बाईची गोष्ट ( भाग तिसरा)

स्त्रीला आपण किती गृहीत धरून चालत असतो, तिचंही एक जग असतं, स्वप्न असतात तेचं विसरून जातो.


 बाईची गोष्ट (भाग तिसरा )

विषय: खेळ कुणाला दैवाचा कळला 


तो रूमवर आला तेंव्हा त्याला काहीचं सुचत नव्हतं. आता साडे अकरा वाजलेले होते. साडे सातच्या सुमारास अभय त्याला घ्यायला येणारं होता.

संध्याकाळच्या विचारांनी डोक्यात एक झिंग चढली होती. तो आरश्या सामोरं उभा राहिला. किंचित दाढी वाढलेली होती. गुळगुळीत दाढी करायला हवी होती. शेवटी एका मुलीला भेटायचं आहे. त्याचं वेळी त्याला वाटलं, केस देखील निट कापून घ्यावेत. सलून मध्ये जाता जाता अचानक त्याला आठवलं, अरे एखादा छान ड्रेस देखील प्रेस करून आणावा. एखादा बॉडी स्प्रे देखील आणावा लागेल. शूज देखील पॉलिश करायला हवे. मग सगळी तयारी करून तो घरी आला.
आरशात त्याने किती तरी वेळा स्वतःलाच न्याहाळले.

संध्याकाळ झाली. कारण नसतांना त्याने ब्रश केला.  जसजसा वेळ व्हायला लागला. तसतशी त्याची धडधड वाढू लागली. कशी असेल ती स्वभावानं. नंतर त्याने विचार केला. की आपण उगाचच तिच्या बद्दल जास्त विचार करत आहोत.

सर्व ठिकाणी सर्व मान्य असलेला हा एक व्यवहार आहे. आपण उगाचच या गोष्टीला अवास्तव महत्त्व देत आहोत. आपण काही फार मोठं पाप करत नाहीये. ती यायला तयार झाली म्हणजे तिची या गोष्टीला संमती असणारच. आपल्यासाठी ही गोष्ट नवीन आहे. पण तिच्या दृष्टीने कदाचीत नेहमीची असेल. त्या शिवाय ती तयार झालीच नसणार.

अचानक त्याला काळजी वाटली की या अनुभवाच्या भानगडीतून काही आजार वगैरे तर जडणार नाहीत ना. आधीच काळजी घ्यायला हवी. त्याने हळूच अभयला तसा फोन केला. कंडोम वगैरे आणून ठेवायला सांगीतले. अभय नुसताच हसला.

मग त्यानं विचार केला की आपणही या गोष्टी कडे एक नवा अनुभव म्हणून बघू या. मानवी जीवनातली एक आदिम गरज कशी असते ते बघू आणि  तिचा एक प्राणी म्हणून पूरेपूर उपभोग घेऊ या. असे नाना विचार करत, बघता बघता संध्याकाळ झाली. सात वाजायला आले. एका वेगळया अनुभवाला सामोरं जायला तो उत्सूक होवून गेला.

तरी त्याला सारखा एक प्रश्न मनात येतं होता. अगदी कोणतीही ओळख नसतांना असे व्यवहार माणसं करतात तरी कसे.

बरोबर, साडेसात वाजता अभय त्याला घ्यायला आला. त्याला थोडासा नर्व्हसनेस आला होता. पण उगाचच शिळ घालतं तो नॉर्मल असल्या सारखं दाखवत होता.

" काय डॉक्टर साहेब, चलायचं ना" अभयने विचारले. त्यानं नुसती मान हलवली. दोघ गाडीवर बसून फॉर्म हाऊस वर पोहचले.

( क्रमशः)
लेखक:  दत्ता जोशी

🎭 Series Post

View all