Feb 23, 2024
नारीवादी

तिचं आयुष्य...ती जगली भाग 1

Read Later
तिचं आयुष्य...ती जगली भाग 1
तिचं आयुष्य...ती जगली भाग 1


मधू आणि रमेशचं अरेंज मॅरेज होतं. रमेश एका प्रायवेट कंपनीत कामाला होता.
त्याचे आई बाबा, आणि भाऊ गावाला राहायचे.
शहरात मधू आणि रमेश दोघेच राहायचे, दोन खोलीच भाड्याचं घर होतं.

सगळं छान सुरू होतं.

रमेश दिवसभर ऑफिसला जायचा, मधू घरचं काम आवरून    तिचे छंद जोपसायची. तिला बागकाम आणि शिवणकाम खूप आवडायचं.

दिवस छान आनंदाने सरकत होते.

बघता बघता मधुच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली होती आणि आता साहाजिकच मधुची उत्सुकता वाढली आई  होण्याची.

तिने विषय काढला मी रमेश नेहमी टाळाटाळ करायचा, आज तिने त्याच्याशी बोलण्याचं ठरवलं.


मधु: "रमेश एक ना, मला  तुझ्याशी बोलायचंय."

रमेश: "ह, बोल."

मधु: "आता आपण बाळांचा विचार करूया ना. आपल्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली अजून किती दिवस थांबायच,प्लिज विचार करना. मी जेव्हा जेव्हा विषय काढते तू बोलायचं टाळतोस, आज तू नीट बोल माझ्याशी."


रमेश:"ह... बघू."

मधू: "बघू नाही तू नेहमी असाच वागतोस."

रमेश: "मधू सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, नुसतं बोललं आणि केलं असं नसतं."

मधू: "आधी आपण चान्स तर घेऊया, सगळं नीट होईल बघ."

रमेश आणि मधुचं अधून मधून असंच बोलणं व्हायचं पण रमेश सध्या तयार नव्हता. 

त्याला बाळाच्या आगमनाच्या आधी त्याला त्याची आर्थिक स्थिती बळकट करायची होती, त्याचे बरेचसे प्लॅन होते.


पण मधूने त्याच्या मागे तगादा लावला आणि खुप  प्रयत्नांती रमेशने होकार दिला.
मधू आनंदाने घरभर नाचायला लागली.

"मधू तुझं काय चाललंय, काय अशी घरभर नाचतीयेस?"


"तुला मी शब्दात सांगू शकत नाही की मला किती आनंद झालंय."

"बाळ आल्यानंतर तुझं काय होईल कुणास ठाऊक?" त्याने हसत डोक्यावर हात ठेवला.


क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//