Mar 02, 2024
सामाजिक

ती नवऱ्याने टाकलेली. भाग -३(अंतिम भाग )

Read Later
ती नवऱ्याने टाकलेली. भाग -३(अंतिम भाग )
ती.. नवऱ्याने टाकलेली!

भाग-तीन.

"मी शिकवायला तयार असताना तो शिकला नाही आता मीच त्याला बोलले, 'बाबा रे, तुझं तू बघ. भीक माग, कोणते काम कर पण स्वतःचा खर्च स्वतः उचल. तुझे शौक पूर्ण करणे आता मला जमणार नाही.'

त्या बायका डोळे विस्फारून दामिनीकडे बघत होत्या.

"तुम्हाला सांगू? आता मी खरेच आनंदी आहे. नवऱ्याचे आणि मुलाचे काही टेन्शन नाही. ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत नी मी माझ्या. मी नोकरी करून पैसे कमावते. तारुण्यात स्वतःला वेळ देऊ शकले नाही. आता स्वतःचेच मस्त लाड पुरवते. नीटनेटकी राहते. नटते. पण मग तुमच्यासारख्या बायका भेटल्या की जरा दुखावल्यासारखी होते. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजू शकत नाही तेव्हा त्या स्त्रीची मला कणव येते जशी आत्ता तुमची येत आहे. केव्हा बदलेल बायकांचा हा स्वभाव?" दामिनी.

"ताई खरंच आम्हाला माफ करा. ह्यापुढे आम्ही अशी चूक करणार नाही."
चौघीनी तिच्यासमोर माना खाली घालून हात जोडले. तशी ती उठून उभी झाली.


"तुमच्या बोलण्याने मला कसलाच त्रास झाला नाही. कारण हे असले टक्केटोणपे झेलण्यासाठी कणखर आहे मी शिवाय त्याचे उत्तरही देऊ शकते. पण माझ्या सारखा नवऱ्याशिवाय असणाऱ्या एखादीला असे बोलण्याने काय त्रास होऊ शकतो याची जाणीव करून द्यायची होती.

आज इथे तुमच्या पुढ्यात मी होते, उद्या माझ्या ठिकाणी दुसरीचं मृदू कोमल हृदय असलेली स्त्री असेल तर ती हे सहन करू शकणार नाही. एखादी तर आत्महत्यासारखे पाऊल देखील उचलू शकेल तेव्हा कोणाकोणाची माफी मागाल तुम्ही?"

"ताई ह्यानंतर अशी चूक नाही होणार. आम्ही तुम्हाला वचन देतो." मघाशी गुरगुरणाऱ्या वाघाचे आता शेळीत रूपांतर झाले होते.

दामिनी हसत उठली. " स्त्री ही वाईट नसतेच मुळी. इकडच्या गोष्टी तिकडे सांगण्याचे निसर्गदत्त वरदान लाभलेय तिला. तेव्हा वाईट गोष्टीपेक्षा चांगल्या गोष्टी पसरवायला शिका. एक घटस्फोटीत असूनसुद्धा माझ्यासारखी स्त्री स्वाभिमानाने कशी जगतेय ह्या पॉझिटिव्ह गोष्टीचा प्रचार करा." त्यांना हसत ती म्हणाली.

तिच्या बोलण्यावर त्या बायकादेखील मनमुराद हसल्या. त्यांच्या मनात तिच्याबद्दल कसलीच असुया उरली नव्हती.
दामिनी जायला निघाली. थोडी पुढे जाऊन पुन्हा माघारी त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली.

"पुढच्या महिन्यात ऑफिस स्टाफच्या गर्ल्सगँग बरोबर गोव्याला जाणार आहे. यापूर्वी कधी असा विचारदेखील केला नव्हता."
त्यांना ती सांगत होती.

"ताई, खूप खूप एन्जॉय करा. ऑल द बेस्ट!" चौघी एकासुरात म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक निर्मळ हसू पसरले होते.

**समाप्त**
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा.)

घटस्फोटीत स्त्री म्हटले तर पुष्कळदा तिच्याकडे आपण एका विशिष्ट चष्म्यातून बघत असतो. बरेचदा असे वागणारी एक स्त्रीच असते हे सुद्धा इथे नमूद करावेसे वाटते. पण अशा स्त्रिया सुद्धा आपल्याच समाजाचा एक घटक आहे. त्यांनाही त्यांचे आयुष्य त्यांच्यापरीने जगण्याचा अधिकार आहे या चष्म्यातून आपण त्यांच्याकडे पाहिले तर? तुम्हाला काय वाटते ते सांगा. आणि ही कथा कशी वाटली नक्की कळवा.


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//