ती खेळकर की जबाबदार भाग 2
©️®️शिल्पा सुतार
कामवाल्या मावशी आल्या होत्या. त्या किचनमध्ये भांडी आवडत होत्या. मीनाने किचन आवरल. ती श्रुतीच्या रूममध्ये गेली दरवाजा ढकलला. लाईट लावला.
आवाजाने श्रुती उठली. " आई तो लाईट बंद कर आधी. मला झोपू दे."
" श्रुती उठ बर."
"आई काय आहे ग तुझं सकाळी सकाळी. " श्रुतीने तोंडावर पांघरुन घेतल.
" सकाळी? आता साडेदहा झाले आहेत. उठ लवकर तुझी रूम पाच मिनिटाच्या आत आवर. मावशी झाडायला येतील आणि लगेचच बाहेर ये माझ्या मदतीला स्वयंपाकाला. " मीना बाहेर आली.
पंधरा मिनिटं झाले. श्रुती काही आली नाही. मीना परत चिडलेली होती ती परत तिच्या रूममध्ये गेली तर ती लोळलेली होती.
"श्रुती तुला एकदा सांगून समजत नाही का? मी व्यवस्थित वागते याचा गैरफायदाच घेते आहेस का तू? मी आता एकदम स्ट्रिक्ट झालेली आहे. आधी उठ बरं. हे सगळं आवर." मीना ओरडली.
श्रुती हसत होती. "आई काय हे आज एकदम रागात वगैरे आहेस."
"मी अगदी चिडलेली आहे. गम्मत करत नाही ." मीनाला थोड हसू येत होत. श्रुती ही गोड आहे एकदम. तिच्याशी रागात बोलता येत नाही.
"आई तुला माझ्यावर चिडायला जमत नाही." ती गळ्यात पडली.
श्रुती कडे बघून मीना हसत होती. तिने तिला पापी दिली.
"आई जेवायला काय आहे. छान कर काहीतरी. मी लगेच आवरते. सकाळी सकाळी मी जास्त काम नाही करू शकत. तुला माहिती आहे. " श्रुती जागेवरून उठली.
" अग उलट सकाळी जास्त काम असतात. असं वागली तर कसं होईल? लोक मलाच नाव ठेवतील की तुम्ही मुलीला काहीही शिकवलं नाही. इथे मी जीवाचा आटापिटा करून तुला समजून सांगते तर तू ऐकत नाही. लाइटली घेते. " मीना ब्लँकेटची घडी घालत बोलली.
" आई लव यू चिडू नकोस. मला येत सगळ. काहीही विचार." श्रुती बोलली.
"तोंडी माहिती असून उपयोग नाही. प्रत्यक्षात यायला हव आणि रोज न चिडता चारी ठाव घर काम, स्वयंपाक करायला हवा. मी करणार नाही वगैरे इथे माझ्या जवळ चालेल. नवर्याला चालणार नाही. आपल्याला नकार द्यायच स्वातंत्र नाही ग. उलट दिवसभर काम काय असत असे लेबल लावले जातात. तुला वाटत तेवढ जग साध नाही. "
" आई इतक काय बोलतेस करते मी. "
मावशी बोलवत होत्या. मीना किचन मधे गेली. श्रुती आवरत होती.
मावशी घर झाडायला आल्या तो पर्यंत श्रुतीने थोड आवरल." आई भूक लागली आहे. "
"चल ये. "
" काय केल आहे?" श्रुती डायनिंग टेबल जवळ येवून बसली.
"आंघोळ झाली का?" आजी विचारत होती.
"नाही केसांना तेल लावायच आहे आजी. दुपारी करेन." श्रुती बोलली.
"मी तुला सांगते मीना तू हिच्या सवयी बदल. आपल्या कडे बिना आंघोळीच कोणी चहा ही घेत नाही. " आजी बोलली.
"म्हणजे काय? आईने थोडी लावल्या मला सवयी. माझ्या वागण्याला मीच जबाबदार आहे आजी. आई नाही. काहीही बोलू नकोस. ती उलट मला आवरायच सांगत असते." श्रुती बोलली.
जेवण झालं. दुपारी श्रुती अभ्यास करत होती.
मीना रूम मधे आली. " श्रुती माझी ओढणी दे ना. तू स्कार्फ म्हणून नेली होती ना परवा. मला घालायचा आहे तो ड्रेस. "
"आई कपाटात आहे. " मीनाने कपाट उघडल.
" बापरे काय केल आहेस तू हे कपाटाच? श्रुती लहान पणी तुझा कप्पा पुस्तक कपडे किती नीट ठेवलेले असायचे. आवर हे. नाहीतर मी घड्या करून देते तू नीट लाव.
" आज नाही आई मला अभ्यास आहे."
"ठीक आहे या दोन तीन दिवसात हे काम झालं पाहिजे."
हो.
मीना तिची ओढणी घेवून वापस गेली. ती काळजीत होती.
सतीशचा फोन आला. दोघ बोलत होते.
"काय झाल?"
ती श्रुती बद्दल सांगत होती.
"काळजी सारख काही वाटत नाही. एवढंच आहे श्रुती तू असली की रीलॅक्स असते. येत तिला सगळ डोन्ट वरी."
" अहो काहीही आवरत नाही. कपाट खराब, कॉटवर पसारा पडलेला. मला पुढे काय होईल अस वाटत आहे." मीनाने सांगितल.
"आता पासून पुढच टेंशन घेवू नकोस. तू तिला उगीच बोलू नकोस. तु ही उगीच कारण नसतांना विचार करत बसू नकोस. "
संध्याकाळी मीना जरा शांत होती. जेवायला कढी खिचडी केली होती .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा