ती त्याच्याशिवाय राहू शकते...भाग 3 अंतिम

Ladha tichya matrutwacha
ती त्याच्याशिवाय राहू शकते...भाग 3 अंतिम

हे ऐकून  राधिकाने आनंदीला जवळ घेतलं, तिला छातीशी कवटाळलं. आनंदीच्या तोंडून निघालेला आई  हा शब्द राधिकाच्या कानात गुंजत होता. ती ढसाढसा रडायला लागली, वर्षभर डोळ्यात साठवलेले अश्रू,आणि मनात दडवलेलं दुःख सगळं बाहेर आलं.

राधिकाने ठरवलं आपण या नैराश्यातून बाहेर पडायचं, जगायचं आपल्यासाठी नाही तर आनंदी साठी.
तिच्यासाठी मला जगायलाच हवं हे राधिकाने मनाशी ठरवलं. यासाठी खूप प्रयत्न केला. रोज मेडिटेशन करायची, योगा करायची, थोडावेळ बागेत फिरायला जायची, लोकांशी संपर्क वाढवला, आजूबाजूच्या मैत्रिणीशी, सगळ्यांची संपर्क साधला.

तिने वर्षे वर काहीच केले नाही आनंदीसाठी, आता तिला खूप काय करायचं होतं, राधिकाला खूप अपराधी वाटत होतं की आपण आपल्या मुलीचा एक वर्ष पर्यंत काहीच केलं नाही. आता तिने मनात ठरवलं आपण काहीतरी करायचं आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं, तिने नोकरी शोधायला सुरुवात केली, शिक्षित असल्यामुळे तिला शाळेत नोकरी  मिळाली.

आई बाबांना खूप बरं वाटलं, दिवस सरकत गेले, आनंदी मोठी व्हायला लागली.


आई वडिलांनी तिला सांगितलं की त्याच्यावर फसवणुकीची केस कर, तुला मुलींसाठी हक्क मागायला हवा.

पण राधिकाने सगळ्या गोष्टींना नकार दिला.
तिला त्याच्याशी काहीही संबंध ठेवायचा नव्हता, त्याच्याशी संपर्क करायचा नव्हता.

"मी त्याच्या शिवाय राहू शकते, अश्या माणसासोबत मला काहीही संबंध नकोय."


मुलीच सगळं करून शाळेत जायची, आई-बाबांची काळजी घ्यायची. आई बाबांचं वय झाल्यामुळे त्यांना जास्त काम व्हायचे नाही. राधिका घरची सर्व कामे करून शाळेत जायची. तिच्यात पॉझिटिव्हिटी यायला लागली ,शाळेत लहान लहान मुलांसोबत राहून तिला बरं वाटायचं.असेच दिवस सरत गेले मुलगी मोठी झाली, राधिका तिचे सगळे हट्ट पुरवायची, कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. कधी तिला बाबांच्या आठवणी होऊ दिली नाही, राधिकाने मनाशी निश्चय केला होता की  आपल्या मुलीला खूप शिकवायचं, खूप मोठं करायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं.

आनंदी आज तेरा वर्षाची झाली.
आजी ,आजोबा, आनंदी आणि राधिका अस चौकोनी कुटुंब आहे.
सगळे आनंदात  आहेत, कमी पैशात का होईना पण सुखी जीवन जगत आहेत.
राधिकाने नैराश्यावर मात केली.

तिच्यातल्या आईपणामूळे,

तिच्या गर्भात वाढलेल्या त्या चिमुकली मूळे.

समाप्त:
 
 

🎭 Series Post

View all