकी होती. घरी गेल्यावर सासूने तीच सामान घराबाहेर काढलं होत आणि जावेने पण तिच्यावर नको नको ते आरोप लावून घरातून निघून जायला सांगितलं. तिने बाहेर फेकलेली तिची बॅग उचलली आणि घरात गेली त्यात तिने सुधिरचा आणि तिच्या प्राजक्ताचा फोटो भरला आणि माहेराहून आणलेली बाळकृष्णची मूर्ती लाल कपड्यात ठेऊन त्याला गाठ बांधून ती पोटली तिने तिच्या उराशी धरली आणि त्या घरातून निघून गेली. गावाबाहेर शहरापासून तासभर अंतरावर महिला आश्रम होत तिथेच तिने स्वतःची व्यवस्था करून घेतली.

आठ दिवसांनी कोर्टात केस उभी राहिली. शालिनी ची सासू..चुलत दिर आणि जावा पण आल्या होत्या कोर्टात.

"जज साहेब..या माणसाने त्याच्या सख्ख्या..चार वर्षाच्या पुतणीवर अत्यंत निर्दयीपणे अतिप्रसंग करून तिला जीवे मारण्याचा अक्षम्य असा गुन्हा केला आहे. जज साहेब याला गुन्हा म्हणायचा की पाप हे पण मला समजत नाहीये. कोर्टाला माझी कळकळीची विनंती आहे..या असल्या हैवानाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. नऊ महिने स्वतःच्या उदरात ठेवून..रक्ताच पाणी करून आईने मुलांना वाढवायचं आणि त्यांचा जीव असल्या नराधमांनी घ्यायचा हे कुठपर्यंत चालत राहणार आहे. त्या आईच्या काळजाला किती जखमा झाल्या असतील याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. मला माहित आहे मी कोर्टात आहे आणि खूप भावनिक होऊन बोलतोय पण जज साहेब असल्या माणसांना जो पर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत दुसरे नराधम जन्म घेतच राहतील. आपण याला योग्य ती शिक्षा देऊन प्राजक्ताला न्याय मिळवून द्याल अशी आशा बाळगतो. दॅट्स ऑल!" ऍडव्होकेट.नलिन खैरे

"सर..मला काही बोलायचं आहे." शालिनी

"तुम्हाला जे बोलायचं आहे ते इकडे येऊन बोला."जज साहेब

"सर..आम्ही बायकांनी आणि मुलींनी नक्की काय करायचं.. कस वागायचं किंवा कसे कपडे घालायचे? म्हणजे असल्या पुरुषांची नजर आमच्यावर पडणार नाही. बस मधे जा..भाजी मार्केट मधे जा.. देवळात लाईन मधे उभ रहा कुठेही जा यांच्या वाईट नजरा आमच्यावर कधी पर्यंत रोखून असणार. अंगभर साडीवर पण हे हात टाकतात आणि छोट्या कपड्यांमध्ये बागडणाऱ्या निरागस मुलींवर पण हे हात टाकणार. साठ वर्षाची बाई दिसत नाही की चार वर्षाची पोर दिसत नाही. घरात पण आम्ही सुरक्षित नाही मग आम्ही सुरक्षित कुठे राहू शकतो अस एखाद ठिकाण सुचवाव..निराधार बायकांना पण हल्ली निराधार केंद्रामध्ये गलिच्छ वागणूक दिली जाते. तिकडेही तिच्या इभ्रतिवर हात टाकला जातो. यांच्या मनाप्रमाणे नाही वागल तर हे अंगावर ऍसिड फेकणार नाहीतर तोंडावर. कधी छातीवर हात..कधी पाठीवर हात..शी....शिसारी येते अंगावर. किळस वाटते अश्या लोकांची.
जज साहेब मला न्याय फक्त माझ्या मुलीसाठी नकोय. त्या सगळ्या मुलींसाठी हवाय ज्यांना त्यांचं स्वतःच जग निर्माण करायचं आहे पण असले नराधम त्यांना तिचं जग निर्माण करूच देत नाही आहेत." शालिनीला अश्रू अनावर होतात आणि ती रडू लागते.

मंदारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. घरातल्या इतर लोकांची हाय घेऊन ती मात्र नव्याने तीच जग निर्माण करायला पुढे सरसावते आणि तिला साथ मिळते ती तिच्या ऍडव्होकेट सरांची आणि नव्या आश्रमातील बायकांची....
समाप्त.....
@श्रावणी लोखंडे ©
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

नवीन रेसिपी घरी बनवून घरातल्याना खायला घालायला आवडते??.वाचायला आवडते आणि गप्पा मारायला तर खूपच आवडते?

//