तिचं जग(श्रावणी लोखंडे) भाग एक

लढाई एका आईची


"कालची बातमी वाचलीस का ग? सख्ख्या काकाने त्याच्या चार वर्षाच्या पुतणीवर बलात्कार केला. काय निर्दयी माणस आहेत ना?"

"हो ना..यांना माणूस तरी म्हणावं की नाही समजत नाही. काय तर म्हणे बिना कपड्याची झोपली होती म्हणून त्याचा संयम सुटला..शी....काय मानसिकता आहे यांची!"

"तिच्या आईने स्टेटमेंट दिलं होत. अंगभर पित्त उठल होत म्हणून कोकमाच पाणी लावून तिला पंख्याखाली झोपवून ती कपडे धुवायला विहिरीवर गेली होती म्हणे...घरी आली नी बघते तर तिची इवलिशी लेक रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडली होती."

दोघीजणी बस मधे बसून पेपरला आलेल्या आदल्या दिवशीच्या बातमी बद्दल बोलत होत्या आणि मागच्या सीटवर बसलेली ती...सगळ ऐकत होती.

"काय त्या आईची अवस्था झाली असेल ना? कल्पना पण करवत नाही. काल तर वाचूनच अंगावर शिसारी आली."

सगळ ऐकून तिच्या डोळ्यात टचकन पाणीच आल. मागे बसून खिडकी बाहेर बघत ती मुसमुसत रडत होती. खूप प्रयत्न करूनही तिच्या डोळ्यातून वाहणारा झरा थांबायचं नाव घेत नव्हता. चालत्या बस मधून मागे पळणारी घरं.. झाडं..आणि मागे सुटणारा रस्ता बघत हाताच्या उलट्या बाजूने ती स्वतः च्या डोळ्यातली आसव पुसत होती.


तिचा स्टॉप आला तशी ती उतरली. बॅग मधून पाण्याची बाटली काढून पाण्याचा एक घोट घेतला आणि पाण्याचा एक हबका तोंडावर मारून घेत तिने पदराने चेहरा पुसला. एक दीर्घ श्वास घेत तिने मोबाईल मधे असलेला पत्ता जवळच असणाऱ्या पान टपरीवर विचारला. बोलता येत नव्हत त्याला म्हणून त्याने हातानेच कुठून कस जायचं आहे ते तिला सांगितल. ती पण समजून घेऊन त्याला धन्यवाद देऊन सांगितल्या प्रमाणे गेली.

समोर मोठी काचेची बिल्डिंग होती. तिने मोबाईल मधे बघून परत एकदा बिल्डिंगच नाव बरोबर आहे का याची खात्री करून घेतली आणि पुढे चालू लागली.

"मॅडम..कुठे जायचं आहे तुम्हाला?" तिथल्या वॉचमनने विचारलं.

"दादा.. आठव्या मजल्यावर जायचं होत.. इंटरवह्यूसाठी!" तिने अदबीने सांगितल.

"बर बर मॅडम..उजव्या हाताला लिफ्ट आहे बघा." चेहऱ्यावर स्मित ठेऊन त्याने तिला सांगितल. तिने पण हसुन होकारार्थी मान हलवली आणि आत मधे गेली.

आठव्या मजल्यावर जाऊन तिने पुन्हा मोबाईल काढून पत्ता नीट तपासून पाहिला आणि आत गेली.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे©


🎭 Series Post

View all