Feb 24, 2024
नारीवादी

ती संयमी #चंद्रघंटा

Read Later
ती संयमी #चंद्रघंटा
"आई तू जरा जास्तच करतेस. काय गरज होती इतकी मोठे मन दाखवायची तुला ? बाबा स्वतः नकार देत होता तरी तू स्वतःहून आणखी कामं ओढवून घेतात आहेस.त्यासाठी चक्क बाबाशी वैर पत्करले पण..." ती रागातच आईला बोलली. न राहवून तिची आई बोलली, "अगं ती तुझी आजी आहे. कितीही काही केले तरी तुझ्या बाबाची आई आहे. आपण तिची काळजी घेणं आवश्यक आहे. तुझे काका काकू तर तिच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. आता तिला आपण सोडून कोणीच नाही.तुला असे वाटत असेल की आजीचं काम मी तुझ्याकडून करून घेईल तर काहजी करू नकोस ते मी बघून घेईल."
"पण आई मला आठवतंय, जेव्हा काकू तुला काही बोलायची तेव्हा आजी पण तुलाच दोष द्यायची. ऐन पावसाळ्यात मी आजारी पडले होते आणि त्यांनी आपल्याला घराबाहेर काढले. बाबाचा जाॅब सुटलेला, मी लहान, सगळं काही तू एकटीनेच केले. जिचे बाहेरचे सारी तारेवरची कसरतच जणू...आता काकूला ती नकोशी झाली आहे तर आपल्याकडे पाठवलं." ती रागातच आईला बोलली. "पण बाळा आपण जर तुझ्या काकूसारखं वागलो तर तिच्यात आणि आपल्यात काय फरक उरणार ? आता जे झाले ते झाले, या विषयावर पुन्हा चर्चा नकोय ह्या घरात..! चल तुझा बाबा येत असेल तू जरा चहाचं बघ. तोवर मी आईंच्या पायाला मालिश करते."

तिला क्षणभर आईचे अप्रूप वाटले. तिने एकवार आईकडे पुन्हा वळून पाहिले आणि बोलली, "आई आजीला मसाज मी करते. तू बाबासाठी चहा बनव." आणि ती आजीच्या खोलीत निघून गेली.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//