Login

तिचं आभाळ भाग 2

Story about Separation


"निहार, अरे जबाबदारी मला हवी होती. मन लावून संसार करायचा होता मला. तुम्हा सर्वांसाठी खूप काही करायचं होत. पण तुझ्या आई -बाबांनी तशी वेळ कधी येऊच दिली नाही.

प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं सुखी, समाधानी संसाराच. ते पाहायची देखील संधी मिळाली नाही." सावनीचे डोळे पुन्हा भरून आले.


"मॅडम, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. आमची मेहनत वाया घालवू नका." सावनीचा वकील तोंडातल्या तोंडात पुटपुटला. 

"तुमच्या लक्षात येतय का? आता तुम्ही वेगळे झाला आहात. तुमचा हा मॅटर असा आपापसात सोडवायचा होता, तर कोर्टाची पायरी चढायची तसदी घ्यायची नाही मग. अहो, रोज कोणी ना कोणी वेगळं होत असतं. ते आपापल्या वाटेने पुढे निघून जातात. तुमचं काय चाललंय हे कळतच नाही आहे मला!"


"तू माझं सर्वस्व आहेस. तुझ्याविना मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे..अगदी आभाळा एवढं..त्याला कुठलीही सीमारेषा नाही निहार."

इतकं बोलून सावनीने आपल्या वकिलाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. 

"मॅम, तिकडे तुमचे आई -वडील आणि चार वर्षांची मुलगी कोपऱ्यात उभे राहून कधीची वाट पाहत आहेत तुमची." वकिलाने आणखी एक डाव टाकला.


सावनी अपेक्षेने निहारकडे पाहू लागली. तसा तो काही न बोलता आपल्या वकिलाकडे पाहू लागला.

"सर, तुम्हाला पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा आहे?" इतका वेळ शांत असलेला निहारचा वकील न राहवून म्हणाला.


"बघ, अजूनही तुला निर्णय घेता येत नाही. झालं गेलं विसरून जाऊ. नव्याने आयुष्याची सुरुवात करू. पण आपण आपला वेगळा संसार थाटू. काही अडलं तर आई -बाबा आहेतच. त्यांचं काही अडलं तर आपण आहोतच."


"सावनी, मी माझ्या आई -बाबांना सोडून कुठेही येणार नाही." निहार तितक्याच शांतपणे म्हणाला.


"नको रे असे म्हणू. एक संधी देऊ आपण एकमेकांना. जे चुकलं ते सुधारण्याचा प्रयत्न करू. तुझी लाडकी लेक 'तिच्या बाबाची 'वाट बघत आहे. तुझी सोबत हवी आहे मला. आपण एकमेकांसोबत घालवलेले क्षण पुन्हा जगायचे आहेत. सारं काही परत हवं आहे मला. मी राहू शकत नाही रे तुझ्याशिवाय."


"मॅम, इतक्या भावनिक होऊ नका. त्यांना तुमच्या फिलिंग्जची जराही कदर नाही आणि असती तर ही वेळच आली नसती." सावनीचा वकील निहारकडे रागाने पाहत म्हणाला.


"अहो, फिलिंग्ज काय घेऊन बसलात? तुमच्या मॅडम एका मुलाला आपल्या आई -वडिलांपासून दूर नेत आहेत. ते बघा." निहारचा वकील म्हणाला.


"एक्झॅक्टली. पण का नेत आहेत ते पाहा ना? आई- वडील महत्त्वाचे तसा त्यांचा संसारही महत्त्वाचा आहेच ना?"


"अरे.. बस् करा. डिवोर्स सावनीला हवा होता. मला नाही. 

पुन्हा राहायचं आहे ना एकत्र? मग आहे तिथेच राहायला ये. मी इतर कुठेही राहणार नाही. कितीही झालं तरी आई -वडील आहेत माझे ते." 


"निहार, दूर राहून नाते छान राहत असेल तर वेगळे राहायला काय हरकत आहे?" सावनी आशेने म्हणाली.


क्रमशः




🎭 Series Post

View all