तिचं आयुष्य...ती जगली भाग 3

Katha tichya dhairyachi
तिचं आयुष्य...ती जगली भाग 3


समोरचे तीन महिने मधूला उलटी, मळमळचा त्रास झाला.
मधूने तिच्या आईला तिच्या मदतीसाठी बोलवून घेतलं होतं.
पहिली सोनोग्राफी झाली, सगळं व्यवस्थित होतं.


दिवस छान सरत होते, रमेश तिची खूप काळजी घ्यायचा.
सासरचेही अधूनमधून येऊन भेटून जायचे.


शेवटच्या महिन्यात मधूला बेडरेस्ट सांगितलं होतं, मधू पूर्ण दिवस आराम करायची.

मधूची सासू पण गावावरून आल्या होत्या.

बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले, मधूला कळा यायला लागल्या तस तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं.

मधुने गोंडस मुलीला जन्म दिला..

रमेश आणि मधू दोघेही खूप आनंदात होते.

दिवस खुप छान चालले होते.

पण म्हणतात ना नियतीचे फासे कधी पलटतील सांगता येत नाही.


एक दिवस अचानक रमेश अपघातात मधुला सोडुन निघुन गेला.

मधु अगदी  एकटी पडली.

एका छोट्याशा बाळांला घेऊन अख्ख आयुष्य कसं काढायचं हया विचाराने मधू भांबावली होती.

सासरच्यांनी तिला गावात येऊन राहण्याचं सुचवलं होतं, पण मधूला तिथे जाऊन राहायचं नव्हतं. बाळासाठी काही करायचं असेल तर शहरात राहूनच करता येईल असं तिला वाटत होतं.

काही महिने ती आईकडे राहिली त्यांनतर पुन्हा ती स्वतःच्या घरी येऊन एक नवीन सुरुवात केली.


मधु शिक्षीत होती, तिने जॉब साठी अप्लाय करायला सुरुवात केली.

तिला लवकरच एक जॉब ऑफर आली आणि तिने जॉब जॉईन केलं.

ती तिच्या मुलीला (शिखाला) पाळणाघरात ठेवायची.

दिवस, महिने उलटले.

आता मधु आर्थिक रित्या स्वावलंबी होत होती  पण मधुच आयुष्य सोप नव्हत. एकट्या बाईने अख्ख आयुष्य एकटीने काढणे अवघड होतं. हळूहळू मधु यातुन सावरली.

हळूहळू तिचे आयुष्य सुरळीत होत गेले.

आता मधु कुणावरही अवलंबून नव्हती.

मधुच आणि शिखाचं छान चाललेलं होतं.

शिखा हळूहळू मोठी होतं गेली, तिने ही तिच्या जीवनात बरेच उतार चढाव बघितले. खूप कमी वयात ती समंजस झालेली होती. आईच्या चेहऱ्यावरचे भाव तिला लगेच कळायचे.
दोघीही एकमेकींशी सगळं शेअर करायच्या.


शिखाचं शिक्षण झालं,
तिला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली.
आता सगळं छान चाललेलं होतं,
ती आईला आनंद देण्याचा प्रयत्न करत होती.

दोघीही एकमेकांना खूप सांभाळून घ्यायच्या.

क्रमशः

🎭 Series Post

View all