ती मी नव्हे

Ti Mi Nvhe


श्वेताचे आज काही खरे नाही ,आज तर तिला पहिल्यांदा पाहुणे बघायला येणार म्हणून इतक्या मोठ्या आपल्या कंपनी  एच आर ची पुरती धांदल उडणार आहे.... जी रोज आपली धांदल उडवत असते आज ती पिसली जाणार आहे...रूपा मध्येच गमतीत बोलून गेली ...

अनुश्री मग आपल्या आयुष्यातील तिला बघायला आलेल्या स्थळा बद्दल सांगत होती हा अनुभव मी तर ज्या दिवशी घेतला अगदी त्याच दिवशी ठरवले की इथून पुढे मी एका ही मुलाला घरी येऊ न देता direct हॉटेल मध्ये भेटू आणि बोलू ,जमले तर ट्रीट चा खर्च मी भरेन तुला वाटेल ते हदड ,मला प्रश्न विचार पण घरी हा पाहुणे बघायचा पिढी जात प्रोग्राम अजिबात म्हणजे अजिबातच मी खपून घेणार नाही..नाहीतर मी single मरेन पण हे उगाच चे संस्कार मला आवडणार नाही... पटले तर हो म्हण नाही तर मला त्याने आगाऊ म्हणून दे मला काही एक फरक पडणार नाही... i m ok with your नकार...

पण मुलगा आणि त्याच्या घरचे घरी येणार म्हणून बाबा 10 दिवस आधीच आवरा आवर करणार,त्यांना काय हवं नको ते जातीने बघणार, खाण्याची आवड काय, त्याला तुम्ही कधी येणार हे विचारणार, मग ते सांगणार बघू आम्हाला वेळ मिळाल्यावर.. मग वेळ मिळाला तर ते भाव खाणार जसे तेच आपल्यावर आपल्याशी लग्न करून उपकार करत असल्यासारखे वागणार...

त्यात मुलगा तर बाजूला रहातो पण त्याचा बाप मध्येच मुलाचा बाप असल्याने किंमत मारून जातो...त्याची आई तर त्याहून अधिक वेगळी...बहीण तर अजूनच मी काही तरी मोठी...भाऊ तर जणू त्याचे personal assitant सारखा वागतो... त्याला हे आवडत नाही..त्याला ते आवडत नाही ,तो हे खपवून घेत नाही... मुलीने असे करावे ही त्याची इच्छा आहे.... ती साधी सरळ,नाकासमोर बघून चालणारी असावी....

मग येते आमचे खानदान.. तुमचे खानदान... जरा उंची कमी,जरा उंची जास्त.. तिला असेच रहावे लागेल...तिला तसेच करावे लागेल... आम्ही non veg खात नाही..तिला सोडावे लागेल....पैसे जितका हा त्याच्या स्वप्नातील घरासाठी कमवतो तितका तिने कमवायला हवा.. त्याच्या स्वप्नाला हिने तिच्या कमाईतून हातभार लावायला हवा... तो चिडत असतो त्याला हिने समजून घ्यावे.... इतकी मोठी यादी माझ्या समोर मंडळी होती त्यांनी...मी तर त्यांच्या समोर बसून 4 glass पाणी पिले आणि ते गेल्या नंतर मी जेवलेच नाही...

मग काही दिवसांनी माझी अवस्था पाहून बाबांनी पुन्हा त्या मुलाला आणि त्याच्या घरच्यांना काय झाले,पुढे काय हे मुद्दामच नाही विचारले...त्यांची फोन केला पण माझा नकार आहे कारण मला माझे आयुष्य माझ्या मर्जीने जगण्याचे विचार स्वातंत्र्य माझ्या बाबांनी दिले आहे..त्यामुळे मी तुझे स्वप्न रंगवण्या ऐवजी मी माझे स्वप्न या हुन जास्त चांगल्या प्रकारे रंगवेन, गुलामी साठी मी शिक्षण घेतले नाही ते मी माझ्या स्वातंत्र्याचा फायदा कोणाला घेऊ देण्यासाठी ही घेतले नाही...मी ती मुलगी नाही जी तुला हवी आहे सो तू मुक्त आहेस... आणि माझा तुला पूर्णपणे नकार आहे....

मग ठरवले की मुलगा फक्त एकटाच येईल मला बघेल,बोलेल,त्याचे विचार सांगेल,खाऊन जाईल as जसे माझ्या घरी येऊन कांदे पोहे खाऊन जातो तसे.. ते ही माझ्या पैस्याने... हो पण not more than कांदे पोहे....माझे खास कांदे पोह्यासाठी हॉटेल पक्के आहे..की जिथे फक्त पोह्या व्यतिरिक्त अजून काही ऑर्डर करता येणार नाही....

अंजली म्हणाली अग हे मुल खूप ऐधी असतात,की ते वडिलांच्या जीवावर ही ऐधी पणा करतात आणि मग नंतर सासरा ही असा बघतात जो ह्यांचे स्वप्न पूर्ण करेल..आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या मुलीवर तरी अर्धे स्वप्न बघतात... ती नौकरी करणारी असेल तर हे करता येईल,घर,गाडी,आणि बरेच स्वप्न तिच्या पगारावर साकरता येतील ह्या मनस्थिती असतात... पण इतके असून ही रुबाब यांचाच..यांच्या मागण्या मान्य करा,वडिलांनी मग आपले असलेले नसलेले सगळे अकाउंट रिकामे करून आपल्या वाटायचे सुख ह्या ऐधी मुलांना द्या आणि स्वतः मात्र रीकामे व्हा....

एकदा लग्न झाल्यानंतर बाबा आजारी पडले होते,दादा हॉस्पिटलमध्ये यायला उशीर झाला होता ,आणि डॉक्टर ने बिल भरायला सांगितले तर हा जावई माझ्या भावाची वाट बघत बसला होता,की तो येईल आणि बिल भरेल..मग हा तेव्हा कुठे होता जेव्हा त्याने हुंडा मागितला होता माझ्या वडिलांकडून...तेव्हा मोठ्या थाटात म्हणाला होता की तुझे बाबा आणि माझे बाबा काय वेगळे नाहीत.. मी ही दादा सारखा आहे त्यांच्यासाठी मग थोडे पैसे मला दिले माझ्या घरासाठी ,आणि नौकरीसाठी तर बिघडले कुठे.. मग आता तुझ्याकडे पैसे नाहीत की आता हे तुझे बाबा मानत नाहीस...

  तेव्हा पासून ठरवले बाबांची पै ना पै चुकवायची..आणि त्यांना ही ती चुकवण्यास भाग पडली...किमान 4 वर्ष माझा पगार मी माहेरी देण्याचा निर्णय घेतला होता..

सगळ्यांना अंजलीचा निर्णय खूप चांगला वाटला आणि अनुश्री ने जी नवी वाट फोडून दिली होती ह्या पॊह्याचा कार्यक्रमाला ती ही एकदम झकास वाटली होती,सगळ्यांनी खूप तारीफ केली होती दोघींची ही...

अंजली आणि अनुश्री आता आपली HR मैत्रीण श्वेताच्या घरी तिला तयार करायला आल्या होत्या,तिला तिकडच्या लोकांनी ,म्हणजे मुलाकडचे मंडळींनी खास साडी नेसायला सांगितली होती...

सगळा मराठमोळा साज घाल म्हणाल्या होत्या तिच्या काकूबाई.. आपल्या घराची रीत आहे म्हणून तू ही ती रीत पाळ, उगाच तुझा तो शहरी फॉरवर्ड पणा नको बाई निदान आज तरी दाखवू....


तिकडून बाबांनी तिला पूर्ण तयार झालेली पाहिले आणि आपल्या मोठ्या झालेल्या लेकीकडे ते बघतच राहिले... पण म्हणाले रानु तू तर ड्रेस मध्ये खूप सुंदर दिसते... आणि बिना make up ची तर तू अजूनच छान दिसतेस... तो बनाव दिसत नाही जो तू make up लावून केला आहेस... साडी तर ठीक आहे पण त्यांना आपण जसे आहोत तशीच पसंत पडावीस... म्हणून तू ड्रेसच घाल....

मग श्वेताला तर बाबांची साथच हवी होती ह्या बाबतीत,तिने लगेच छान भारदस्त पंजाबी ड्रेस चढवला आणि तो make up चा थर उतरवला.. आणि आता जरा कुठे ती त्या नसत्या बंधनातून मोकळी झाल्यासारखी वाटत होती आणि वागत ही होती... नाहीतर बांधल्या सारखे वाटत होते..

आता श्वेता ,ती मुळात जशी आहे तशीच पाहुण्यांसमोर जाणार होती,जे जसे आहे तसे असावे आणि मी तशीच वागणार ही आहे आणि स्वतःला तशीच represent करणार आहे. ..


आई आणि काकू तिच्याकडे रागात बघतच होत्या,अग बाळा तू साडीतच छान दिसत होती,तुझा सावळा colour त्यात सामावून जात होता,आणि जरा तरी गोरी दिसत होती त्या साडीच्या colour मुळे आणि त्या make up मुळे, काय तुला पण सुचते ग..तुझे बाबा एकपट आणि तू दुप्पट असे चालू आहे...आमचं मेलं कोण मनावर घेते...जे राजा बोलले तसे प्रजा करेल...

काकु लगेच...आहो इथे प्रजा नाही फक्त बाप आणि लेक हीच काय ती आळी मिळी हो.... आपण म्हणालो ,श्वेता तू हे घाल तर सतरदा दा विचार करत असतेस आणि बाबा एकदा काय म्हणाले तर लगेच बाबांचे ऐकतेस.... हे असे लग्न झाल्यावर नाही हा येणार तुझे बाबा तुला सांगायला की हे कर आणि ते करू नकोस... तिथे तुला ते म्हणतील तसे रहावे लागणार. ...त्यांना म्हणजे तुझ्या नवऱ्याला जे तुझसाठी खास आवडेल तेच तुला घालावे लागणार आहे...म्हणून आत्ता पासून सुरू कर..

पाहुणे येता,सगळी धांदल उडते,आवरा आवर,पसारा आई आणि काकू आवरून घेत असतात, मैत्रिणी आणि श्वेता आत जातात,

इकडे पाहुण्याचस फोन येतो की ,आम्ही तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आलो आहोत,आता तुम्हीच आम्हाला घ्यायला या, आम्ही वाटत बघत उभे आहोत किती वेळ ...जरा लवकर या

बाबा फोन ठेवताच लगेच अति घाईने त्यांना आणायला जातात, त्यांची उशीर झाला मला यायला म्हणून दिलगिरी व्यक्त करतात,मला आधी सांगितले असते तर मी तुमच्या आधीच येऊन थांबलो असतो,तुम्हाला उगाच त्रास नसता झाला वाट बघण्याचा... ही इथेच आहे आपली बिल्डिंग ,चला मी पुढे होतो...

ते सगळे society च्या जवळ येतात... गाडी मधून सगळे उतरतात...सासुबाई गॉगल काढते..उंच त्या tower कडे बघते.. आणि नवल करते.. एक मुश्किल हसत...
"भारी सोसायटीत मध्ये आहे हो घर तुमचे... घर ही मोठे असेल ,हो आम्हाला ही अश्याच सोसायटी घर बघावे म्हणते मी ,तुम्हाला कुठे असे घर दिसले तर आम्हाला ही बघा,करा सोय "

सासर ही म्हणाला,अग मुलीचे वडीलच ते,त्यांना सांगायची गरज कसली,ते मुलींसाठी इतके तर करतीलच ना

बाबा वरती चढत होते,आणि त्यांना टेन्शन आले होते... लग्नात खर्च करुच पण हे तर भलतेच महाग स्थळ असणार... बघू जर जमलेच तर करू काही, असे मनात म्हणत ते दारा जवळ आले होते.... काकूने दार उघडले....

काकू,श्वेताच्या ह्या पाहुणे बघण्याचा सोहळ्यासाठी खास आली होती.... तिला सोबत म्हणून बोलावले होते... पण ती ही वरचड होती

तिने दार उघडताच सगळ्यांचे स्वागत केले, बाबांनी त्यांना विराजमान व्हायला सांगितले... आईने पाणी आणून सगळ्यांना दिले... मग चहा नाशता झाला... पोहे नियम म्हणून श्वेताला घेऊन बाहेर बोलावले...

ती बाहेर येताच,सगळे बघतच राहिले... हलका make up.... ड्रेस घातलेला... बिन डर सगळ्या समोर येऊन बसली...पोहे देत होती... दिसण्यात आणि बोलण्यात घाबराहट होती पण तिने ती confidently वेळ मारून नेली...तिचा हा कणखर बाणा तिला स्मार्ट म्हणून संबोधायला भाग पाडत होता...

आता एका मागून एक प्रश्न सुरू कोण करणार ह्याची ती वाट बघत होती... मग सगळ्यात आधी बाजी मारली ती सासूबाईने...
मग तू इतकी शिकलेली आहेस तर जेवण करता येते की स्वयंपाक वाली ठेवावी लागणार... म्हणजे तसे काही आमच्या घरी अजिबात नाही हं चालणार... बायकांनी आपल्या नवऱ्याला आपल्या हातानी करून घालण्याची पद्धत आहे.. मग म्हणूनच पोट भरत असते, तृप्तीचे ढेकर देतात..

श्वेताला आधी हसू आले..सासुबाईच्या तृप्तीच्या ढेकर ह्या बोलण्यावर.. तिने दाबून ठेवले..

श्वेता लगेच, हो येतो ना स्वयंपाक, सगळा मीच तर करते... तिथे ही मीच करेन..

सासरे बुवा...तुला पगार किती आहे,कारण आम्ही सगळे पगार महिन्याच्या शेवटी घरातील तिजोरीत जमा करत असतो,ज्याला जसे लागतील तसे खर्चायला त्याने आमच्याकडे मागायचे मग आम्ही त्याला देतो,तू ही तसे करावे... म्हणजे घरात आनंदाचे आणि एकीच वातावरण नांदते.. हे जमेल ना तुला..

श्वेता त्यांच्या कडे बघतच होती,मनात वाटत होते आता हे खूप झाले,ते बोलत आहेत आणि मी ऐकून कशी घेते..

मुलाचे वडील परत म्हणाले,


मला तर काय करायचे तुमच्या पैस्याचे... मी कुठे वरती घेऊन जाणार आहे तरी.. पण साठवलेला पैसा सगळ्यांच्या कामी येतोच ना..तुमचा तुम्हाला तुम्ही मागितल्यावर मी देतच रहाणार ना..

श्वेताच्या मैत्रिणी,आई,बाबा,काकू त्यांचे हे विचार ऐकत होते.... काकूंचे तर तोंड बघण्यासारखे झाले होते... किती हावरट आहे हा म्हतारा...

श्वेताच्या patience चेक करायची आता वेळ मुलाची होती....

तो म्हणाला,बाबा माझे काही स्वप्न आहेत, माझे आईबाबा यांना एका छानस्या मस्त,मोठ्या फ्लॅट चे खूप आधी पासून स्वप्न आहे,त्याने सगळ्या घरभर नजर फिरवली,आणि लगेच परत म्हणाला जवळपास हे असेच घर असावे असे माझ्या अशी बाबांचे आणि माझे स्वप्न आहे.... एकतर हे स्वप्न श्वेताच्या पगारातून पूर्ण व्हावे किंवा एक तर ते तुम्ही मला स्वतः द्यावे...

आता सगळ्यांनाच त्यांचा राग आला होता... आणि श्वेताचा ही पारा चढला होता... ती तड कन उठली,ओढणी कमरेला बांधली आणि,सगळे खाण्याचे पदार्थ आत घेऊन गेली,त्यांनी ते खाल्ले ही नाही तरी ती घेऊन स्वयंपाक घरात ठेऊन बाहेर  आली....एक एकाला उठवले... आणि त्यांना खूप ऐकवले....

आणि अंजलीला म्हणाली, अंजू तू काय म्हणत होतीस,ऐधी मुलगा जो बापाच्या जीवावर मोठा होतो,मग सासर्यांच्या जीवावर मोठा व्हायचे स्वप्न बघतो,मग ते नाही झाले की बायकोच्या जीवावर मोठे होण्याचे स्वप्न बघतो...बरोबर हा ही तसाच ऐधी मुलगा आहे... ह्याच्या मनगटात बळ नाही म्हणून,तो आधी बापाच्या जीवावर मोठा झाला असेल,मग बायकोच्या,मग तिच्या वडिलांच्या जीवावर मोठा होण्याचे स्वप्न बाळगून इथे पोहे खायला आला असेल....


ओ मिस्टर इथे काय दान करणे चालू आहे असे वाटते का तुम्हाला... घर स्वतःच्या जीवावर करण्याची हिंमत नाही आणि पोरीचा बाबाला सांगत आहात तुमच्या बाबांचे स्वप्न काय आहे ते... श्वेता


माझ्या बाबांनी मला शिक्षण दिले.... माझ्यासाठी कर्ज काढले.... कर्जबाजारी झाले.... लग्नासाठी कर्ज काढण्याची तयारी केली... सोने गहाण ठेवणार आणि मग लग्न करणार... सगळा त्यांचा आंनद लुटून त्यांचे घर लुटून तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू म्हणतोस... आणि माझे आई बाबा कुठे रस्त्यावर सोडून देऊ का....श्वेता

तिच्या मैत्रीण आता तिच्या हिंमतीची तारीफ करत होत्या... त्यांना आता त्यांच्या मैत्रिणींचे कौतुक वाटत होते.... काकू तर म्हणालीच मानले ग पोरी तुला....आई बाबा तर बघतच राहिले,की आपली श्वेता खरंच किती मोठी झाली आहे...

मुलगा म्हणायला लागला,अग पण तू तर एकदम समजदार मुलगी आहेस...असे मी ऐकले होते... आणि तू तर तुझी किंमत आणि लायकी दाखवलीस...

श्वेता.... तू ज्या मुली पहिल्या असशील त्यातील मी नाही...हो ती तुला हवी तशी मुलगी मी नाही..
ती मी नसणारच...ऐतखाऊ...ऐधी मुलगी,सून आणि बायको मला होण्यात काही एक अभिमान नाही... माझे बाबा त्यांच्या मुलीच्या जीवावर स्वप्ने बघतील....ना की मी त्यांच्या जीवावर ....

आता तुमचा झाला तो मान खूप झाला आता तुम्ही आल्या त्या रस्त्याने निघाले तर बरं होईल,नाहीतर मी हुंडा मागणी करत आहेत ह्या कलमा खाली पोलिसांना बोलवेन...

काकू आता पुढे आली आणि जसे तिने त्यांना आता स्वागत करून घेतले होते तसेच त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवत बाहेर काढले ही होते..?

पाहुणे गेले आणि श्वेता एकदम रिलॅक्स झाली होती,दडपण जे आले होते ते कसे काय एकदम तिने क्षणार्धात दूर लोटून मोकळी झाली होती..ती निवांत बसली होती डोके आपल्या हातावर झाकून ..husss.... आणि तिने आता मन वर करून पाहिले,तेव्हा तिथे असलेले सगळे तिच्याकडे शांत अविर्भावात बघत होते... सगळीकडे शांतता पसरली होती... काका ,काकू तिच्याकडे बघत होते हे तिने पाहिले... इकडेआई बाबा ही तिच्याकडे बघत होते... तिच्या मैत्रिणी ही खूप खुश होत्या...आणि कामवाली मावशी ही नेमकी आली होती...तिला ही हा प्रकरण समजल्यामुळे ती ही श्वेताकडे वेगळ्या भावनेतून बघत होती... कमरेवर हात होते... आता श्वेताला टेन्शन आले होते...मी तर हे दिव्य मुलाकडचे वागणे, सहन न झाल्यामुळे करून बसले होते..पान आता त्यात मला चांगलेच बोलणे बसणार होते.... हे सात ही जण वेगळ्या तऱ्हेने मला खातील की ,गिळतील हे तिला वाटत होते..

मग अचानक काकू आणि काका टाळ्या वाजू लागले ,बेटा तू खूप उत्तम धडा शिकवलास ह्या हावरट लोकांना...you are the best..

मग आई बाबा ने तिला पाठ थोपटून शाबासकी दिली...मला अभिमान आहे तू आमची मुलगी आहे,तू नव्या युगातील मुलींचा आदर्श आहेस...मला ही वाटले नव्हते की तू हा निर्णय इतक्या सहज घेशील...पटकन घेशील...आणि त्यांना त्यांची पायरी दाखवशील...

इकडे तिच्या मैत्रिणी तर तिला खूप खूप हिमतीचे काम केले आहेस,कुठे आम्हाला ही थोडा वेळ वाटले होते की तू नुसती ऑफिस मध्येच दादागिरी करू शकतेस पण ह्या पाहुण्यांसमोर नाही चालणार तुझी दादागिरी...पण you are really a great HR... proud of you...?

इकडे मावशी उभीच होती...गम्मत बघत होती असे श्वेताला वाटले,तर ती लगेच म्हणाली आमच्या राणीने त्यावेळी जर तुझ्या सारखे पाऊल उचलले असते तर आज तिच्यावर मरून जायची वेळ आली नसती ताई...तू केले ते लई भारी केले.... मुलींना आधीच समजायला पाहिजे की कोण कसा आणि कोण कसा ...

सगळ्यांना विचार आणि साथ तिला आणि तिने घेतलेल्या निर्णयाला होती जे अगदी अनपेक्षित होती..तिला आता दहा हत्तीचे बळ आले होते.. मी घेतलेला हा निर्णय अगदी अचूक होता आणि अगदी योग्य होता हे ह्या सप्तरंगी प्रेमाच्या लोकांनी दिलेल्या खंबीर साथी मुळे तिला कळले होते..

आता सगळे तोंड गोड करणार होते, त्या मिठाईने जी त्या लालची लोकांसाठी आणली होती..

तितक्यात दारावर थाप पडली...समोर बघते तर काय...मुलाचा मामा उभा होता...सगळे जे हसत होते ते आता त्यांच्याकडे बघून शांतच झाले

काकू पुढे गेली आणि म्हणाली,आता काय राहिले बाकी तुमचे इथे... काई तुमचे ही मन व्यक्त करायचे आहे..

मामा ही लगेच म्हणाले...आहो मुलीच्या ह्या धाडसाचे कौतुक करायला मी मुद्दाम च पुन्हा वरती आलो आहे... मी अशी धाडसी मुलगी बघितली ही नाही..पण पुन्हा पुन्हा बघण्याची माझी इच्छा आहे... आता तर नवीन पिढीतील मुलींनी तर श्वेताच्या आदर्श आवर्जून घ्यावा असे मला वाटते... हो मी मुलाचा मामा आहे पण मीच सांगतो की तो खूप हावरट आहे... त्याने ह्या आधी ही फक्त नौकरी करणाऱ्या,मोठा पगार घेणाऱ्या खूप मुली पहिल्या आहेत...पण तो अजून मोठ्या पगारा वाली मुलगी शोधत होता.. त्याला श्वेता बदललं कळले होते आणि मग म्हणून तो आला होता... पण तू एकदम right वेळी right ठिकाणी त्याची चांगलीच खोड जरवली आहेस...हा खूप छान निर्णय आहे... मी ही तुझ्या ह्या धाडसाचा फॅन झालो आहे बेटा... ज्याची जागा त्यालाच दाखवायला हवी..ती योग्य वेळी दाखवलीस...?
पण माझा एक स्वार्थ आहे...आई बाबा,काका काकू मला अशीच सून हवी आहे...माझ्या मुलाला अशीच मुलगी मला हवी आहे हा माझा विचार तुम्हाला पटतो का बघा आणि मला कळवा.. मी वाट पाहीन...आणि उलट मी तिच्या हव्या त्यात अटी शर्ती मान्य करेन..

मी आमंत्रण देतो की तुम्ही सह परिवार आमच्या घरी आमच्या मुलाला बघायला यावे... आता मुलगा मुलीला बघायला नाही तर मुलगी मुलाला बघायला येण्याची नवीन रीत मी सुरू करत आहे

काय श्वेता !!! तुम्हाला पटले तर कळवा..


तुम्हाला काय वाटते ,मुलींना असे निर्णय घेण्याचे आज स्वातंत्र्य असायला हवे का, आज श्वेता, अंजली,ह्या नवीन पिढीतील मुलींनी केले ते नवी दिशा दाखवणारे आहे का, बदल घडवायला कोणी तरी सुरुवात करायला हवी ,त्यासाठी अशी सप्तरिंगी तुमची ही साथ हवीच ना..तुमच्या comment खूप आवश्यक आहेत...