Login

ती म्हतारी

Ti Mhtari


ती म्हतारी
पेरूचा वाटा घेऊन बसली होती
परिस्थिती ने खंगली होती
पेरू ही तसेच तिच्यासारखे दिसत होते
कित्येक लोक दोघांना ही बघून पुढे निघून जात होते
कोणी ही त्यांची परिस्थिती पाहिली नाही
कोणाला ही खंगलेली ती दिसली नाही
तिची व्यथा समजली नाही
रोजच असे कित्येक असतात
असे कसे ते रहातात
त्यांच्याकडे बघून ते फळ का कोणाला घ्यावेसे वाटतात का
म्हणून ते un hygenic फळे का घ्यायचे त्यापेक्षा मॉल मधले घेतलेले बरे
ते लोक तरी दिसायला बरे असतात
त्यांचे पेरू ही तसेच दमदार आणि दामदार असतात
थोडें जास्त पैसे गेले त्यांना तरी हरकत नाही
आपली परिस्थिती काही वाईट नाही
आपण आपल्या परिस्थिती नुसार वागायचे असते
हेच सगळे विचारून त्या बाई समोरून जात असतात..
पुन्हा आज ही कोणी तिचे फळ घेतलेले नसते
ती तशीच खंगुण गेलेली
तिचे फळ ही तसेच तिच्यासारखे खंगुण जातात
शेवटी ती ही रस्त्यावर जिवंत असून नसल्यासारखी
कोणाला तिची काही पडलेली नसते
ती एकटी तिच्या परिस्थिती शी झुंज देत असते
रोज तशीच कोणाच्या तरी मदतीची आस घेऊन फळ विकतील म्हणून बसलेली असते..
©®अनुराधा आंधळे पालवे