Login

ती त्याच्याशिवाय राहू शकते...भाग 2

Hatabal Stri Ladhli tichy mulisathi
ती त्याच्याशिवाय राहू शकते...भाग 2

इथपर्यंत सर्व ठीक होतं पण नंतर हळूहळू राधिकाच्या कानावर काही गोष्टी यायला लागल्या की हे निशांतचे हे दुसरे लग्न आहे म्हणजे राधिका ही निशांतची दुसरी बायको आहे. पहिली बायको आणि दोन मुलं दुसरीकडे राहतात, दुसऱ्या शहरात राहतात.

राधिकाने निशांतला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने उत्तर दिले नाही, तो टाळाटाळ करायचा, अखेर एक  दिवस त्याने सगळं सांगितलं.


त्याची पहिली बायको आणि दोन मुले दुसऱ्या शहरात राहतात असं सांगितलं.

राधिका सोबत त्यांनी दुसरे लग्न का केलं याचं कारण मात्र त्यांनी सांगितले नव्हते. राधिकाने खूप प्रयत्न केला जाणून घेण्याचा, पण त्यानी काहीच सांगितले नव्हते.


सासू-सासर्‍यांना विचारलं तेही काहीच बोलले नव्हते, सगळ्या प्रयत्नाला अपयश आल.

शेवटी कंटाळून ती घराच्या बाहेर निघाली पण एवढ्याशा बाळाला घेऊन कुठे जाणार होती बिचारी ,सासर नंतर तिला फक्त एक घरच होतं ते म्हणजे माहेर, मुलीला घेऊन माहेरी आली.

ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती, एक तर तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते आणि निशांतने असं का केलं  हे कळत नव्हते. कितीतरी महिने राधिका कोणाशी बोलत नव्हती.

एकटीच बसून राहायची, ढसाढसा रडायची.
क्षणात रडायची, क्षणात हसायची, भान राहायचं नाही कधी कधी.


"ये बाळा, राधिका, सावर ग स्वतःला, किती दिवस अशी पडून राहणार आहेस" राधिकाची आई म्हणाली.

"आई, काय चूक केली होती ग मी, प्रेमचं तर केलं होतं ना,   प्रेम करण चुकीचं असत का ग?"


"नाही बाळा, प्रेम करण चुकीचं नाही आहे, पण ते कोणत्या व्यक्तीवर करतो यावर अवलंबून आहे. प्रेम कधीच चुकीचं नसत बाळा, प्रेम या शब्दात सगळं जग सामावलं आहे.

"प्रेम" - माणसाला घडवतं आणि बिघडवतं सुदधा.
आई पुुटपुटली.

राधिका आपल्याच विचारात गढलेली असायची.

ती आनंदीच ( राधिकाची मुलगी) काहीच करत नव्हती. आनंदी नावं आजींने ठेवलेलं होतं, आजीच तिचं सगळं करायची.

आनंदी एक एक पाऊल टाकायला लागली, एक दिवस राधिका तिच्या रूम मध्ये चेहरा पाडून बसली होती. तिथे आनंदी आली, राधिकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि  "आई" आनंदीच्या तोंडातून आई  शब्द निघाला.