Jan 26, 2022
नारीवादी

ती नेहमी जगण्यासाठी बहाणे शोधायची ...

Read Later
ती नेहमी जगण्यासाठी बहाणे शोधायची ...
ती नेहमी जगण्यासाठी बहाणे शोधायची
कधी स्वप्नाच्या आधारे तर
कधी कल्पनेत जगायची
कारण ती उंबरठ्या आत राहायची

असली जरी गर्दीत तरी सर्वांपासून 
अलिप्त राहायची
कधी स्वतःच्या मनाशीच झुंझायची
ती नेहमी जगण्यासाठी बहाणे शोधायची

स्वतःच्या विश्वात रमायची
फुलांशी मैत्री करायची
वाऱ्या बरोबर खेळायची
एकटेपणा लाच स्वतःच्या सोबती मानायची
ती नेहमी जगण्यासाठी बहाणे शोधायची

कधी कधी स्वतःशीच हसायची
तर कधी आपल्याच आयुष्याला कोसायची
ती नेहमी जगण्यासाठी बहाणे शोधायची
कारण ती उंबरठ्या आत राहायची....


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now