ती त्याच्याशिवाय राहू शकते...भाग 1

Eka Stri chi kahani
ती त्याच्याशिवाय राहू शकते...भाग 1

राधिकाचं पहिलं पाऊल निशांतच्या घरात पडलं, गृहप्रवेश झाला.

राधिका आणि निशांतचं लव मॅरेज होतं, त्यामुळे दोघेही खूष खुश होते आणि पाहुणेमंडळी सुद्धा आनंदात होते.
गृहप्रवेश झाला, बाकीच्या सगळ्या विधी झाल्या आणि पावणे आपापल्या घरी निघून गेले.

रात्र झाली,

"मधुचंद्राची रात्र" दोघेही एकमेकांमध्ये वाहून गेले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या घरातला राधिकाचा पहिला दिवस आहे म्हणून तिला कामाला सुट्टी मिळाली.

नव्याचे नऊ दिवस संपले आणि आता राधिका कामाला लागली. घरातली कामे, बाहेरची कामे सगळे राधिका करायची.

राधिका आल्यामुळे  निशांतची आई  कोणत्या कामाला हात लावत नसे,कुठलेही काम करत नसे. सगळे काम राधिकालाच करावी लागायची.राधिका हसत-हसत सगळं करायची.

निशांतचा डब्बा ,आई-बाबांचे जेवण, औषध-पाणी, कुणाला काय हवं-नको ते सगळं बघायची.

असेच सहा महिने निघून गेले.
एक दिवस  राधिकाला मळमळ व्हायला लागली, उलट्या झाल्या, पाळी चुकली हे माहिती होतंच, तिने एकदा डॉक्टर कडून चेक केले.

तिला आनंदाची बातमी मिळाली,
तिने लगेच निशांतला सांगितलं, त्याला खूप आनंद झाला. दोघेही आनंदात होते. घरी आनंदाची बातमी सांगितली.

घरात बाळ येणार म्हणून सर्व खूप खूश होते. सर्व तिची काळजी घ्यायला लागले.

भरभर नऊ महिने निघून गेले आणि राधिकाला मुलगी झाली.

क्रमशः

🎭 Series Post

View all