ती कोण होती ( भाग एक )

आपण समजतो तसं प्रत्येक नात असत असं नसत. कितीतरी नाती ही शब्दपलिकडची असतात.


ती कोण होती ( भाग एक )

विषय : नातीगोती

नवऱ्याच्या मृत्यूनंतर अश्विनी मनाने खूप खचली होती. अबोल झाली होती. मनाने तर पूर्णपणे उध्वस्त झाली होती. सगळं आयुष्य तिच्यासमोर वैरण वाळवंटासारखं पसरलेल होत . पुढं काय करायचं हा यक्ष प्रश्न तिच्या समोर आ वासून उभा होता. एकेक करून सगळी पाहुणे निघून गेले होते. सगळ्या घरात तीच एकटी सुन्नपणे बसून राहिली होती. रात्र रात्र ती जागीच असे. घड्याळात बाराचे टोल पडले. अश्विनी एकदम दचकली. बापरे, अजून सहा तास काढल्यानंतर सकाळ उजाडणार. ही लांब लचक काळोखी रात्र एकदिवस आपल्याला गिळून टाकणार आहे. लग्ना नंतर याचं रात्रींची ती किती आतुरतेने वाट बघायची. रात्र संपूच नये असं तिला वाटायचं. त्यावेळी नाचिकेत सोबत होता. आज तो नाही म्हणून, आज ती एक एक मिनिट ते मोजत होती . काही केल्या झोप लागत नव्हती. थोडासा डोळा लागला की त्याच्या असंख्य आठवणी डोळ्यासमोर फेर धरून उभे राहत. तो तो आता नाही . यापुढे तर कधीच नसणार आहे. ही जाणीव तिला  झाली .  हृदयात दुःखाची कळ उठली. पलंगार दोन उशा आहेत. एक आकाशात झेप घेणाऱ्या बगळ्याची आहे. पण आता ती उशी रिकामी आहे.  रिकामीच राहील. तो नसल्याची जीवघेणी जाणीव ही बाजूची उशी करून देते. त्याच्या आठवणीने ती पुन्हा कासावीस झाली. भर मध्य रात्री त्याची आठवण तिच्या हृदयात दाटून आली.  ती मूकपणाने अश्रू ढळू लागली. डोळ्यातली झोप कोस कोस अंतरावर नाहीशी झाली होती.

ती उठून बसली. काहीतरी काम करूया. असा तिने विचार केला.तेवढाच वेळ जाईल. असा विचार करून लाईट लावला.  नाचिकेची पुस्तक आवरूया. त्याला त्याची पुस्तके नीट लावली की खूप आवडायचं.  त्याला या गोष्टीचा खूप आनंद होई. पण खरं म्हणजे कामाच्या रगडात आजपर्यंत तिला कधी हे काम करायला वेळच मिळाला नव्हता.

पुस्तक म्हणजे नाचिकेतचा जीव की प्राण होता. त्याच्याजवळ पुस्तकांचा खूप मोठा संग्रह होता.  तो पुस्तकांवर जीवापाड प्रेम करत असे. वाचन हा त्याचा छंद त्याने जिवापाड जोपासला होता.

जरी त्यांच्या घरात बाळ नव्हतं ,तरी तिला त्याची उणीव भासत नसे. तो सतत पुस्तक वाचायचा. अश्विनीला वाचून दाखवायचा. अनेक गोष्टी सांगायचा. लोकांना जरी त्यांच्या संसारात उणीव दिसत असली. तरी ते दोघं मात्र अतिशय खुश होते. त्या दोघांचं एक वेगळंच विश्व होतं. त्याच्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या माणसाला जागा नव्हती. अश्विनी देखील नाचिकेतच्या सहवासात अत्यंत खूष असायची. हे आपलं सुख असंच कायम राहो, हीच ती देवाजवळ प्रार्थना करायची. ठीक आहे मूल नाही याचा अर्थ, असा तर नाही ना की, मी सुखी नाही. कारण  मुलं असलेली माणसं मुलांकडूनच लाथाडली गेलेली. तिने पाहिलेली होती. त्यामुळे जे आपल्याला नशिबाने मिळाला आहे. त्यातच ती सुख मानत होती.

पण तिच्या या सुखाच्या संकल्पनेलाही दैवाने तडा गेला. एक दिवस अचानक नुसता रस्ता क्रॉस करण्याचं निमित्त झालं . एका भरधाव येणाऱ्या दुचाकी गाडीने त्याला उडवलं. दवाखान्यात भरती करण्याच्या आधीच नाचिकेत यमा घरी गेला. कसलं बोलणं नाही की कसला निरोप घेणं नाही. सगळं कसा अचानक झालं. अश्विनीला तर समजलच नाही.  अजूनही तिचा विश्वास बसत नाही की काय झालय. नाचिकेत घरी येणार नाही यावर तिचा विश्वासच बसत नाही. असं वाटतं तो कामावर गेला आहे . कोणत्याही वेळ घरी येईल आणि ओरडून म्हणेल, मला जेवायला वाढ.

मग मात्र पूर्ण जागी झाल्यावर तिला जाणीव झाली की सत्यतेने स्वीकाराला स्वीकारायला हवे.  मुकाट्याने ती ऊठली. डोळ्यावर पाणी मारले.  यांत्रिकपणे त्याची पुस्तक व्यवस्थीत ठेवू लागली.

एकाएकी पुस्तकांच्या खाली तिला एक डायरी दिसली. ती डायरी तिने हातात घेतली. उघडल्या बरोबर  डायरीतून दोन-तीन फोटो खाली पडले. ते फोटो पाहिल्यावर तिचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसेना. तिचा लाडका नाचिकेत कोणातरी दुसऱ्याच स्त्रीच्या बाहूपाशात असलेले ते फोटो होते.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all