ती उशिरा उठते
©️®️शिल्पा सुतार
रात्री अकरा वाजता विभा सगळं आवरून बेडरूम मधे आली. सौरभने वरदला झोपवल होत. त्याने मुव्ही शोधून ठेवला होता. तो त्याच काम करत होता. विभाला बघून त्याने काम बाजूला ठेवल.
विभाने वरदला नीट ब्लँकेट दिल. नाईटी घातला. बेल लावली.
" विभा आवरल ना, इकडे ये. हा मुव्ही बघू या का? " त्याने तिला बसायला जागा केली.
विभा खर तर टेंशन मधे होती, रात्री अस मूव्ही बघत बसल की सकाळी जाग येत नाही. उगीच घरात कटकट. " सौरभ उद्या ऑफिस नाही का? झोपा ना उशीर होतो. "
" ऑफिस आहे, तुला हा मुव्ही बघायचा होता ना. मी शोधला आहे. " तो उत्साही होता.
"नको, मी झोपते. सकाळी लवकर उठाव लागत. आई चिडचिड करतात." ती बोलत होती ते खर होत. तिच्या वर मनीषा ताईंचा खडा पहारा होता.
" आताशी अकरा वाजता आहेत. अस काय करतेस विभा. आईच काय मनावर घेतेस. " सौरभ सहज बोलला.
"वर्षानुवर्षे आपल्या कडे मी लवकर उठत नाही म्हणून मला बोलतात. वीट आला आहे. तुम्ही रात्रीच मुव्ही बघू अस ठरवत जावू नका ना सौरभ ." ती थोडी चिडली होती. एकाच झाल की एक आहेच.
" मग आपण कधी सोबत वेळ घालवायचा. मूव्ही नाही. माझ्या जवळ येण नाही. सारखी तू घाबरलेली असते. आई काही बोलली तर मी आहे ना, मग बस का?" तो तिच्या कडे बघत होता.
"हो बघितल तुमची बाजू घ्यायचा पद्धत, मुळात सासुबाई तुमच्या समोर मला काही बोलत नाही. गुपचूप आडून आडून टोमणे मारतात आणि ते मला ऐकू येत. त्यांच्या अश्या वागण्याचा खूप त्रास होतो. "
" हो ना, मग ती तर नेहमीच बोलते. दुर्लक्ष कर. तू उगीच टेंशन घेते. "
" उद्या आमचे वाद झाले ना व्हिडीओ घेवून ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल त्या कश्या वागतात. किती त्रास होतो तुम्हाला बर पडत म्हणायला की दुर्लक्ष कर. "विभा म्हणाली.
" बर आता राग सोड. आपण एक तास मूव्ही बघू . नाहीतर माझ्या जवळ ये. "त्याने दोन ऑप्शन दिले.
नको.
तो चिडला. रागाने लॅपटॉप ठेवला. तिच्याकडे पाठ करून तो झोपला.
तिला समजल." अहो चिडू नका ना." ती लॅपटॉप घेवून आली. लावा मुव्ही. ती त्याच्या जवळ बसली. तो खुश होता. तिला दुसर्या दिवशी उठायचं टेंशन होत.
रोज काय होत सासुबाई जेवण झाल्या बरोबर दहा वाजता झोपतात. इतक्या लवकर विभा झोपत नव्हती. किचन आवरण इतर कामे यात वेळ जात होता.
मनीषा ताईंची वयामानाने झोप कमी झाली होती. त्या पहाटे चार वाजे पासून जाग्या असायच्या. उगीच आपली खुडबुड, किचन मधे भांडे लाव. लाइट ऑन करण, अस करायच्या. आवाज करू नका सांगितल तर राग यायचा.
"उठा आता पाच वाजून गेले. एवढा वेळ झोपायची ही काय पद्धत आहे." त्या बडबड करायच्या. घरात अजिबात विभाला शांत राहू देत नव्हत्या. तिला जाग यायची नाही.
तरी ती सकाळी साडेपाचला उठायची.
तरी ती सकाळी साडेपाचला उठायची.
आज विभाने सौरभ साठी डबा केला. त्या सगळ्यांना खायला उपमा बनवला. वरद बालवाडीत होता त्याच्या टाईम टेबल प्रमाणे त्याला आज पराठा करून द्यायचा होता. तिने पटकन दोन बटाटे उकडत लावले. त्याचा पराठा करून झाला. तिने घड्याळात बघितल.
"अहो वरदला उठवा. आवरा ना. कितीही धावपळ आहे मागे. काय काय करावे?" ती चहा ठेवत म्हणाली.
"थोडं लवकर उठलं तर आरामात आवरत. एवढा उशीर होतो तर लवकर आवरत जा ग जरा. तुझा ना हात चालत नाही. " मनीषा ताई आत येत बोलल्या.
विभाच्या कपाळावर आठ्या पडल्या. किती वर्ष तेच बोलणार काय माहिती. दिवसभर मी कामात असते. तरी टोमणे मारतात . रोज सकाळी साडेपाचला उठते. झोपायला उशीर होतो.
आता झोपणच बंद करू का मी. रात्री बारा नंतर दुसर्या दिवशीच्या कामाला सुरुवात करते आता. किती वाजता उठलं तरी उशिराच उठते असं म्हणतात. मी ना रात्रभर जागच रहायला पाहिजे. कोणाला काही लागतं का ते बघायला हवं. नाहीतर रात्री एक वाजता दुसर्या दिवशी साठी कुकर लावते. होऊ द्या रात्रीच्या शिट्ट्या. ती चिडचिड करत होती.
"विभा काय झाल?" सौरभ किचन मधे आला.
"काय होणार आहे. आई नुसत बोलतात . अजिबात शांती नाही या घरात. माझ म्हणजे नेहमी चुकलेलं असत." ती रागाने म्हणाली.
"शांत हो. तू चहा घेतेस का जा पुढे बस मी कप आणतो."
तिने वरदला खाऊ घातल. सौरभ आणि मनिषा ताईंचा चहा नाश्ता झाला .
" विभा तू ही घे ना." सौरभ नेहमी प्रमाणे म्हणाला.
नाश्ता झाला." मी वरदला सोडायला जाते. तिकडून थोड फिरून येते." तिने सांगितल.
विभा ही सौरभ सोबत निघाली. वरदला शाळेत सोडल्यावर ती गार्डन मध्ये वॉक साठी गेली. तिथे प्रसन्न वाटत होत. तरी तिच्या मनातून मनीषा ताईंचे विचार जात नव्हते.
घरात इन मीन चार जण. त्यांचं काय एवढ विशेष आवरायचं असतं. स्वयंपाक ही लगेच होतो. सकाळी साडेसात आठ नंतर काहीच काम नसतं. एकदा वॉक झाला की दुपारी बारा नंतर फक्त पोळ्या करायच्या असतात. कधी वाटलं तर कुकर लावायचा नाही तर तो ही नाही. त्या साठी किती बोलणी खायची. कायम अस करतात त्या अजिबात शांती नाही घरात.
फिरून झाल्यावर येतांना ती भाजी घेवून आली. बंगल्याच गेट उघडून आत मध्ये आली. आत मधून कामवाल्या मावशी सुलभा आणि मनीषा ताईंचा आवाज येत होता.
"बघितलं का सुलभा किती पसारा आहे घरात. सगळं काम तुझ्यावरच अवलंबून आहे. आमच्या घरात अस आहे काय सांगू आता. भराभर आवरण नाही, काहीही नाही. रोज उशिरा उठतात. काय बोलणार यांना. तुला म्हणून सांगते आमच्या काळात माझी अशी उशिरापर्यंत झोपून रहायची हिम्मतच नव्हती. पहाटे चारला उठून पाणी भरा. दळण सगळे काम घरात होतं. हे असं जर आम्ही वागलो असतो तर केव्हाच आमची रवानगी माहेरी झाली असती. "
" बरोबर आहे आजी, बाईच्या जातील लवकर उठल पाहिजे. भराभर आवरल तर बर वाटत ." सुलभा ही बोलली.
हे काही नवीन नव्हतं विभा साठी, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांना, ओळखीच्यांना मनीषाताई सारखं हेच सांगायचे की आमची सुन उशिरा उठते. तिला काही काम जमत नाही. सगळं आरामात चालतं. सगळ्या कामाला बाई आहे.
विभा विचार करत होती. आता इथे घरी सगळ्या सोयी आहेत. तो काही माझा दोष आहे का. वरती पाण्याची टाकी आहे. घरात फिल्टर आहे. त्याला स्टोरेज टॅन्क आहे तर मी का पहाटे उठून पाणी भरेल. दळण ही गाडी वर जावुन सौरभ दळुन आणतात. भाजी इतर सामान कधी मी आणते कधी ऑनलाईन घेतो. आवश्यक आहे तेवढ्या लवकर मी उठते. आईंच काहीतरी आहे. रोज तेच तेच बोलतात. विट आला आहे. रोज तेच तेच ऐकून विभाच डोकं दुखत होतं. सौरभला तरी किती सांगणार. ते ही बिझी असतो. मला त्यांना ही वेळ द्यायला जमत नाही.
सुट्टीच्या दिवशी ती सात-साडेसातला उठायची.तरुण जोडी ती. त्यांचे आरामाचे दिवस. पण जस लग्न झाल तसं ही उशिरा उठते हे वाक्य काही मनीषा ताईंनी सोडलं नाही. घरात शांतता अशी नाही . नुसती आपली कटकट. त्यामुळे विभा सौरभ डिस्टर्ब व्हायचे.
ती आत येऊन कामाला लागली. ती आल्यामुळे कामवाली मावशी पण चपापल्या आणि त्यांनी पण काम सुरू केलं मनीषाताई त्यांच्या रूममध्ये जाऊन बसल्या.
विभाला राग आला होता. ती नंतर मनीषा ताईं सोबत बोलली नाही. दुपारी ही त्यांना एकट जेवायला दिल. तिने आत काम करत जेवण केल. ती दुपारच्या वेळी ऑनलाईन काम करत होती.
"हे असं आहे घरात कोणाशी बोलायचं नाही काही नाही. नेहमी आपली यांची मन मर्जि आणि घाई नुसती. आता ही लॅपटॉप धरून बसली आहे . काय करते काय माहिती. " मनीषा ताई बडबड करत होत्या.
"आई तुम्ही प्लीज माझ्याशी काहीच बोलू नका. तुमच्या रूम मध्ये जाऊन बसा. तुमच्या अशा बोलण्याने मला खूप त्रास होतो. मी बिझी आहे. " आज ती बोललीच. इतके दिवस ती दुर्लक्ष करत होती. तेच तेच वर्षानुवर्षे ऐकुन खूप त्रास होतो हे कसं समजत नाही या लोकांना. किती ती बडबड.
सुनेला किती त्रास द्यायचा काही लिमिट आहे की नाही. समोरचा आपल्या सोबत कंफर्टेबल राहिला पाहिजे. त्यासाठी आपण व्यवस्थित वागलं पाहिजे हे तर त्यांच्या गावीच नसतं.
वरदचा अभ्यास झाला तो ऐकत नव्हता. ती त्याला घेवून बागेत गेली. तिथे ती बर्याच वेळ बसुन होती. घरी यावस वाटत नव्हतं. घरात प्रसन्न वाटत नाही. तिची मैत्रीण सारिका आली. तिच्याशी थोड बोलावल्यावर तिला बर वाटल. "काय ग नाराज आहेस का?"
"एवढ काही खास नाही पण घरातल्या कुरबुरींचा कंटाळा आला आहे. आजकाल मी लगेच डिस्टर्ब होते."
"एक सांगू का दुर्लक्ष कर. घरचे कुठे जाणार नाहीत इथेच आहेत. मग तू तुझ ठरवायला हव. मस्त तुझ तुझ रहा ना, का त्रास करून घेते. तुला वाटत ते कर. तुला हव तस रहा."
" सासुबाई काही सुचू देत नाही. "
" तु त्यांना महत्व देते म्हणून त्या त्रास देतात. दुर्लक्ष कर. त्या काही बोलल्या की मनाला लावून घेवू नकोस. बघ गोष्टी सोप्या होतील. "
"हो बरोबर आहे . सौरभ ही तेच म्हणत होते. " ती विचार करत होती. सासुबाईं कडे दुर्लक्ष करून बघू.
आज ती मस्त आरामात घरी आली.
" किती वाजले? दिवा बत्ती नाही. काही नाही. हीच ना आटपत नाही." मनीषा ताई बडबड करत होत्या.
तिने लक्ष दिल नाही. आटपत नाही म्हणता ना. आता आरामात करू या. आधी तिने वरद साठी मुगाची खिचडी केली. तो पर्यंत मनीषा ताई दोनदा किचन मधे येवून गेल्या. काय सुरू आहे ते बघत होत्या. त्या नंतर तिने भाजी पोळी केली.
"रोज काय याला वेगळा पदार्थ करते? आहे ते खायला पाहिजे मुलांनी." त्या म्हणाल्या.
"त्याला वरण भात. मुगाची खिचडी लागते. काही विशेष आहे का. करते ना मी. तुम्हाला थोडी सांगते आहे. " विभा तीच तीच काम करत होती.
"आम्हाला काही मुल नव्हते का? आम्ही नाही केल असे नखरे ." त्या परत म्हणाल्या.
" चांगल झाल. तुम्ही नाहीतरी काहीच करत नाही कोणासाठी. मुलांच मन जपण. चांगल वागण कुठे जमल आहे तुम्हाला. उगीच जास्त बोलू नका. बाहेर जावुन बसा ." तिने ही आज टोमणा मारला. किती ऐकुन घेणार.
आज जेवताना विभा शांत होती. सौरभच्या ते लक्ष्यात आल होत." काय बिनसल आज?" त्याने विचारल.
" काही नाही."
" मोकळ बोल. "
" काही सांगण्यासारख नाही. आणि सहन ही होत नाही. काय करणार. उठता बसता कोणी बोलत असेल तर काय करणार. बोलणार्याला समजत नाही की आपण दुसर्याला त्रास देतो आहे. की हे मुद्दाम सुरू आहे? पण मला शांती हवी आहे. "ती बोलली.
सौरभला समजल नक्की ही आई बद्दल बोलते आहे. हिला त्रास होतो आहे. करणार काय. विभा परफेक्ट आहे. हीच काम व्यवस्थित आहे. वरदकडे छान बघते. त्याचा अभ्यास घेते. स्वतःच काम छान करते. मग आईला तिचे गुण दिसत नाही का? की एखाद्याला नापसंत करायच ठरवल तर काही करा ती व्यक्ति आवडत नाही अस असेल. चुकीच आहे हे. सौरभ विचार करत होता
रात्री जेवण झालं. सौरभ आत काम करत होता. विभा आवरून आली. "चला आज मुव्ही बघू."
तो आश्चर्याने बघत होता. " चालेल तुला? उद्या लवकर उठायच नाही का?"
"आता या पुढे आपल्याला दोघांना आवडत तस राहू. मी आरामात आवरणार आहे. काहीही केल तरी कोणाला समाधान नाही .त्या पेक्षा मीच शांत आणि छान राहणार आहे. "
"तु हे छान केल." दोघांनी मस्त सोबत वेळ घालवला.
सकाळी पाच वाजले ,साडे पाच झाले, सहा वाजले, विभा उठत का नाही. मनीषा ताई बघत होत्या. त्या दोन तीनदा किचन मधे येवून गेल्या. तिला आवाज दिला.
ती आरामात साडे सहाला उठली. अस ही स्वयंपाक करायला तिला विशेष वेळ लागत नव्हता. सगळ वेळेत आवरल. चहा नाश्ता रेडी होता. ती वरदला खाऊ घालत होती.
"वाह विभा छान झाली इडली चटणी." सौरभ नाश्ता करत बोलला. त्याचा डबा तयार होता.
"आई मी निघतो आहे." त्याने आवाज दिला.
मनीषा ताईंना त्याच्या हातात डबा दिसला नाही. "तुला लवकर उठायला काय होत ग विभा? आता सौरभ काय खाईल. थांब मी करू का काहीतरी."
"आई जरा शांततेत घे." त्याने डबा दाखवला.
"झाला पण का स्वयंपाक. " त्या गप्प बसल्या.
"हो आणि माझी आवडती भाजी आहे. भेंडीची." सौरभने विभा कडे बघितल. ती पण खुश होती.
विभा वरदला घेवून निघाली त्याला शाळेत सोडून थोड बागेत फिरून घरी आली.
नेहमी प्रमाणे मनीषा ताई सुलभाला आज काय काय झालं ते सांगत होत्या. " आज विभा अगदी सात वाजता उठली. कसतरी आवरल आणि गेली त्याला शाळेत घेवून. काही काम जमत नाही. मी तर काही बोलत नाही. काहीही करा. ना नवर्याच आवरायच. ना मुला कडे लक्ष."
" बापरे आजी तुम्ही थोड सांगायला हव ना. " सुलभा बोलली.
" आजकालच्या मुली कुठे ऐकता ग. त्यांच्या मनाच करतात. " मनीषा ताई बोलल्या.
विभा हसत आत आली. आता काहीही करा. काहीही बोला. मी शक्य होईल तो पर्यंत दुर्लक्ष करणार आहे. ती तिच्या कामाला लागली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा