Jan 23, 2022
वैचारिक

ती, माझा मुलगाच आहे

Read Later
ती, माझा मुलगाच आहे

 

 

 

 

 

शरद आणि सुवर्णाला डॉक्टरांनी सांगितले, "तुम्हाला जुळ होणार आहे"  तेव्हा दोघांना खूप आनंद झाला. दोघे बाळाची स्वप्नं रंगवू लागले. "जुळ्या मुलांन पैकी एक मुलगा एक मुलगी जर झाली तर आपलं कुटुंब पूर्ण होईल" शरद बोलला."जे होईल, ते दोन्ही आपलंच आहे सुखरूप प्रसूती झाली आणि सुदृढ बाळ झाली म्हणजे सगळं आलं," सुवर्णा म्हणाली

बाळांची येण्याची वाट बघता बघता दिवस महिने सरले. अखेर तो दिवस उजाडला जेव्हा सुवर्णाला प्रसूती वेदना होऊ लागल्या. "अभिनंदन, तुमच्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती दोघी आल्या आहेत" असे डॉक्टरांनी येऊन सांगितलं!

शरद आणि सुवर्णा दोघे खूप खुश झाले! त्यांची दोन गोंडस कन्या रत्न त्यांच्या समोर, हातात होती! दोन्ही मुली खूप गोड आणि सुदृढ निरोगी आपल्या पदरात पाहून सुवर्णा ने मनोमन परमेश्वराचे आभार मानले! शरद म्हणाला, मला वाटलं होतं एक मुलगा एक मुलगी आपल्याला व्हावं, पण असो, ह्यातील एक माझी मुलगी आणि दुसरी माझ्यासाठी मुला सारखीच आहे! ती, माझा मुलगाच आहे!

दोन्ही मुली सुखात ऐश्वर्यात मोठ्या होत होत्या. त्यांचे सगळे हट्ट, लाड शरद आवडीने, आनंदाने पूर्ण करत असे. काजल आणि किरण दोन्ही बाळाचं छान सुंदर नामकरण करण्यात आल.

आज त्यांचा तिसरा वाढदिवस. सुवर्णाने दोन्ही मुलींसाठी एक सारखाच खूप सुंदर परी सारखा ड्रेस आणला. शरदने तो ड्रेस किरणला घालण्यासाठी विरोध केला." काजल घालेल हा ड्रेस पण किरण नाही, तिला मी मस्त एक ब्लेझर आणतो! तिला हे असं मुलीसारखे कपडे नको घालत जाऊस सुवर्णा" किरण, ती म्हणजे आपला मुलगा आहे, तिला मी मुला सारखं वाढवणार!
सुवर्णाने देखील शरदचे म्हणणे ऐकले आणि मुला सारखा ब्लेझर ड्रेस, शर्ट पँट किरणला वाढदिवसाला घातले.

मुली मोठ्या होत होत्या, काजल जरा नाजुक, रेखीव नकीडोळी तर किरण तिच्या पेक्षा थोडी अंगाने भरलेली, उंच दिसायला लागली.कालांतराने त्यांचा वाढीत फरक होऊ लागला. त्या जुळ्या असल्या तरी सारख्या दिसत नवत्या. त्यामुळे त्यांना देखील आपण दोन वेगळे आहोत असं वाटे. काजल मुलगी आहे अन् मी मुलगा ,हे समीकरण किरणच्या डोक्यात पक्कं झालं. ती स्वतः ला मुलगा समजू लागली .

"किरण तू माझा मुलगाच आहेस" हे शरदच म्हणणं तिच्या डोक्यात दिवसेन दिवस इतकं मुरल होतं की किरणही आता स्वतः ला मुलगा समजू लागली. किरण साठी खेळणी, कपडे सगळं एखाद्या मुलाला आणव तसं आणली जात, तिला टॉम बॉय सारखं राहणं आवडू लागलं. बारीक केस रचना, अगदी कायम तिच्या केसांचा बॉय कट असायचा तर एकीकडे काजलचे लांब दोन वेण्या येऊ लागल्या. काजल बाहुल्या, भातुकली, आईच्या ओढणीच्या साड्या करून नेसणे असे खेळ आवडीने खेळत.

किरणला खूप मस्त वाटत असे, बाबा तिला जेव्हा "माझा शेर, माझा बछडा" म्हणत.काजलला सगळे "माझी परी, माझी राणी," असं हाक मारत.पण कधी जर किरणला आईने अशी हाक दिलीच, तर किरणला ते आवडत नसे!! "आई, मला तू राणी परी असं नको म्हणू ग!!" मी मुलगा आहे, हे मुलीनं सारखं मला नको हाक देऊस"!!

किरणला समजावण्याचा सुवर्णाने खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ! बाबा मला त्यांचा मुलगा समजतात, मी त्यांचा मुलगाच आहे हेच किरणच ठरलेलं उत्तर सुवर्णाला ऐकायला मिळायचे!  शरद देखील आपल्या लाडक्या किरणची बाजू घेऊन बायकोला शांत करत!

वर्ष सरली, दोघी मुली मोठ्या झाल्या. दोघींना ऋतुप्राप्ती झाली. आईने दोघींना सगळं सविस्तर समजावलं, त्या दिवसात त्यांना खूप सांभाळ. काजल हळू हळू शिकली, समजून घेतलं तिने स्वतः मध्ये होणारे बदल. पण किरणला ही निसर्गाची भेट मान्यच नव्हती! तिला ह्या शारीरिक आणि मानसिक झालेला बदल स्वीकारणं अवघड होऊ लागलं!

दर महिन्याला पाळी आली, की किरणची भयंकर चिडचिड होत असे. तिला हे मान्यच करून घ्याच नव्हत, की ती एक मुलगी आहे!! तिला समजावणं, सांभाळणं अवघड होऊन बसलं!

"तुम्ही मला तुमचा मुलगा म्हणता, तसच मला वागवत,मला मुलगा म्हणून वाढवलं, खोट बोललात बाबा तुम्ही. मी मुलगा नाही, हे काय होऊन बसल बघा? हे शरीर मला नकोय,तुम्ही मला फसवलत" किरणच हे बोलणं ऐकुन शरद आणि सुवर्णाच्या पाया खालची जमीनच सरकली!!

आई वडीलांनी  किरणला समजावण्याचा खूप प्रयत्न केला,पण तिच्या मनात उफाळलेल्या संमिश्र भावना, एक प्रकारचा राग, तिला फसावल्याचा भाव हे सगळं तिला मान्य करण्यापासून परावृत्त करत होतं! अखेर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य राहील, म्हणून किरणला घेऊन मानसोपचार तज्ज्ञ कडे जाण्याचे ठरवलं!

शरदने, कायम किरणच्या मनात ' तू माझा मुलगा आहेस ',हा विचार रुजवला. शरडदला जराही कल्पना नव्हती की अश्या त्याच्या बोलण्या वागण्याचा इतका विपरीत परिणाम किरण वर होईल. मुलगा मुलगी समानता, मुलीला मुला सारखं वाढवणे  हे त्याचं धोरण, नको त्या वयात किरण वर लादून त्याचा वाईट परिणाम आता दिसून येत होता!!

शरदने नाण्याच्या फक्तं एकाच बाजूने विचार केला. पण नाण्याची दुसरी बाजू, म्हणजे किरणच मन, तिचे विचार. तिचा बदलत चाललेला स्वभाव, नैसर्गिक शारीरिक रचना त्यात होणारे बदल ह्या सगळ्याचा खोल विचार शरदने कधी केलाच नव्हता.....

~~~~~~~~~~समाप्त~~~~~~~~~~

घरातील वडील धाऱ्यांच्या आणि आई वडिलांच्या विचारांचा, वागण्या, बोलण्याचा मुलांच्या मनावर कळत नकळत खूप खोल परिणाम होत असतो. त्यांच्या समोर आपण कसं वागतो कुठले विचार त्यांच्या मनात रुजवतो ह्याची खबरदारी घेण्यात आली नाही, तर त्यांना सांभाळणं, समजावणं अवघड होऊन बसते!

©तेजल मनिष ताम्हणे

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Tejal Manish Tamhane

Home maker and Private Tutor.

Fun loving , Happy go Lucky person. Likes to write short stories and poems. Best friend of my daughters and a caring person at heart.